काय पाहायचं कळेना? हे पाहा (१) - वाईल्ड वाईल्ड कंट्री
वाचने
9016
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
बाकि लेख उत्तम.
कुणा गुरुने स्वर्णिम भविष्याचे स्वप्न दाखवून हजारो मानवांना त्यांच्या नकळत दास बनवणे हे एकाच वेळी मानवाच्या अद्भुत बौद्धिक क्षमतेचे आणि त्याच बुद्धीच्या क्षणिक ठिसूळतेचे निदर्शक आहे, हाच या 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' चा धडा.एक व्यक्ति / गुरु हे करतो हीच खरी भ्रामकता... वास्तव हे असते की हे सर्व समाज करत असतो व एका व्यक्तिकडे त्याचे नेत्रुत्व जाते, इतकेच. बाकी शिला म्हणजे अत्यंत आक्रमक आणि काहिसं क्रुर भासेल असं पण जबरदस्त प्रकरण आहे खरे...
In reply to नेमका धडाच चुकिचा by गॉडजिला
मालिका बघावी लागेल. श्री गिरीश कुबेर यांच्या 'युद्ध जीवांचे' या पुस्तकात रजनीशपुरंम बद्दल वाचले होते. तेव्हा प्रचंड धक्का बसला होता.
वाईल्ड वाईल्ड कंट्री एकदम जबरदस्त आहे. त्यातला ओशो कडचा वकील स्टिफन किंग सारखा दिसतो हे निरीक्षण नोंदवतो.
In reply to वाईल्ड वाईल्ड कंट्री एकदम by कॉमी
त्याचे कार्य तरी समांतर होते... डायनामिक होते पण समांतर होते... म्हणता येइल
In reply to ओशोला डावखुरा का म्हटले गेले नाही यावर काही माहिती आहे का ? by गॉडजिला
ओशोने स्वतः अनेकदा 'I'm the rich man's guru' असं म्हटलंय. डाव्या विचारधारेत ज्या कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या उत्थानाचा विचार केला जातो, तो वर्ग ओशोने स्वतःसाठी राबवूनच घेतला. सबब! प्रसंगी ओशोला भांडवलशाहीचे अपत्य म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
In reply to ओशोला हिरे प्रिय होते. by अनुस्वार
मग कम्युन उभे केले कशाला ?
मला वाटते कम्युन फ्लॉप गेले म्हणून डावे जवळ करत नसावेत कारणं तो उघड उघड डाव्या विचारसरणीचा पराभव ठरतो
In reply to मग कम्युन उभे केले कशाला ? by गॉडजिला
कोणती डावी विचारसरणी नक्की ? अनेक डाव्या विचारसरण्या आहेत.
आणि काय डाव्या तत्वांखाली कम्युन चालवले कल्पना नाही. पण पुण्यातला मल्टी मिलियन डॉलर धंदेवाईक कम्युन अजूनसुद्धा चांगला जोराने चालू आहे. त्यात तर बुवा काही डावी गोष्ट ठळकपणे दिसत नाही. ओरेगॉन मध्ये तिथले रहिवासी आणि शिलाने एकमेकांच्या काड्या केल्या नसत्या तर नक्की कम्युन चाललंच असतं. कम्युन मधले रहिवासी खुशच तर होते, तो नैसर्गिकरित्या बंद पडला असे म्हणणे अयोग्य ठरेल. इन फॅक्ट चालू असताना सेल्फ स्स्टेनिंग, रहिवाश्याना स्वर्ग वैगेरे वाटणारच होता.
In reply to कोणती डावी विचारसरणी नक्की ? by कॉमी
पुण्यातला मल्टी मिलियन डॉलर धंदेवाईक कम्युन अजूनसुद्धा चांगला जोराने चालू आहेनाही पुन्यातला कम्युन केंव्हाच बंद पडला... चालु आहे ते कायद्याने रिसोर्ट आहे. पैसे द्या व रहा. रिसॉर्टमधे जे काही केले जाते त्याची जबाबदारी मालकाची नसुन ग्राहकाची असते... कम्युन बंद होउन जमाना झाला. ओशोने देव देव करा सान्गितले नाही, सर्वाना समान हक्क आहेत असे सांगितले... जगातील बहुतांश हिप्पि चळवळी अशाच अस्तात व त्यातील जे सदस्य मुल श्रिमंत असतात त्यांच्या पैशावर समुदाय उपभोग घेत हिप्पि चळवळ जगतो... जरी तो पैशाच्या मागे नसतो... ओर्गॉनमधील कम्युन हा एक अनोखा प्रयोग होता पद्दुचेरी जवळील ओरोविल्ल देखिल असाच नो मनी, पोलिटिक्स अन रिलिजनचा अनोखा प्रयोग आहे पण त्यालाही काळा पैसा लपावयला वापर, खुन, बलात्कार, बाल लैगिक शोषण यांस्म्दर्भात आरोप ही काळी किनार आहेच... पण मुख्य चर्चेचा मुद्दा कम्युनचे यश हा नसुन त्याची शिकवण डावीकडे झुकती आहे की नाही हा आहे
In reply to ओशोला डावखुरा का म्हटले गेले नाही यावर काही माहिती आहे का ? by गॉडजिला
ओशोबद्दल या मालिकेपलिकडे मला काही माहिती नाही. त्याचे विचार डावे का उजवे कल्पना नाही.
In reply to ओशोबद्दल या मालिकेपलिकडे मला by कॉमी
व आपले मत नोंदवावे ही विनंती...
ओशोचा पुण्यातल्या कोरेगावपार्कचा आश्रम बघायची इच्छा होती. सांडपाणी नाला फिरवून ,झाडे लावून किमया केली होती म्हणतात. बायोटेक्नोलजी.
युनाइटेड स्टेट्स मध्ये असे "कल्ट " असणे हे नवीन नाही .. मागे ते अमिश सारखेच असोत किंवा डेव्हिड कुरेश सारखे ... परंतु हे दोन्ही आणि इतर सुद्धा ख्रिस्ती धर्माच्या आसपास असलेलं आहेत / होते या बाबतीत प्रथमच बिन ख्रिस्ती संबंधित वाधु लागला .. त्यामुळे कदाचित " गॉड आणि गन" वली अमेरिका "जास्त" अस्स्वस्थ झाली कि काय? + हा नवीन "कल्ट " लीडर गौरवर्णीय नाही ? हा मुद्दा यात होता का ? कितपत होता ? यावर काही भाष्य असले तर बघायला आवडेल !
या शिवाय धर्म म्हणून मान्यता पावलेले पण ज्यांच्यावर कल्ट असल्याचे आरोप केले जातात ते म्हणजे " चर्च ऑफ सायांतलोजी "
In reply to युनाइटेड स्टेट्स मध्ये असे by चौकस२१२
निदान मालिकेत तरी दाखवला नाही. परंतु 'कल्ट'च्या बाबतीत ओशो 'लॅन्डलाईन'च्या जमान्यात '५जी' वेगाने वाढत होता. मालिका पाहून इतर 'कल्ट' आणि 'रजनीशीइजम' यांतले साम्य आणि विरोधाभास जास्त प्रकट होतील.
अभार, चांगली ओळख करुन दिलीय. नक्की पाहीन.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद. दुसरा भाग पहातोय. अजून तरी ओशोंनी जे केलं ते अजिबात चुकीचं वाटत नाहीये. 80000 एकर खडकाळ wasteland चं त्यांनी हरितजमिनीत परिवर्तन केलं. पण केवळ आपल्या पेक्षा वेगळी विचारसरणी म्हणून स्थानिक त्यांना विरोध करतायत असं दिसतंय. जर उपर्यांनी येऊन तिथली स्थानिक जमीन ताब्यात घेऊ नये असं असेल तर अमेरीकन्स नी रेड इंडियन्स बरोबर काय केलं होतं? तेव्हा कुठे होता राधासुता तुझा धर्म? बाकी याला विरोध ख्रिस्ती धर्मवेड्या अमेरिकन गावकऱ्यांकडून झालेला दिसतोय. यांचा धर्म देवाचा आणि बाकीचे धर्म, cult म्हणजे सैतानाचे काय? अमेरिका बाहेरच्या देशात पैशाने सरकारे विकत घेते, वॉलमार्ट आणून लोकल उद्योग धंद्यांची वाट लावते तेव्हा काय होतं ते कळलं ना? मला जराही सहानुभूती वाटत नाहीये या अडाण्यांबद्दल.
नेमका धडाच चुकिचा