मी मिपावर सुमारे ९ वर्षे आहे .या दरम्यान काही कट्टे झाले त्यात मी सामील होतो. मी मुळातच व्यक्तिपूजक वा मूर्तिपूजक नसल्याने मी मिपावर तसे खरडवही ,खरडफळा असे वापरून माझा दरबार तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. सबब कट्टा असल्यावर " आहे कसा आननी ? " अशी मला काही उत्सुकता कुणाबद्दल नसे. तसेच माझ्या प्रोफाईल मध्ये माझे नावासकट आवडी व नावडी सुद्धा स्पष्टपणे लिहिले होते .माझ्या लेखनातून माझे व्यक्तित्व लोकांना पुसटपणे कळले असेल इतकाच तो काय स्वार्थ मी साधलेला आहे. मिपावर प्रथमपुरुषी एकवचनी काही लिहिलेले लोकांना फारसे आवडत नाही असा माझा अभ्यास आहे ! " मी बोटीवर होतो तेंव्हा ! " या प्रकारचे लिखाणाची मला ऍलर्जी नाही कारण एकादा आगळा वेगळा अनुभव कथन करताना " मी" हे सर्वनाम अपरिहार्यपणे येणारच याची मला जाणीव आहे .
आता हे "मी पुराण" बाजूला ठेवून मग कट्ट्यात काय साधते असे मला विचाराल तर फारसे काही नाही असे माझे उत्तर आहे. मग कट्टे च नसावेत का ? याला माझे तर असावेत असे आहे ! याचे कारण अलिकडे आपल्याला व्हॉटस ऐप ,फेसबुक ई साधनानी प्रकट होता येत असले तरी प्रत्यक्ष सातमजली हसण्याची बरोबरी स्मायली करून शकत नाही असते माझे मत आहे.( असं हास्य अनुभवायचे असेल तर अतृप्त आत्मा यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधावा ) आपण आपल्या सारखा माणूस शोधायचा प्रयत्न आयुष्यभर करीत असतो व तो सापडणे सोपे नाही कारण एखादा माणूस विद्वान असतो पण अहंकारी असतो . एखादा नम्र असतो पण त्याचा कशावरच अभ्यास नसतो ,एखादा एका ठराविक विषयापलीकडे आयुष्याला काही अर्थ आहे हे याची जाणीव नसलेला असतो उदा वर्कोहोलिक महत्वाकांक्षी माणसे. काहींना कलासक्त पणाची ऍलर्जी असते पण ते तंत्रकुशल असू शकतात. यातून काहीतरी सबस्टन्स वाला आहे पण निरागस नम्र आहे असा माणूस क्वचितच सापडतो ( उदा
चित्रगुप्त ) ."गाना मत गाओ ऊस मैफिलमे जो मैफिल ही नही " असे गाणे शिकणाऱ्या माणसाला सांगितले जाते त्याच्या मागे उस्तादांचा काही अनुभव असतो हे नक्की ! जेष्ठ नागरिकांच्या कट्ट्याला जाउन बसले तर "मोदी कुठे चुकले ते कसे महान आहेत ,आमचा मुलगा ना पहिला गधा आहे दुसऱ्यांना काय नावे ठेवायची?" असे संवाद ऐकू येतात ".शतेषू जायते शूर: सहस्त्रेषु च पंडित: वक्ता दशसहस्त्रेषू दाता भवती वा न वा " किंवा इतर ताप शतानि यदृच्छया वितरतानि सहे चतुरनन अरसिकेषू कवित्व निवेदनं शिरसि मा लिख मा लिख " हे आपल्याला बरेच काही शिकवून जातात.
सबब कट्टे करायचे ते विषय निवडून करावे .त्या विषयात ज्यांना काही समजते आहे अशाना व ज्यांना काही येते आहे अशाना सामील केल्यास मजा येईल .उदा फोटोशॉप मध्ये मला बरेच काही समजते पणा " अभ्या " स्पा " यांना काही जास्त येते अशा लोकांची मस्त मैफल रंगू शकते. असा प्रयोग मी व्हॉटसऐप वर " अभ्या " शी करीत असतो .त्यातून त्याच्या सूचना व कौतुक मला उपयुक्त ठरते. मला १८५७ पेक्षा जुन्या इतिहासात आजिबात रस नाही त्यामागे माझी ठाम भूमिका अशी आहे की आपण आज जे जीवन जगतो त्याचा सर्व पाया फ्रेंच राज्यक्रान्ती व औद्योगिक क्रान्तीने रचला आहे . अशा वेळी अशोकाला बौद्ध धर्म का स्वीकारावासा वाटला या विषयात मला रस नसल्याने मी त्या जागी येणारच नाही पण अशोक कालीन वास्तुरचनेचे तंत्र असा विषय असला तर मी नक्की तो कट्टा स्वीकारेन . कारण मला वास्तू रचनेशी जे नाते असावेसे वाटते ते पार स्टोन हेंज काळापर्यंत जाते .ते कालनिरपेक्षा सत्ता निरपेक्ष असे आहे. हंपीत मूर्ती आहेत म्हणून मला हंपीत रस आहे व ओरछा मध्ये त्या नाहीत म्हणून मला रस नाही असे माझे होत नाही . भारतीय मूर्तिकला ही अनोटॅमी शी शत्रूत्व राखून आहे तरी त्यातील कलाकुसर मला भावते पण युरोपमधील संगमरवरी मूर्तिकलेबद्दल चा माझा आदर भारतीय मूर्तिकलेपेक्षा अजिबात कमी नाही.
याने काय होईल ? कमितकमी वेळात अधिकात अधिक देवाण घेवाण व तीत जाणते व निष्णात यांचा संगम झाल्याने गुणवत्ता वाढीस लागेल.
वाचने
15572
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय.
...
इर्शाद इर्शाद
चौरासाहेब, मनोगत आवडले.
@चौरा,मस्त लिहिले आहे.
फेसबुकवर ...
आंब्याचा सीझन असल्याने कट्टे
आता हे "मी पुराण" बाजूला
हा प्रतिसाद
In reply to आता हे "मी पुराण" बाजूला by सतिश गावडे
हो आपण भुलेश्वरला गेलो होतो
In reply to हा प्रतिसाद by चौकटराजा
म्हण्जे कट्ट्याचे ३ टप्पे /
In reply to हो आपण भुलेश्वरला गेलो होतो by सतिश गावडे
आपल्यामुळे एका नव्या मिपाची ओळख होते आहे... लइ भारी.
In reply to हो आपण भुलेश्वरला गेलो होतो by सतिश गावडे
मला खरोखर आवड्लेला कट्टा
In reply to हो आपण भुलेश्वरला गेलो होतो by सतिश गावडे
+१
+१
In reply to +१ by हेमंतकुमार
असे पहा..
In reply to +१ by चौथा कोनाडा
असे पहा..
In reply to +१ by चौथा कोनाडा
प्रश्न.
टेक्निकली शक्य आहे
In reply to प्रश्न. by कॉमी
आभासी जगांत वावरतांना काय भान ठेवले पाहिजे?
कट्टा कुठेही होतो.
कुणाशी बोलायचेच नाही.
In reply to कट्टा कुठेही होतो. by कंजूस
मलाही ही गंमत वाटलेली.
In reply to कुणाशी बोलायचेच नाही. by गॉडजिला
माझे धोरण
In reply to कट्टा कुठेही होतो. by कंजूस
हा हा..
In reply to माझे धोरण by चौकटराजा
असहमत..
@गणेशा: तुम्ही म्हणता तसे कट्टे असावेतच आणि विषयानुसारही असावेत.
In reply to असहमत.. by गणेशा
वाह
In reply to असहमत.. by गणेशा
गणेशा
In reply to असहमत.. by गणेशा
✅
एकदम समर्पक !!!निखळ.. सरळ.. साधे कट्टे मनाला आनंद देतात.
In reply to असहमत.. by गणेशा
ज्याला जमत त्याने तो online
@Bhakti: कल हो ना हो
In reply to ज्याला जमत त्याने तो online by Bhakti
:)
In reply to @Bhakti: कल हो ना हो by चित्रगुप्त
@ Bhakti : कल हो न हो.. चौरा आपल्यातून गेले.
In reply to ज्याला जमत त्याने तो online by Bhakti
+++111
In reply to @ Bhakti : कल हो न हो.. चौरा आपल्यातून गेले. by चित्रगुप्त
@चित्रगुप्त काका,खरच हे खुप
In reply to @ Bhakti : कल हो न हो.. चौरा आपल्यातून गेले. by चित्रगुप्त
कट्टा
=)) =)) =)
In reply to कट्टा by प्रसाद गोडबोले
कहर =))
In reply to कट्टा by प्रसाद गोडबोले