खोल ह्रदयात उमटला, नादमय विणेचा झंकार,
सावळे रूप विठाईचे, जाहले नयनात साकार !!
मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर,
वारक-यांची वाट पाहत, उभा ठाकला विठू वीटेवर !!
टाळ मृदुंगाची धून, कानी गुंजते मधुर ,
दर्शनाची ओढ लागे, पाय चालती भर्भर !!
दोन वरीस वारी नाही, आसावले भेटीस मन,
कामात चित्त लागेना, वारीतच गुंतले ध्यान !!
वारीतला गुलाल बुक्का, उधळण भक्तीरंगाची,
पाहतसे वाट भक्तांची, चंद्रभागाही पंढरीची !!
उदास तु ही पांडुरंगा, रूक्मिणीही उदासली,
वैष्णवांच्या मेळ्यावीना, सूनी पंढरी भासली !!
एकच मागणे तुझ्या पायी, संकट हे आता टळू दे,
वातावरण सारे निवळू दे, भक्तांना दर्शन मिळु दे !!
पुढच्या वारीत आता , गर्जु दे नाम "पांडुरंग" ,
तुझ्या दर्शनाने नीवू दे, आम्हा भक्तांचे अंतरंग !!
-वृंदा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3355
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा !
विठ्ठलाच्या कानात मत्स्य
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काहीही हं वल्ली.
In reply to विठ्ठलाच्या कानात मत्स्य by प्रचेतस
मत्स्य आणि मकर ( दोन्ही जलचर)
In reply to काहीही हं वल्ली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हं
In reply to मत्स्य आणि मकर ( दोन्ही जलचर) by प्रचेतस
हा केवळ ढेरे यांचा सिद्धांत
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद !
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे