महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )
आज कोजागिरी पौर्णिमा.
लहानपणापासून मी पहात आलोय की आजच्या दिवशी मातीच्या किँवा इतर कोणत्याही भांड्यात दूध तापवून ते उकळवले जाते, आकाशातील पूर्ण चंद्र दिसत असतो. त्याची प्रतिबिंब दुधात पडेल अश्या ठिकाणी ते उकळवून नंतर घरातील सर्व जण ते दुध पितात.. परंतु आजकाल अश्या पद्धतीने सण साजरा न करता आमच्या इथे दांड्या खेळल्या जातायत. सर्व अरेंजमेंट मारवाडी फॅमिली ( संख्या फक्त २) आहे त्यांनी केलेली आहे... गाणी पण बहुतांश मारवाडी आहेत. नाचणारे ९८ टक्के मराठी आहेत. अर्थातच असं करायला विरोध नाही पण हे करताना आपण आपले सण साजरा करण्याची पद्धत विसरत चाललोय का ??
दसऱ्याच्या दिवशी घरी सोने ( अपट्याची पाने ) द्यायला लहान मुले आले होती ( मराठी ७-८ आणि ईतर भाषिक १-२ ). परंतु सर्व जण " हॅप्पी दसरा " असं म्हणतं होती. सोन घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणण्याची पद्धत कुठे गेली ते समजेना. मकर संक्रातीच्या दिवशी पण " तिळगूळ घ्या गोड बोला " मागे पडून हॅपी मकर संक्रांती आणि पतंगबजी वाढत चाललीय.
आम्हीं लहान असताना नवरात्रीत दांडिया खळण्यासाठी जायचो तेव्हा सर्व मराठी आणि हिंदी गाणी वाजवली जायची. कृष्णाचे गवळणी, गणपतीची गाणी , अंबेमातेची आणि इतर हिंदी गाणी वाजायची ( हे नाम रे .. सबसे बडा तेरा नाम हे गाणे तोंडपाठ होते. ) पण आमच्या गल्लीत मारवाडी , गुजराती गाणी वाजत होती... आणि विशेष म्हणजे त्यावर नाचणारे ९० टक्के मराठी होते. त्यामुळें मराठी लोकांना मराठी गाणी वाजवायला "लाज " वाटते का असा विचार मनात येऊन गेला.
नवरात्रीत जे काही दांडिया कार्यक्रम होतात तेथे मराठी लोक साड्याऐवजी किंवा मराठी पेहरावा ऐवजी गुजराती ड्रेस का घालतात ?
हीच गोष्ट लग्नात देखील.. मराठी मुलं आणि मुली विदेशी किंवा इतर धर्मीय पेहराव का करतात. उदा. मुली साडी सोडुन वेडिंग ड्रेस ( ख्रिश्चन लोकामध्ये घातला जातो तसा) किंवा घागरा घालतात..
याउलट कोणत्याही ख्रिश्चन मुलीने किंवा गुजराथी मुलीने लग्नात नऊवारी साडी घातलेली मी आजवर पहिली नाही..
पूर्वी हत्ती नक्षत्रात भोंडला/ हतका /हादगा हा खेळ / सण साजरा केला जायचा. पण बहुतेक आता नामशेष झाला. मी गेल्या ५-६ वर्षात कोणत्याही मुला मुलींनी हा प्रकार साजरा केल्याचे पाहिलेले नाही. ही पद्धत नष्ट झाली का ?? एलामा पैलामा.. आज कोन वार बाई आज कोन वार.. अशी अनेक गाणी आजही मला पाठ आहेत. पण आजकाल बहुतांश मराठी मुलांना किंवा मुलींना हे महिती आहे?? आणि ईथे ( महाराष्ट्रात) आल्यावर इथले पाहून किती मारवाडी गुजराथी लोकांनां ही गाणी महिती आहेत??
आमच्या वेळी रंगपंचमी आणि होळी हे दोन वेगवेगळे सण होते.
आजही कोणतेही कॅलेंडर उघडुन पहा दोन्ही सण वेगवेगळे दाखवलेले आहेत. होळीच्या दिवशी आम्ही होळी पेटवायचो. पुरण पोळी खायचो. आणि रंगपंचमीला रंग खेळायचो. पण आता रंगपंचमी हा सण राहिलेला नाही... आणि होळीच्या दिवशी होळी कोणी पेटवत नाही ( पर्यावरण ह्या विषयावर ईथे चर्चा नको ). याउलट होळीच्या दिवशी रंग खेळले जातात.. आणि "हॅपी होली " च्या मेसेज ने इनबॉक्स फुल होतो.
ज्या पद्धतीने आपण मारवाडी , गुजराती इ लोकांना सामावून घेउन त्यांच्या कलाने आपले सण साजरे करतोय त्या पद्धतीने ते लोक आपले सण साजरे करताना दिसत नाहीत. मी आजवर कोणी इतर भाषिक व्यक्तिने किंवा फॅमिली ने गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला असं पाहिलेले नाही. किंवा हद्ग्याची गाणी म्हणत फेर धरलेले आठवत नाही.
पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत...
दिवाळीच्या सणाच्या वेळी पण पारंपरिक फराळ नामशेष होऊन सोनपापडी, बिस्किटे, चॉकलेट इ प्रकार वाढत चाललीय आहेत. कोणी इतर भाषिक इथे येऊन इथल्या लोकांप्रमाणे चकल्या, लाडू, करांजिर करताना दिसत नाहीत. पण इथले लोक त्यांचं पाहून सोनपापडी कडे वळले.
तर.. चर्चेचा मुद्दा हा की आपण आपले सण साजरे करायची पद्धत बदलत चाललोय का. ? ईतर भाषिक लोकं यांनी इथे आल्यावर इथल्या संस्कृतीत मिक्स होण्याऐवजी अल्पसंख्य असुन सुध्दा संस्कृतीक आक्रमण करत आहेत का?? की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? याचे दूरगामी परिणाम काय होतील??
मी जे काही वर लिहिलय ते माझा गैरसमज आहे का ?? इतर मिपाकर या बाबतीत काय विचार करतात ??
टीप - हा धागा राजकीय हेतूने किंवा इतर भाषिक लोकांच्या द्वेष करण्यासाठी काढलेला नसुन आपल्या सण आणि परंपरा यामध्ये भेसळ होतेय की नाहीं या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी काढला आहे. मी माझी मते मांडली आहेत.. ती बरोबरच आहेत असं माझं म्हणणं नाही. मी कदाचित चुकीचा असू शकेल.
धाग्याला मोदी ,.bjp , मनसे इ राजकीय संघटना कडे नेऊ नये.
वाचन
40316
प्रतिक्रिया
129
दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून
In reply to दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून by श्रीगुरुजी
गुरुजी.. या सर्व प्रथा
In reply to गुरुजी.. या सर्व प्रथा by बापूसाहेब
खरं सांगायचं तर असे फारसे
In reply to खरं सांगायचं तर असे फारसे by श्रीगुरुजी
होळी
हा सारा प्रकार शहरात जास्त
In reply to हा सारा प्रकार शहरात जास्त by सुक्या
सुक्या जी.. प्रतिसादाबद्दल
..
होळी आणि रंगपंचमी हे दोन
In reply to होळी आणि रंगपंचमी हे दोन by चौकस२१२
मुंबई
In reply to मुंबई by mangya69
.
In reply to मुंबई by mangya69
असा का? पिढ्यान पिढ्या
"हॅपी होली " /
आपण नव्या पिढीला अमुक एक
सहमत
लेखात तथ्य आहे
In reply to लेखात तथ्य आहे by Rajesh188
हो करतील की
हे होणारच आहे. जसेजसे जग जवळ
In reply to हे होणारच आहे. जसेजसे जग जवळ by कॉमी
संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे
In reply to संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे by Rajesh188
मराठी लोक आपली परंपरा सोडून
In reply to मराठी लोक आपली परंपरा सोडून by कॉमी
प्रश्न आहे तो आपले ते जमेल
In reply to प्रश्न आहे तो आपले ते जमेल by चौकस२१२
२ मराठी माणसांनी एकमेकांशी
In reply to संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे by Rajesh188
न्यून नगंडाच्या भावनेतून
In reply to संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे by Rajesh188
...
In reply to ... by mangya69
करेक्शन उर्फ शुद्धीपत्रक
संस्कृतीच्या बाबतीत
कोजागिरी नाही ... कोजागरी.
In reply to कोजागिरी नाही ... कोजागरी. by रुपी
आमच्या ऑफिसमध्ये भारतीय,
In reply to कोजागिरी नाही ... कोजागरी. by रुपी
रुपी,
In reply to कोजागिरी नाही ... कोजागरी. by रुपी
व्हाट्सअप वरच्या शुभेच्छा का
In reply to व्हाट्सअप वरच्या शुभेच्छा का by सौन्दर्य
बुल्ल्स आय . .
In reply to बुल्ल्स आय . . by सुक्या
सहमत .. खरे तर "फुकट" नाहीये
एकीकडे सणांचे बाजारीकरण होत
In reply to एकीकडे सणांचे बाजारीकरण होत by सुबोध खरे
सहमत.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
..
In reply to .. by mangya69
किंचीत सहमती...
कालच या विषयावर पत्नीशी चर्चा
In reply to कालच या विषयावर पत्नीशी चर्चा by सुबोध खरे
वा !
In reply to कालच या विषयावर पत्नीशी चर्चा by सुबोध खरे
सहमत सुबोध खरे.
प्रबोधन
आणि विशेष म्हणजे या भेसळी
In reply to आणि विशेष म्हणजे या भेसळी by चौथा कोनाडा
एक मात्र आहे
In reply to एक मात्र आहे by Rajesh188
कारण
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
.
In reply to . by mangya69
असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच
In reply to असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच by चौथा कोनाडा
कबुतर हा पक्षी निरोप पोचवायचा म्हणे
In reply to कबुतर हा पक्षी निरोप पोचवायचा म्हणे by Rajesh188
निरोप
In reply to असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच by चौथा कोनाडा
..
In reply to .. by mangya69
आणि मग कावळ्याला पिण्ड घालतात
In reply to .. by mangya69
‘Pigeon poop causes 60
In reply to ‘Pigeon poop causes 60 by सुबोध खरे
गंभीर दुष्परिणाम
😓
In reply to गंभीर दुष्परिणाम by चौथा कोनाडा
कुठल्याही प्राण्याला किंवा
In reply to एक मात्र आहे by Rajesh188
.
हा विचार आलाच पाहिजे मनात
मराठी लोकांनी पाहिले स्वतःला
कुटुंबाने काही काळ एकत्र येऊन
In reply to कुटुंबाने काही काळ एकत्र येऊन by श्रीगुरुजी
मत
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
+ १
In reply to + १ by श्रीगुरुजी
नारळ फोडण्यापूर्वी नारळाला
In reply to नारळ फोडण्यापूर्वी नारळाला by प्रचेतस
ह्यावर एकदा मोठी खडाजंगी
In reply to ह्यावर एकदा मोठी खडाजंगी by कॉमी
मला जे काही सांगायचे होते ते
In reply to + १ by श्रीगुरुजी
आपल्या प्रथांबद्दल सारासार
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
हिंदूंमध्येच आपापसात झालेल्या
In reply to हिंदूंमध्येच आपापसात झालेल्या by चौकस२१२
सहमत
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
दिवाळीला जश्न-ए-रिवाज
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
जश्ने रिवाज वैगेरे बघून राईट
In reply to जश्ने रिवाज वैगेरे बघून राईट by कॉमी
धन्यवाद
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
वेलकम.
सण परंपरा
In reply to सण परंपरा by उन्मेष दिक्षीत
अनेक मराठी लोक मराठी ऐवजी
In reply to सण परंपरा by उन्मेष दिक्षीत
मराठीची दुरावस्था.
In reply to मराठीची दुरावस्था. by सौन्दर्य
मराठीची अनावस्था
In reply to मराठीची दुरावस्था. by सौन्दर्य
बरोबर आहे
एक निरीक्षण - ज्या मराठी
सण भेसळ वगैरे cosmopolitan
सणवार
In reply to सणवार by कर्नलतपस्वी
अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी
In reply to अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी by चौकस२१२
अनेक मराठी वाहिन्यांच्या
थोड्या दीवसांनी फाफडा व चहा
In reply to थोड्या दीवसांनी फाफडा व चहा by शानबा५१२
वडापाव
In reply to वडापाव by mangya69
चहा
In reply to थोड्या दीवसांनी फाफडा व चहा by शानबा५१२
असं नाही
In reply to असं नाही by तर्कवादी
सहमत
In reply to सहमत by सर टोबी
मला आमच्या कंपनीत छान मराठी
In reply to मला आमच्या कंपनीत छान मराठी by तर्कवादी
गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे
In reply to मला आमच्या कंपनीत छान मराठी by तर्कवादी
है मात्र खरे
In reply to है मात्र खरे by Rajesh188
गैरसमज आहे
मराठी माणसात ज्ञूनगंड आहे
In reply to मराठी माणसात ज्ञूनगंड आहे by Rajesh188
जी ज्वारीची भाकरी मराठी
In reply to जी ज्वारीची भाकरी मराठी by तर्कवादी
आमच्याकडे एका महिन्यात फार तर
मीच त्यांना टोकल
In reply to मीच त्यांना टोकल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
होल्ड मम्माचा हँड
In reply to होल्ड मम्माचा हँड by अनन्त अवधुत
दिस् इझ् मात्र टू मच् हं!
मराठी लॅन्ग्वेज् सेव् करा !
In reply to दिस् इझ् मात्र टू मच् हं! by वामन देशमुख
मदरटंग . .
In reply to मदरटंग . . by सुक्या
पु. लं. चं पूर्वरंग मधील वाक्य...
In reply to पु. लं. चं पूर्वरंग मधील वाक्य... by बबन ताम्बे
अगदी अगदी. मी एकदा माझ्या
In reply to अगदी अगदी. मी एकदा माझ्या by नचिकेत जवखेडकर
हा प्रतिसाद भेदभाव करणारा आहे
अजुन काही निवडक
हिंदी भाषिक
In reply to हिंदी भाषिक by सर टोबी
लिपी
In reply to लिपी by mangya69
लिहण्यासाठी लिपी लागते
In reply to लिहण्यासाठी लिपी लागते by Rajesh188
.
In reply to . by mangya69
राजेशा
In reply to . by mangya69
मंग्या हा कसला तर्क आहे ?
In reply to . by mangya69
मंग्या हा कसला तर्क आहे ?
In reply to मंग्या हा कसला तर्क आहे ? by चौकस२१२
.
In reply to . by mangya69
भारतीय सर्व भाषा जरी बोलता
...
जशी हिंदी ही राष्ट्र भाषा आहे ही थाप आहे
In reply to जशी हिंदी ही राष्ट्र भाषा आहे ही थाप आहे by Rajesh188
.
In reply to . by mangya69
मुस्लिम लोकांचे जेवढे सण आहेत
आजचा एक किस्सा.
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा
In reply to करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा by mangya69
खास त्या साठीच
आता ही मराठी नटी पहिला करवाँ
In reply to आता ही मराठी नटी पहिला करवाँ by चौथा कोनाडा
प्रेमासाठी ....
हम्म
In reply to हम्म by जेम्स वांड
तिसरी भाषा का हवी हे कळायचे
In reply to तिसरी भाषा का हवी हे कळायचे by रावसाहेब चिंगभूतकर
.
In reply to . by अनन्त अवधुत
संगणकाची भाषा हि अजून तरी (
In reply to . by अनन्त अवधुत
तुमचे मुद्दे बरोबर आहेत.
In reply to तुमचे मुद्दे बरोबर आहेत. by तर्कवादी
तसेच सिंगापूरची टक्केवारी (६३
In reply to तसेच सिंगापूरची टक्केवारी (६३ by तर्कवादी
.
In reply to . by अनन्त अवधुत
तुमच्याकडे अयोग्य वाटणार्या
In reply to तुमच्याकडे अयोग्य वाटणार्या by तर्कवादी
तो विदा तसा नाही
In reply to . by अनन्त अवधुत
तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे
In reply to तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे by रावसाहेब चिंगभूतकर
विरोध हिंदीला नाही
In reply to विरोध हिंदीला नाही by तर्कवादी
काही आडमुठे हिंदी भाषिक
In reply to काही आडमुठे हिंदी भाषिक by रात्रीचे चांदणे
सहमत
In reply to तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे by रावसाहेब चिंगभूतकर
शिकावी लागते ह्याला विरोध आहे.