बोली टिकल्या तर टिकेल मराठी
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे
बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं? मराठीला टिकवायचं- जगवायचं तर तिच्यात बोलीभाषांचं प्रभावी उपयोजन होणं गरजेचं आहे.
संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/10/blog-post_73.html?spref=tw
संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/
वाचने
5940
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
+१
मराठी बोलीभाषा आणि प्रमाण मराठी दोन्ही टिकतील. जिवंत राहतील.
तुम्ही तुमच्या मृत ब्लॉगचे काय ते पहा. मिसळपावचा वापर करुन त्यात धुगधुगी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात तुम्ही.
In reply to मराठी बोलीभाषा आणि प्रमाण by संगणकनंद
स्टेडियमबाहेर षटकार
In reply to मराठी बोलीभाषा आणि प्रमाण by संगणकनंद
:))))
In reply to मराठी बोलीभाषा आणि प्रमाण by संगणकनंद
.
In reply to मराठी बोलीभाषा आणि प्रमाण by संगणकनंद
संगणकनंद :)
पूर्ण लेख इथे टाकायला काय हरकत आहे??
अशा झैराती मिपा धोरणात बसतात का ??
In reply to पूर्ण लेख by कपिलमुनी
खरे तर आपण प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधले पाहिजे.
मिसळपाव वर येणार्या प्रचंड वाचका संख्येमुळे सर्वर वर ताण येतो. त्यामुळेच येथे येणारी ट्राफीक थोडा वेळ दुसरीकडे वळवून मिसळपाव चे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी तर दुसर्या संकेतस्थळाची लिंक देत नसावेत ना ? असा विचार करुन पाहायला काय हरकत आहे ?
In reply to पूर्ण लेख by कपिलमुनी
पूर्ण लेख इथे टाकायला पाहिजे, इथून बाहेर पडलं की अजून तिकडेच कुठे जालभटकंती सुरु होते.
आपण मिपावर होतो हे विसरुन जातो, त्यामुळे एकदा इकडे आलो की पुन्हा इकडे तिकडे जायचा कंटाळा येतो.
-दिलीप बिरुटे
बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल.
हि काय भानगड... दोन्ही चालू राहतील कि .. युती कसली? नसलेला वाद काढू नका
हिंदी आणि इंग्रजीची नको असलेली घुसड हि दोन्ही कडे चालू आहे .. त्यावर काम करा हवे तर
In reply to नसलेला वाद काढू नका by चौकस२१२
बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल.लेखात त्यांनी एक महत्वाचं वाक्य लिहिलेलं आहे " संस्कृत भाषेचा मारा करून प्रवाही मराठी वाक्यरचनेपासून सर्वसामान्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतो " म्हं जे असं दिसतंय त्यांना असं म्हणायचं की शाळते इंग्रजी/हिंदी/संस्कृत ऐवजी बोलीभाषा शिकवायला सुरुवात करायला हवी !
In reply to बोलींशी युती केल्यानंच ती by चौथा कोनाडा
संस्कृत भाषेचा मारा ! याला काही पुरावा आहे कि नाही कोण जाणे . शेवटी कोणत्या वर्षी मराठी चा अभ्यास क्रम बदलला होता? कोणाला माहिती आहे > कि ज्यात लेख म्हणतो तसे संस्कृतीकरण झाले असावे !
शाळते इंग्रजी/हिंदी/संस्कृत ऐवजी बोलीभाषा शिकवायला सुरुवात करायला हवी !
कि तेम्हणता आहेत कि मराठीच हे अजून वाढवा ! तसे असेल तर . पण मग विचार करा कि असे धोरण राबवयायला किती काम पडेल! म्हणजे कोकणात, विदर्भात आणि खान्देशात प्रमाण मराठी च्या बरोबर अजून एक त्या त्या भागातील बोलीभाषा वेगळं विषय किंवा उपविषय शिकवा... अरे बापरे म्हणजे राज्याचे अजून तुकडे
आधीच या सी बीएस सी/ आय सीएस सी , १० पद्धतीमुळे प्रमाण मराठी सुद्धा १०० गुणांची मुख्य भाषा ना राहता दुय्यम दर्जाची शिकवली जाते ..
हा असे करता येईल कदाचित कि मुख मराठी विषयात (जर नसेल तर) ३-४ मुख्य बोली भाषांसह नयना दयावे ,,, पण मग परत त्यावर गदारोळ मुख्य बोली भाषा कोणत्या?
"शिक्षणाच्या मातोश्रींचा घो " झालाय सगळा !
+१