वॉटरगेट (भाग ३)
वॉटरगेट (भाग १)
वॉटरगेट (भाग २)
______________________________________________________________________________
वॉटरगेट कॉम्प्लेक्स हा एकूण १० एकर जागेत वसलेला ६ मोठ्या इमारतींचा समूह होता. हा काँप्लेक्स वॉशिंग्टन डीसी मधील फॉगी बॉटम परिसरात आहे. फॉगी बॉटम हे एक मेट्रो स्थानक आहे. त्यानंतर येते फॅरॅगट वेस्ट आणि त्यानंतरचे स्थानक मॅकफर्सन स्क्वेअर हे व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ आहे. व्हाईट हाउस साधारणपणे वॉटरगेट कॉम्प्लेक्सपासून पूर्वेला २ किमी अंतरावर आहे. व्हाईट हाऊस पासून जवळच्या परिसरात अमेरिकेच्या संसदेची इमारत कॅपिटॉल हिल आहे. इतक्या महत्त्वाच्या परिसरात असा गुन्हा घडणे आश्चर्यकारक होतेच पण धाडसाचे सुद्धा होते.
वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वुडवर्डला या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे असा संशय येऊ लागला होता. आता त्याचा सहकारी कार्ल बर्नस्टीन हा सुद्धा या प्रकरणाचा छ्डा लावण्यास त्याच्याबरोबर काम करू लागला. या दोघांनाही त्यांचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने पूर्ण सहकार्य व स्वातंत्र्य दिले.
बॉब वुडवर्डने येल विद्यापीठातून १९६५ मध्ये पदवी मिळविली होती. नंतर अमेरिकेच्या नौदलात कम्युनिकेशन्स ऑफिसर या पदावर ५ वर्षे काम करून त्याने पत्रकारिता सुरू केली. १९७१ मध्ये तो वॉशिंग्टन पोस्ट दैनिकासाठी काम करू लागला.
वॉटरगेट प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असा संशय येताच वुडवर्ड व त्याचा सहकारी कार्ल बर्नस्टीन यांनी प्रारंभीच्या काळात बर्याच संबंधित लोकांना भेटून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. यासाठी दैनिकाची तत्कालीन मालक कॅथरीन ग्रॅहम हिने पूर्ण प्रोत्साहन दिले. व्हाईट हाउसमधील निक्सनचा सहाय्यक अधिकारी अलेक्झांडर बटरफिल्ड याच्याशी त्यांनी सुरूवातीच्या काळात संपर्क साधला व त्यानेही त्यांना हवी असलेली काही माहिती दिली.
एखाद्या प्रकरणाचा शोध घेत असताना योग्य त्या माणसांशी संबंध प्रस्थापित करून, त्यांचा विश्वास प्राप्त करून, वारंवार प्रयत्न करून माहिती मिळवायची असते. वुडवर्ड व बर्नस्टीन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, अनेकांशी बोलून शेवटी योग्य त्या माणसे शोधून प्रचंड माहिती मिळविली.
त्यांच्या सुदैवाने आणि योगायोगाने त्यांना एक ऑफिसर भेटला ज्याने अत्यंत गुप्तता राखून त्यांना खूप महत्त्वाची गुप्त माहिती पुरविली ज्यामुळे हे सर्व प्रकरण बाहेर येण्यास मदत झाली. वुडवर्ड व बर्नस्टीन यांनी नंतर या संपूर्ण प्रकरणावर "All the President's Men" हे अत्यंत गाजलेले पुस्तक लिहिले. या पुस्तकावर याच नावाने १९७६ मध्ये एक चित्रपट तयार झाला ज्यात रॉबर्ट रेडफोर्डने बॉब वुडवर्डची व प्रसिद्ध अभिनेता अभिनेता डस्टिन हॉफमनने कार्ल बर्नस्टीनची भूमिका केली होती. (हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे, परंतु तो सशुल्क आहे). या चित्रपटाला १९७७ मध्ये ऑस्करसाठी ८ नामांकने मिळाली होती व सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असे ४ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.
या पुस्तकात या अज्ञात ऑफिसरचे नाव जाहीर न करता त्याचा उल्लेख "Deep Throat" या नावाने केला आहे कारण त्याचे नाव त्याच्या मृत्युपर्यंत जगासमोर न आणण्याचे वचन वुडवर्ड व बर्नस्टीनने दिले होते व २००५ पर्यंत त्यांनी आपले वचन पाळले. डीप थ्रोट आणि वुडवर्ड-बर्नस्टीन द्वयीने कमालीची गुप्तता बाळगली होती. जेव्हा जेव्हा त्यांना डीप थ्रोटला भेटावेसे वाटे तेव्हा वुडवर्ड आपल्या बाल्कनीतील फुलांच्या कुंडीत एक लाल रंगाचा झेंडा खोचून ठेवायचे. डीप थ्रोटला जेव्हा यांना भेटावेसे वाटे तेव्हा तो वुडवर्डकडे येणार्या वृत्तपत्राच्या २० व्या पानावर एक वर्तुळ काढून त्यावर घड्याळाचे चित्र काढून भेटण्याची वेळ दाखविलेली असायची. त्यानुसार बहुतेक वेळा ते मध्यरात्री २ च्या आसपास एका अज्ञात अंडरग्राउंड गॅरेजमध्ये भेटायचे. डीप थ्रोट एफबीआय मध्ये काम करीत होता व त्याला एफबीआयने गोळा केलेल्या माहितीची पूर्ण कल्पना होती. त्यांच्या गुप्त भेटी फार थोडा वेळ चालायच्या. त्याने त्यांना कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे दिले नव्हते. आपल्या भेटीत तो वुडवर्ड-बर्नस्टीन जोडीने जमा केलेल्या माहितीची शहानिशा करायचा व त्यांना काही टिप्स सुद्धा द्यायचा. अशाच एका भेटीत त्याने "Follow the money" असा सल्ला दिला होता. काही काळानंतर "तुमचा जीव धोक्यात आहे" हा इशारा सुद्धा दिला होता. कालांतराने एफबीआयला समजले की CREEP ने गुप्तपणे बाजूला ठेवलेल्या Secret Slush Fund मधून सर्व ५ चोरट्यांच्या खात्यात प्रत्येकी ५०,००० डॉलर्स जमा करण्यात आले होते. हा फंड सांभाळणार्या ज्युडिथ होबॅकला या ट्रांझॅक्शन्विषयी संशय आल्यानंतर तिनेच एफबीआयला याविषयी माहिती दिली होती. ही माहिती डीप थ्रोटला असल्याने त्याने सूचक शब्दात वुडवर्ड-बर्नस्टीनला याविषयी सांगितले होते. एका भेटीत त्यांनी डीप थ्रोटला व्हाईट हाउसमध्ये काम करणार्या व ज्याचा दूरभाष क्रमांक चोरट्यांकडील डायरीत सापडला होता त्या होवार्ड हंट विषयी विचारले. डीप थ्रोटने हंटची माहिती व त्याचा या प्रकरणातील सहभाग याचा शोध घेऊन या दोघांना माहिती पुरविली होती. या प्रकरणात निक्सनचा सहभाग व एडमंड मस्कीला राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी CREEP ने खोट्या पत्राचे रचलेले कारस्थान याविषयी सुद्धा डीप थ्रोटने माहिती पुरविली होती. सप्टेंबर १९७२ ते मे १९७३ या काळात त्यांच्या एकूण ७ भेटी झाल्या होत्या. परंतु डीप थ्रोट म्हणजे नक्की कोण हे जगाला २००५ पर्यंत समजले नव्हते. १९७४ नंतर सुमारे ३० वर्षे डीप थ्रोट म्हणजे नक्की कोण हे शोधण्यासाठी इतर पत्रकारांनी पराकोटिचे प्रयत्न केले. त्यावर किमान ३ पुस्तके लिहिली गेली. डीप थ्रोट म्हणजे हीच व्यक्ती असा अनेकांवर संशय व्यक्त केला गेला. यात प्रमुख संशयित होते डायन सॉयर, निक्सनचे कर्मचारी प्रमुख अलेक्झांडर हेग, एफबीआय संचालक पॅट्रिक ग्रे आणि निक्सनचा अजून एक कर्मचारी जॉन सीअर्स. डीप थ्रोट ही एक व्यक्ती नसून काही व्यक्तींचा एक गट आहे असा काही जणांचा दावा होता तर ही व्यक्तीरेखा काल्पनिक आहे असेही काही जण म्हणत होत. डीप थ्रोट मेल्यानंतरच आम्ही त्याची ओळख जगासमोर आणू असे वुडवर्ड-बर्नस्टीन या दोघांनीही ठासून सांगितले होते तरीही हा एक पुरूष आहे आणि त्याला स्कॉच व्हिस्की व धूम्रपानाची सवय आहे हे एकदा वुडवर्डने सांगितले होते. या दोघांनी जमविलेले सर्व पुरावे म्हणजे वेगवेगळ्या ७५ खोक्यांमध्ये ठेवलेल्या नोंदी, फोटो, फाईली अशा सर्व गोष्टी टेक्सस विद्यापीठाने नंतर ५० लाख डॉलर्स देऊन विकत घेतल्या व डीप थ्रोटविषयी संदर्भ वगळता इतर सर्व पुरावे २००४ मध्ये जनतेसमोर आणले. स्मिथसोनिअन मासिकाच्या विल्यम गेन्सने व त्यांच्या पत्रकारिता शिकणार्या विद्यार्थ्यांनी डीप थ्रोटला शोधून काढण्यासाठी एक मोहीम हातात घेतली. डीप थ्रोट असू शकेल अशा त्या काळातील व्हाईट हाउसशी संबंधित असलेल्या व तपासाशी संबंधित असलेल्यांची त्यांनी सर्व माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. त्या काळातील वृत्तपत्रात आलेले लेख, वुडवर्ड-बर्नस्टीन यांचे लेख व त्यांच्या मुलाखती वाचून डीप थ्रोट एफबीआयशी संबंधित असावा असा त्यांनी कयास बांधला. परंतु डीप थ्रोटची ओळख लपविण्यासाठी तो एफबीआयशी संबंधित नसल्याचे वुडवर्ड-बर्नस्टीन यांनी १९७३ मध्येच सांगितले होते. त्या विद्यार्थ्यांनी नंतर व्हाईट हाउसशी संबंधित ३९ पुरुष अधिकार्यांची माहिती गोळा केली जे १९७२-७३ या काळात तेथे काम करीत होते. त्यातून मद्यपान व धूम्रपान न करणारे वगळले गेले. शेवटी त्यांनी डीप थ्रोट असू शकेल अशी ७ नावे नक्की केली. ते होते - पॅट्रिक बकॅनन (निक्सनचा व्याख्यान लेखक व विशेष सहाय्यक), स्टीफन बुल (निक्सनचा व्यक्तीगत सहाय्यक), डेव्हिड गर्गेन आणि रेमंड प्राईस (निक्सनचे अजून दोन व्याख्यान लेखक), जोनाथन रोझ (निक्सनचा एक अॅटर्नी), जेराल्ड वॉरन (सहाय्यक सचिव) आणि फ्रेड फिल्डिंग (व्हाईट हाउस प्रमुख जॉन डीनचा मुख्य कायदेशीर सल्लागार). परंतु बकॅननने फेब्रुवारी १९७२ मध्येच धूम्रपान सोडले होते. त्यामुळे त्याचे नाव डीप थ्रोट असू शकणार्या संभाव्य यादीतून गळाले. यातील फ्रेड फिल्डिंग्ला स्कॉच व्हिस्की व धूम्रपानाची सवय होती. त्यामुळे तोच डीप थ्रोट असावा याविषयी संशय वाढला.
डावीकडे कार्ल बर्नस्टीन आणि उजवीकडे बॉब वुडवर्ड (१९७३ मध्ये)
सलग ४ वर्षे बिल गेन्स आणि त्याच्या ६० विद्यार्थ्यांनी प्रचंड माहिती गोळा करून त्याआधारे २२ एप्रिल २००३ या दिवशी जाहीर केले की फ्रेड फिल्डिंग हाच डीप थ्रोट होता. परंतु त्यांनी चुकीचा निष्कर्ष काढला होता. या निष्कर्षावर वुडवर्ड-बर्नस्टीन या दोघांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी एवढेच सांगितले की डीप थ्रोटच्या मृत्युनंतरच त्याचे नाव जाहीर करण्याचे त्यांनी त्याला वचन दिले आहे. परंतु २००५ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी स्वतः डीप थ्रोटने व्हॅनिटी फेअर मासिकाला आपण स्वतःच डीप थ्रोट असल्याचा गौप्यस्फोट केला व त्या मासिकाने लगेचच ते जाहीर करून त्याचे नाव मार्क फेल्ट असल्याचे जाहीर केले. आश्चर्य म्हणजे या प्रकरणाचा तपास सुरू असताना वुडवर्ड-बर्नस्टीन यांना तपासाची गुप्त माहिती कशी मिळत असावी यावर व्हाईट हाउसमध्येही चर्चा व्हायची व स्वतः निक्सनने दोन वेळा मार्क फेल्ट हाच ही माहिती पुरवित असावा असा संशय व्यक्त केला होता. मार्क फेल्ट नंतर एफबीआयच्या उपसंचालक पदापर्यंत पोहोचला. व्हॅनिटी फेअर मासिकाच्या गौप्यस्फोटामुळे वुडवर्ड-बर्नस्टीनवर माध्यमांकडून प्रश्नांचा भडीमार होऊ लागला व शेवटी पत्रकार परीषद घेऊन त्यांनी त्याला दुजोरा दिला व शेवटी ३२-२२ वर्षांनंतर या रहस्याचा उलगडा झाला. मार्क फेल्टचे १८ डिसेंबर २००८ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन हे या प्रकरणातील दृश्य नायक तर मार्क फेल्ट हा अदृश्य नायक होता.
Deep Throat मार्क फेल्ट
उजवीकडे कार्ल बर्नस्टीन आणि डावीकडे बॉब वुडवर्ड (२०१२ मध्ये)
__________________________________________________________________________________________ CREEP (Nixon's Committee to Re-Elect the President) - निक्सनच्या पुनर्निवडीसाठी स्थापण्यात आलेली समिती Slush Money - लाच देण्यासाठी, छुप्या गुन्हेगारी कृत्यांसाठी गुपचुप वेगळे काढून ठेवलेले पैसे (क्रमशः)

वाचने
8860
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
छान माहिती.
In reply to छान माहिती. by कॉमी
डीप थ्रोट ? काहीही हं कॉमी...
In reply to डीप थ्रोट ? काहीही हं कॉमी... by गॉडजिला
हिहीहीही -(सात्विक) कॉमी
मला डीप ॲसेटची आठवण आली.
रोचक लेखमाला.
रोचक
हा भाग पण आवडला
हा भागही आवडला.
मालिका उत्कंठावर्धक होत आहे!
मस्त माहिती. आवडले. पुलेशू
जबरदस्त लिहिली आहे मालिका.
मार्क फेल्ट त्यावेळेस काय
In reply to मार्क फेल्ट त्यावेळेस काय by मराठी_माणूस
तो त्यावेळी एफबीआय मध्ये
हा पण भाग आवडला
उत्कंठावर्धक लेखमाला .
Water Gate
In reply to Water Gate by जयन्त बा शिम्पि
फारच छान माहिती. धन्यवाद!