काय वाचताय ?-२
"little saint" अर्थात संत मिराबाईंच्या नवऱ्याचे आत्मकथन किरण नगरकरांच्या कादंबरीत आहे. कादंबरीची सुरुवात चांगलीच गुंतवणारी आहे. मध्यंतरी मात्र कादंबरी जेरीस आणते. पण शेवटी मात्र इतके मोठे पुस्तक वाचले, ते वर्थ झाले असे वाटते. ह्याचे कारण म्हणजे मुख्य पात्र अतिशय उत्तमपणे बांधले आहे. मेवाडच्या राणा संग्राम उर्फ राणा संग यांचा मुलगा, मेवाडच्या गादीचा वारस (महाराज कुमार) - राजा भोज- हा कथेचा नायक, आणि, 'ककोल्ड' आहे. ककोल्ड म्हणजे व्यभिचारी स्त्रीचा पती. हा शब्द वापरला जातो तो पतीसाठी दौऱबल्यवाचक म्हणून. महाराज कुमारचा मेर्ता (मीरत)च्या राजकन्येसोबत विवाह होतो- मीरेशी. तिचा काका राव विरामदेव हा एक ताकदवान आणि प्रभावशाली सेनापती असतो, आणि हिरव्या डोळ्यांची मीरा अतिशय सुंदर असते. म्हणजे, राजवारसासाठी अतिशय उत्तम स्थळ असते. त्यामुळे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कुमारला लग्नाच्या पहिल्या दिवशी कळणाऱ्या गोष्टी अतिशय धक्कादायक असतात. त्याची पत्नी त्याला सांगते की ती आधीच कुणाशीतरी विवाहित आहे. (अर्थातच, ती कृष्णाबद्दल बोलत असते.) यानंतर कुमारच्या आयुष्यातील होणाऱ्या घडामोडींवर हि कादंबरी आहे. इतिहासात अत्यन्त कमी दखल घेतलेलं असं कुमारचं पात्र आहे. त्याबद्दल ठोस माहिती सुद्धा अतिशय कमी आहे. असं असताना त्यावर कादंबरी लिहिताना नगरकरांकडे त्यांचा स्वतःचा कुमार उभारण्याचे भरपूर स्वातंत्र्य होते. आणि त्यातून उभारलेला कुमार वाचकांच्या मनात खूप दिवस घर करून राहणार हे नक्की. कुमारचं पात्र अत्यंत खुबीने उभारलं आहे. त्याचे अंतःकरण वाचकांसमोर पूर्ण उघडे केले आहे. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा, नैतिक मूल्य, त्याला लाज वाटणाऱ्या गोष्टी, त्याच्या लैंगिक इच्छा- सगळं आपल्यासमोर आहे. त्यामुळे कुमार हे पात्र हे प्रेडिक्टेबल आहे- पण ते चांगल्या अर्थाने. तो आता काय करेल, ह्याचा आपल्याला अंदाज येतो, पण काहीतरी क्लिशे गोष्टी घडतात म्हणून नव्हे, तर कुमारला आपण नीट ओळखतो म्हणून. Maharaj Kumar the character is as close a character can get to being perfect. कादंबरीत बराच फॅन्टसी वाटण्याजोगा भाग आहे. आणि, तो भाग आणि चित्तोडच्या दरबारातील कुटील राजकारण याची किंचितही सरमिसळ होऊ दिली नाहीये. त्यातला फॅन्टसी टाईप भाग- हा बहुतेक मुद्दामून तृतीयपुरुषी वर्णनात लिहिला आहे, आणि इतर भाग मात्र कुमारच्या प्रथमपुरुषी निवेदनात आहे. ककोल्ड अगदी न मिस करण्यासारखं पुस्तक आहे. पुढे मागे पुन्हा एकदा वाचीन असे म्हणतो. 2. स्वाम्प थिंग-
अॅलन मूर या सुप्रसिद्ध (कॉमि)ककार* लेखकाच्या कल्पनेतून साकार झालेलं हे कॉमिक बुक आहे. व्ही फॉर व्हेंडेट्टा, वॉचमेन, द किलिंग जोक हे सुप्रसिद्ध कॉमिक्स त्याच्या नावावर आहेत. मूरने स्वाम्प थिंगला आपल्या लेखणीखाली खाली घेतलं तोपर्यंत असे काही झाले असते- अलेक हॉलंड आणि त्याची पत्नी लिंडा हॉलंड वनस्पतींच्या वाढीवर संशोधन करत असतात, जगातला अन्नाचा तुटवडा सोडवण्यासाठी. पण काही कारणाने तिथे स्फोट होतो का करवला जातो, आणि त्यात लिंडा ठार होते. तर मशाली सारखा जळणारा अलेक त्यांच्या घराजवळच्या स्वाम्प, म्हणजे दलदलीत आग विजवण्यासाठी पळत जातो. त्या दलदलीतल्या पाणवनस्पतींवर त्यांच्या प्रयोगशाळेत बनवलेले रसायन शिंपडले गेले असते. त्याचा परिणाम हा होतो, कि वनस्पतींनी वेढलेला/बनलेला, आणि अलेक हॉलंडच्या आठवणी असणारा प्राणी- स्वाम्प थिंग स्वाम्प बाहेर पडतो. संबंध 'ग्रीन' म्हणजे वनस्पतींशी त्याचा संपर्क असतो. त्यानंतर त्याच्या शरीराचा वापर करून अमरत्वासाठी प्रयत्न करणार व्हिलन, स्वाम्प थिंगचा लिंडाच्या मारेकऱ्यांना शोषून संपवण्याचे सूडपर्व, त्याचा पाठलाग करणाऱ्या फौजा इत्यादी होऊन स्वाम्प थिंगचे हे पर्व त्याला 'स्कल पिअरसिंग' गोळी लागून आणि त्याचे अपेरेंटली देहावसान होऊन संपते. इथे मूर स्वाम्प थिंगची गोष्ट परत सुरु करतो. स्वाम्प थिंगचा तुटला फाटला (मृत?)देह सदरलँड नावाच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या प्रायव्हेट लॅबोरेटरीत फ्रीझर मध्ये पडून आहे. इथे डीसी कॉमिक्सच्या एका जुन्या खलनायकाला पाचारण केले आहे- जेसन वूड्रयू. हे डीसी लोअर मधले बरेच जुने, पण कमी महत्वाचे पात्र असावे. डीसी मध्ये लिहिताना अॅलनला असली पात्रे जाम आवडतात. त्यांच्यासोबत हवे ते करायला स्वातंत्र्य मिळते ना! मूरच्या वॉचमेन या गोष्टीचेपण बहुदा तसेच आहे. त्यातले रोरशॅक हे पात्र बॅटमॅनच्या संकल्पनेला त्याच्या अंतिम सीमेला नेले तर काय होईल , अश्या अर्थाने लिहिले आहे. तर हा वूड्रयू खरेतर झाडांच्या संबंधित असलेला ड्रॅयाड नावाचा प्रकार असतो. हे ड्रॅयाड्स 'ग्रीन'शी, म्हणजे झाडांच्या एकसंध नेटवर्कचा भाग असतात, पण काही कारणाने वूड्रयू यातून बाहेर पडला असतो, आणि पुन्हा त्या जाळ्यात जाणे त्याला जमत नसते. त्यामुळे तो माणसांच्या जगात राहत असतो, आणि बॉटनिस्ट म्हणून प्रसिद्ध झाला असतो. पुन्हा ग्रीनमध्ये परत जाण्याची ओढ आणि झाडं कापणाऱ्या माणसांबद्दल तिटकारा असं त्याचं पात्र आहे. या वूड्रयूला स्वाम्प थिंगचे शवविच्छेदन करायला सदर्लंडनी बोलावले असते. तिथे शवविच्छेदनात दिसणारी गोष्ट वूड्रयूला आश्चर्यचकित करते. स्वाम्प थिंगच्या शरीरात फुप्फुस, मेंदू, यकृत इत्यादी सर्व गोष्टी असतात, पण त्या पण लाकूड, पानांनी बनलेल्याच! त्या अर्थातच काम करत नसतात. वूड्रयूला मग प्लॅनेरीयन वर्म म्हणून एका अळीच्या जातीची आठवण येते. अडथळे पार करायचे शिकलेल्या वर्मचे तुकडे जर नवख्या वर्मला चारले, तर दुसऱ्या वर्मला सुद्धा अडथळे पार करणे शक्य होत असते. थोडक्यात या वर्म्समधून त्यांच्या आठवणी सुद्धा पास होत असतात. वूड्रयूला समजते कि स्वाम्प थिंग हा अलेक हॉलंड नाहीचे मुळी ! हॉलंड तर त्या आगीतच बुडून मेला. हा स्वाम्प थिंग म्हणजे स्वतःला अलेक हॉलंड समजणारं झाड आहे फक्त ! त्या हॉलंडचे अवशेष त्या झाडांसाठी खाद्य बनतात, आणि हॉलंडच्या प्रयोगशाळेतील केमिकल्स मुळे हॉलंडच्या आठवणी आणि ओळख त्या झाडांमध्ये येते, आणि आपल्याला सुपरिचित असणारा आकार ते झाड धारण करते, ज्यातून स्वाम्प थिंग तयार होतो. आणि अर्थात निव्वळ सवय म्हणून असलेल्या मेंदूत गोळी लागून स्वाम्प थिंग ठार होणार नाही, कारण मुळात त्याचा मेंदू दिखावाच आहे! स्वाम्प थिंग निव्वळ मेंदूत गोळी लागल्याच्या शॉकने आणि भितीने जायबंदी झाला ! आणि एव्हाना वूड्रयू आणि सदरलँडचे वाजले असते त्यामुळे वूड्रयू स्वाम्प थिंगच्या फ्रिजमधले तापमान वाढवतो आणि पळून जातो. तापमान वाढल्याने स्वाम्प थिंग पुन्हा उठतो, आणि वूड्रयूचा अहवाल वाचतो. आपण अलेक हॉलंड नाही, आपण अलेक हॉलंड कधीच नव्हतो या सत्यामुळे स्वाम्प थिंग दुःखाने वेडापिसा होतो, आणि त्याला त्रास देणाऱ्या सदर्लंडला यमसदनी पाठवतो. पण काहीतरी करून आपण पुन्हा आधीसारखं होऊ, हे त्याचे स्वप्न भंग झाले असते. ही मूरच्या मालिकेची फक्त सुरुवात आहे. आणि ती कल्पनाच भन्नाट आहे- एक झाड जे स्वतःला माणूस समजतं- आणि त्याचा भ्रमनिरास होतो... *- मूर चांगलाच सोशालिस्ट-अनार्किस्ट आहे.
३. चॉकी- जॉन विंडहॅम
गुडरीड्स जेव्हा चालू केलेलं तेव्हा अगदी सुरुवातीला मला चॉकी रेकमंड झालं होतं. आणि कथा रोचक वाटलेली. आणि कालपरवा दोन दिवसात हि लहानशी कादंबरी हातावेगळी केली. हि गोष्ट आहे मॅथ्यू नावाच्या ११-१२ वर्षांच्या मुलाची. मॅथ्यूला त्याच्या डोक्यात एक आवाज ऐकू येतो हे त्याच्या वडिलांच्या लक्षात येते. (निवेदन वडिलांचेच आहे.) आणि हल्ली मॅथ्यूचे प्रश्न सुद्धा काहीशे विचित्र झाले असतात. जेव्हा मॅथ्यूचे वडील मॅथ्यूचा स्वतःशी संवाद ऐकतात तिथेपण मॅथ्यू कोणाला तरी थोड्याश्या त्राग्यानेच 'महिन्यात ३२ दिवस का बरे नाहीत ? आठवड्यात ८ दिवस का बरे नाहीत ?' अश्या प्रश्नांचे उत्तर त्याला जमेल तसे देण्यात व्यस्त असतो. मॅथ्यूचा शाळेतून सुद्धा असेच रिपोर्ट्स आले असतात- मॅथ्यू भूगोलाच्या शिक्षकांना विचारत असतो-पृथ्वी कुठे आहे ? पण सौर्यमाला कुठे आहे ? पण सूर्य तरी नक्की कुठे आहे ? तर, मॅथ्यूचा वडिलांना समजते कि ह्या सगळ्या गोष्टी मॅथ्यू 'चॉकी' चे समाधान करण्यासाठी विचारत असतो. चॉकी म्हणजे त्याला जो आवाज येत असतो त्याला दिलेले नाव. चॉकी स्वतःबद्दल फार माहिती देत नसते, पण मिळालेली माहिती पण कोणालाही बुचकळ्यात टाकेल अशी असते. यापुढे काही न सांगणे इष्ट- कथा कल्पना आवडल्यास कादंबरी वाचावी लागेल. कादंबरी अत्यंत सहजसोप्या भाषेत आहे. (ककोल्ड नंतर मोठा आराम !) इतकेच नव्हे तर कथाशैली सुद्धा अत्यंत संयत आहे. अश्या प्रकारच्या गोष्टी बहुदा हिंस्त्र, किंवा अतीव दुःखी/भीतीदायक अश्या होत असतात. चॉकी मात्र कुठेही विशेष हिंदकाळे न देता संथ गतीने गोष्ट सांगते. हा संयतपणा वाचायला सुखद आहे. आणि कथा सुद्धा छानच आहे.
In reply to चांगला धागा आणि चांगली समीक्षा. by कंजूस
In reply to चांगला धागा आणि चांगली समीक्षा. by कंजूस
महिन्यात ३२ दिवस का बरे नाहीत ? आठवड्यात ८ दिवस का बरे नाहीत ?'मला देखिल असे प्रश्न पडायचे जसे नउ नंतरच दोन आकडी संख्या दहा का येते ? दहा देखिल एक आकडी संख्या असती व अकरा पहीली दोन आकडी संख्या असते तर काय बिघडले असते वगैरे वगैरे वगैरे… मिपाचे नाव वडापाव असते तर ? इडली पदार्थ सर्वप्रथम कोणी तयार केला वगैरे वगैरे… वर वर पाहता असे प्रश्न प्रस्थापित गोश्टींवर निव्वळ टिका म्हणुन विचारणार्याची हेटाळणी सुरु होते… पण हळुहळु विचारांना यातुन योग्य दिशा मिळाल्यास सहज अनदेख्या झालेल्या गोश्टींची उकल रोचक होते जसे हाताला बोटे दहा म्हणुन नउ नंतर दहा ही दोन आकडी संख्या असावी हे निश्चीत केले तर आकडेमोड शिकणे करणे जास्त सुलभ होते वगैरे वगैरे वगैरे…. असो… पुस्तकांची रोचक ओळख करुन दिली आहे धन्यवाद.
In reply to दोन पुस्तके... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दोन पुस्तके... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसरं 'बारबाला' हे बारबालांच्या आयुष्यावर आधारित वैशाली हळदणकर यांचं आत्मकथन वाचायला सुरु केलं आहे.ही आत्मकथा मी वाचली आहे, अतिशय भयानक आहेत काही प्रसंग.
In reply to ककॊल्ड हे कदाचित भारतीय by साहना
समाजवादी विचारसरणीत कुणी तरी शक्तिशाली आणि विद्वान माणूस सामान्य लोकांकडून त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि आपले निर्णय प्रसंगी इतरांवर हिंसेने थोपवून "ग्रेटर गुड" प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.नाही, हे ओथोरिटेरियन झालं. लिबरटेरियन लेफ्ट पण असते ना. अमेरिकेतला सोशालिस्ट स्ट्रॉमॅन बरणी बघा. तो माओ स्टालिन वैगेरे वाटतो काय ? आता ओझायमंदियास बद्दल. त्याचे कृत्य, अमेरिकेने जपान वर टाकलेल्या अणुबॉंब पेक्षा वेगळे कसे ? कथेचे प्रिमाईस मुळी असे आहे की ओझयमंदियास ने केलेल्या गोष्टीने कमीत कमी लोक मरणार असतात. आता रोर्शाश मुळे सगळंच फसत हे खरं असलं, तरी- १. ओझयमंदियास जगातला सर्वात हुशार माणूस असतो. २. भावनांचा कमीत कमी प्रभाव असलेला आणि देवसदृश्य डॉ. मॅनहॅटनला सुद्धा ओझयमंदियासचं लॉजिक मान्य करावं लागतं. जस्ट गोज टू शो कि ओझयमंदियास आणि अमेरिकेचा अणुबॉंब- ह्या दोन्हींचे उद्दिष्ट जर मनुष्यहानी मिनीमाईझ करणे असेल, तर दोन्ही गोष्टी समान आहेत. त्यात डावे उजवे जरा ओढून ताणून आल्यासारखे वाटते. मूर तुम्हाला आवडतात हे चांगलेच आहे. कुठलीही विचारधारा एक स्पेक्ट्रम असते, एका छत्रीखाली बहुढंगी बहुरंगी लोकं वावरत असतात, हे समजणे महत्वाचे आहे.
In reply to प्रतिसाद आवडला. by कॉमी
एका छत्रीखाली बहुढंगी बहुरंगी लोकं वावरत असतात, हे समजणे महत्वाचे आहे.असल्या भंपक भिकारड्या म्हणण्याला आम्ही काडीची किंमत देत नाही उजवी बाजु सोडुन बाकी सर्व दिसेल तिथेच छाटुन टाकले पायजेल… त्यातच खरे सुख आहे हा सुबोध तुम्हास होइल त्यादिवसापासुन चंद्र अन सुर्य कुमार गणले जाणार नाहीत…
In reply to एका छत्रीखाली बहुढंगी बहुरंगी by गॉडजिला
In reply to अरे हो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उत्तम परिचय. by प्रचेतस
In reply to शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख' by राजेंद्र मेहेंदळे
In reply to नगरकरांचे सात सक्के त्रेचाळीस by श्रीगुरुजी
In reply to टू किल अ मॉकिंगबर्ड वाचलंय. by कॉमी
In reply to नगरकरांचे सात सक्के त्रेचाळीस by श्रीगुरुजी
In reply to कितीतरी ठिकाणी 'तुंबाडचे खोत' by चौकस२१२
In reply to इंग्रजी चालेल का? by टीपीके
In reply to इंग्रजी चालेल का? by टीपीके
In reply to Around India in 80 Trains by कंजूस
In reply to वरील प्रतिसाद कॉपी पेस्ट करताना चुकलं. by कंजूस
Willem knew he wasn't lazy. but the truth was that he lacked the sort of ambition that JB and Jude had, that grim, trudging determination that kept them at the studio or office longer than anyone else. JB’s ambition was fueled by a lust for that future. Jude’s, he thought, was motivated more by a fear that if he didn’t move forward, he would somehow slip back to his past, the life he had left and about which he would tell none of them.
Ambition and atheism: “Ambition is my only religion,” JB had told him.And it wasn’t only Jude and JB who possessed this quality: New York was populated by the ambitiousOnly here did you feel compelled to somehow justify anything short of rabidity for your career; only here did you have to apologize for having faith in something other than yourself.ज्यूडच्या गणिताच्या वयोवृद्ध प्रोफेसरांच्या दफनविधितील दुसऱ्या एका गणिततज्ञाने दिलेली युलॉजी-
So it’s no surprise that Walter’s favorite axiom was also the most simple in the realm of mathematics: the axiom of the empty set.“The axiom of the empty set is the axiom of zero. It states that there must be a concept of nothingness, that there must be the concept of zero: zero value, zero items. Math assumes there’s a concept of nothingness, but is it proven? No. But it must exist.“And if we are being philosophical—which we today are—we can say that life itself is the axiom of the empty set. It begins in zero and ends in zero. We know that both states exist, but we will not be conscious of either experience: they are states that are necessary parts of life, even as they cannot be experienced as life. We assume the concept of nothingness, but we cannot prove it. But it must exist. So I prefer to think that Walter has not died but has instead proven for himself the axiom of the empty set, that he has proven the concept of zero. I know nothing else would have made him happier. An elegant mind wants elegant endings, and Walter had the most elegant mind. So I wish him goodbye; I wish him the answer to the axiom he so loved.”देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत- पण थांबतो. लेखनशैली चांगली आहे पण पुस्तक सहन होण्यापालिकडचे आहे. एकामागून एक भावनिक स्फोट- असे पुस्तकाचे रूप आहे. मोठा धक्का पचवण्यावरच पुस्तक आहे. पण एकामागून एक येणाऱ्या वाईट गोष्टी कोणालाही हताश करून पुस्तक ठेवायला लावतील अश्या आहेत. पण दुसऱ्या बाजूला पुस्तक पकड घेणारं आहे, त्यामुळे थांबत थांबत का होईना, ज्यूड आणि विलेमचे होते काय, यासाठी पुस्तक वाचावे लागले. पण फक्त वेदनादायी घटनांची मालिका इतकाच प्लॉट- हे पचत नाही. लेखनशैली कितीही चांगली असली तर असे उद्दिष्ट असलेले पुस्तक यापुढे उचलण्याचे धारिष्ट्य होणार नाही.
In reply to आवडून न आवडलेले पुस्तक. by कॉमी
In reply to व्यासंगी by जेम्स वांड
राष्ट्र अशीच निर्माण होत असतील नाही का ?
In reply to हे वर्ष by जेम्स वांड
In reply to सध्या by जेम्स वांड
In reply to सर by गुल्लू दादा
In reply to सध्या by जेम्स वांड
सांख्यिकीविषयी जे म्हटलं जातं, की “statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.” याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. बऱ्याच सर्वेक्षण आणि पाहण्यांमधून भारताचं, भारतीयांचं, भारतीय समाजाचं जे चित्रण समोर येतं, ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही.
पुस्तकाची सुरुवात पोलीस केसेस च्या statistics ने होते. उदाहरण म्हणजे दरवर्षी किती प्रकारचे किती गुन्हे घडले, याचे आकडे National Crimes Records Bureau तर्फे प्रकाशित केले जातात. पण गोम अशी आहे की ते आकडे FIR मध्ये लिहिलेल्या गुन्ह्यांवर आधारित असतात. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीचं अपहरण करून हत्या केली, तर त्याची NCRB मध्ये नोंद खून अशी होते. अपहरणाची नोंद होत नाही.
किंवा घरच्यांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न होणाऱ्या घटनांत मुलीकडचे लोक मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवतात. नंतर उघडकीस येतं की ती स्वखुशीने गेलेली असते, पण याची नोंद अपहरण म्हणून झालेली असते. आणि या अपवादात्मक घटना नसतात. बहुसंख्य असतात.
अशा अनेक धक्कादायक गोष्टी लेखिकेने स्वतः विविध सर्वे आणि सांख्यिकीचा आणि खऱ्या परिस्थितीचा अभ्यास करून लिहिल्या आहेत.
त्यामुळे असे सर्वे आणि सांख्यिकी वरून मीडिया स्वराच मत बनवतात आणि ते आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असे आकडे सांभाळून वाचणेच योग्य.In reply to Whole Numbers and Half Truths - Rukmini S by तुषार काळभोर
In reply to पहिल्या लॉकडाऊनपासून सुरू by प्रचेतस
In reply to ग्रीकमय by कॉमी
In reply to A Long Way Home by स्मिताके
In reply to लॉकडाऊन पासून सुरू केलेले by प्रचेतस
In reply to लॉकडाऊन पासून सुरू केलेले by प्रचेतस
In reply to आता डॅन ब्राऊनचे 'ओरिजिन' सुरू केलेय. by तुषार काळभोर
In reply to ही सगळी पुस्तके माझ्या संग्रही आहेत by धर्मराजमुटके
In reply to ओरिजिन अगदी अलीकडचं आहे. by प्रचेतस
In reply to ओरिजिन अगदी अलीकडचं आहे. by प्रचेतस
In reply to ही सगळी पुस्तके माझ्या संग्रही आहेत by धर्मराजमुटके
In reply to डॅन ब्राउनच्या ओरिजिन नंतर by प्रचेतस
In reply to भाई by जेम्स वांड
In reply to कालिदास जबरदस्तच आहे. by प्रचेतस
In reply to डॅन ब्राउनच्या ओरिजिन नंतर by प्रचेतस
In reply to धन्यवाद. by कॉमी
In reply to महाराष्ट्र राज्य साहित्य by प्रचेतस
In reply to महाराष्ट्र राज्य साहित्य by प्रचेतस
चांगला धागा आणि चांगली समीक्षा.