बघा सुटते का सोडवून!!!!!!!!!
कोर्टाची अडचण...
कोण्या एका काळी एका देशात एक खूप नावाजलेला प्रसिद्ध वकील होता...युक्तिवाद करण्यात त्याचा हातखंडा होता...त्याच्याकडे शिकायला म्हणून खूप लोक वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार होते...पण त्याला एकच विद्यार्थी हवा होता जो त्याचा वारसा समर्थ पणे चालवू शकेल...
एक दिवशी एका गरीब विद्यार्थ्याने त्या वकिलाला विनंती केली की त्याने त्याला शिकवावे तो पुढे जाऊन त्याच्या हुन मोठा वकील बनेल आणि पहिली केस जिंकल्यास त्याचे मानधन गुरुदक्षिणा म्हणून देईल .
वकिलाला त्याचा आत्मविश्वास आवडला त्याने त्या मुलाला आपला शिष्य म्हणून स्वीकारून एकदम तरबेज केले. आणि साऱ्या देशात ही गुरु शिष्याची जोडी नावारूपास आली..
लवकरच हा वकील निवृत्त होऊन आपला सर्व कारभार या तरुणाच्या हातात द्यायचा विचार करत होता.
पण एक दिवशी या तरुणाने घोषणा केली...की या पुढे तो वकिली पेशा करणार नाही तर तो वकिली पेशाचे शिक्षण देणारे संस्थान उभे करून सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देईल ..
हा निर्णय त्या वकिलाला आपल्यासोबत झालेला धोका वाटला आणि त्याने त्या तरुणाला न्यायालयात खेचले..आणि तिथे वकिलाने युक्तिवाद केला की तरुणाने त्याला फसवले आणि सर्व वकिली शिक्षण घेऊन आता तो वकील न बनता शिक्षक बनत आहे..त्यामुळे त्याने आपली शिक्षण घेतल्याची फी द्यावी
यावर तरुणाने युक्तिवाद केला की मी गुरुजींना मी वकील बनेलच असे कोणते ही वचन दिले नव्हते मी फक्त माझ्या आयुष्यातील पहिली न्यायालयीन केस मी जिंकलो तर फी देईल असे म्हणलो होतो ...
पण मी आता वकील नाही शिक्षक आहे त्यामुळे मी केस लढणार नाही आणि त्यामुळे मी गुरुजींना पैसे देणार नाही..
या वर गुरु वकिलाने युक्तिवाद केला की त्याचं म्हणणे बरोबर आहे तो शिक्षक आहे पण सध्या तो स्वतः ची बाजू मांडायला न्यायालयात वकील म्हणून आला आहे आणि जर त्याचे म्हणणे आपणास मान्य असेल तर मी केस हरलो आहे आणि तो केस जिंकला आहे त्या मुळे वकील म्हणून तो पहिली केस जिंकला आहे त्यामुळे त्याने मला पैसे द्यावेत....
तरुण यावर असे म्हणतो की...गुरुजींचे म्हणणे एकदम योग्य आहे
परंतु मला न्यायालयात कोणत्या कारणास्तव खेचले आहे हे लक्षात घ्या! मी गुरुजींना पैसे देणं लागतो की नाही या मुद्द्यावर
माझे म्हणणे आहे की मी पैसे देणं लागत नाही ...मग जर मी केस जिंकलो तर मी पैसे देणं लागत नाही
आणि जर मी केस हरलो तर माझ्या आयुष्यातील पहिली केस मी हरल्यामुळे मी गुरुजींना पैसे देणे लागत नाही...
गुरुजी वकील यावर म्हणतात की ह्याच हिशोबाने जर केस पैसे देण्याच्या* *बंधनबद्दल असेल तर मी केस जिंकलो तर* *मला पैसे मिळायला हवेत
आणि मी केस हरलो म्हणजे तो केस जिंकला मग पहिली केस जिंकल्यामुळे मला पैसे मिळाले पाहिजेत.
काय करायचं काय ह्या निकालात .??????
| लेखनविषय: |
|---|
वाचने
18826
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
पहिली केस शिक्षणाची फी
In reply to :) by गॉडजिला
ज्या क्षणी तो वकील बनून आपली
In reply to पहिली केस शिक्षणाची फी by एस.बी
म्हणुनच जर ही केस गुरु जिंकला
In reply to ज्या क्षणी तो वकील बनून आपली by गॉडजिला
दोन उत्तरं.
गॉड जिला यांच्या प्रतिसादाला
In reply to दोन उत्तरं. by कॉमी
एक कोडं (पाहा जमतंय का
हे कोडं सुटल्यात जमा नाहीये गॉड जिला भाई ...
In reply to एक कोडं (पाहा जमतंय का by गॉडजिला
हे कोडं सुटल्यात जमा नाहीये
In reply to हे कोडं सुटल्यात जमा नाहीये गॉड जिला भाई ... by एस.बी
वकिलाला त्याचा आत्मविश्वास
paradox
हा पॅराडॉक्स कोर्टात उभे
In reply to paradox by गॉडजिला
हा पॅराडॉक्स ग्रीक काळातल्या
In reply to हा पॅराडॉक्स कोर्टात उभे by कॉमी
केस हारली का जिंकली चा संबंध नाही कारण वकिलीचा संबंध नाही
शिवाय
In reply to केस हारली का जिंकली चा संबंध नाही कारण वकिलीचा संबंध नाही by उन्मेष दिक्षीत
प्रश्नातला मुद्दा हुकतो आहे.
In reply to केस हारली का जिंकली चा संबंध नाही कारण वकिलीचा संबंध नाही by उन्मेष दिक्षीत
काय आहे
In reply to प्रश्नातला मुद्दा हुकतो आहे. by कॉमी
नाही, कोड्याचा मुद्दा एका
In reply to काय आहे by उन्मेष दिक्षीत
बर करार झाला असं समजु
In reply to नाही, कोड्याचा मुद्दा एका by कॉमी
जजमेंट.
In reply to बर करार झाला असं समजु by उन्मेष दिक्षीत
९*३=२७ हे बरोबर.
In reply to जजमेंट. by कॉमी
पोऱ्याने परत दिले ते का वाढवा
In reply to ९*३=२७ हे बरोबर. by गॉडजिला
पोऱ्याने परत दिले ते का वाढवा
In reply to पोऱ्याने परत दिले ते का वाढवा by कॉमी
तुम्ही काय म्हणताय, कि
In reply to ९*३=२७ हे बरोबर. by गॉडजिला
(१०-१)*३ करून त्यात +३ करायचं
In reply to तुम्ही काय म्हणताय, कि by कॉमी
कॉमी सेठ यु शुड नॉट एक्वेट मल्टिप्लिकेशन विथ अॅडीशन
In reply to (१०-१)*३ करून त्यात +३ करायचं by गॉडजिला
[(१०-१)*३]+३=[(१०*३)-(१*३)]+३
In reply to (१०-१)*३ करून त्यात +३ करायचं by गॉडजिला
(१*३)]+३१०*३ ही गोष्ट (१०-१)*३+३ अशी अवघड का करता ऑ ? १ रुपया कुठं गेला तेव्हढं सांगा, (डेव्हील्स ऍडव्होकेट मोड ऑफ.)(१०-१)*३ करून त्यात +३ करायचं
In reply to [(१०-१)*३]+३=[(१०*३)-(१*३)]+३ by कॉमी
प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये
In reply to तुम्ही काय म्हणताय, कि by कॉमी
प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये
In reply to तुम्ही काय म्हणताय, कि by कॉमी
मित्रांनी हिशोब केला तर ९x३=
In reply to प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये by गॉडजिला
@ कॉमी
In reply to जजमेंट. by कॉमी
शिक्षकाला आपल्यासोबत अन्याय्
In reply to @ कॉमी by उन्मेष दिक्षीत
@ कॉमी
In reply to शिक्षकाला आपल्यासोबत अन्याय् by कॉमी
शेवटी गुरु ला शून्य मिळाले
शक्यता २) न्यायालयाने गुरु
In reply to शेवटी गुरु ला शून्य मिळाले by चौकस२१२
सर्वज्ञानी काय म्हणतायत
गुरूस पदरी शून्य पैसे
त्यामुळे त्याने आपली शिक्षण
(अवांतर.)
In reply to त्यामुळे त्याने आपली शिक्षण by गॉडजिला
त्यासाठीच केस दाखलकरू शकतो म्हटले आहे
In reply to (अवांतर.) by कॉमी
वकील देणे बंधनकारक नाही.
आणखी एक कोडे विचारतो.
सर्वप्रथम प्लुटार्क ने ही
सध्याच्या काळचे याच्या विरोधी
In reply to सर्वप्रथम प्लुटार्क ने ही by विजुभाऊ
बर तुमचं
निकाल