गायी दूध देत नाहीत
तू जेंव्हा एखादा समभाग विकतोस तो कुणीतरी का घेतो? कारण तो अजून वर जाईल असे त्याला वाटत असते किंवा खात्री असते. अन्यथा त्याने तो घेतलाच नसता.
हि साधी गोष्ट ऐकून माझे डोळे खाडकन उघडले. तेंव्हा तुम्ही समभाग विकत घ्या आणि विसरून जा हा सल्ला सुद्धा पूर्णपणे उपयोगी नाही. मी एक निश्चय केला कि गायीचे दूध काढत राहिले पाहिजे अन्यथा गाय केंव्हा भाकड होईल हे सांगता येत नाही. प्रत्येक समभाग हा एका विशिष्ट पातळीच्या वर गेल्यावर आपले भांडवल त्यातून काढून घ्यायचे मग तो कितीही वर खाली गेला तरी तुम्ही नुकसानीत जात नाही. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे बाजार दर चार पाच वर्षातून एकदा जबरदस्त आपटी खातो त्यावेळेस उत्तमातले उत्तम समभाग विकत घायचे आणि ते पुढच्या पाच वर्षात उच्च पातळीला गेल्यावर विकायचे आणि आपले पैसे मोकळे करायचे. बाजारात हि वृत्ती मला गेल्या १३-१४ वर्षात तीन वेळेस सर्वात जास्त पैसे देऊन गेली आहे. उदा. आता मार्च अखेर २०२० मध्ये करोनामुळे बाजार जबरदस्त पडला होता तेंव्हा मी टी सी एस, लार्सन, स्टेट बँक सारखे अनेक समभाग घेतले जे आज एक वर्षात १०० % च्या आसपास परतावा देतील. बाजारातील पंडित तुम्हाला एस आय पी करत राहा हे उच्चरवाने सांगत राहतात. परंतु हे घेतलेले समभाग कधी विकायचे हे कोणीही सांगत नाही. यासाठी एक तर आपल्याला याचा चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे किंवा एक चांगला वित्त सल्लागार ठेवणे आवश्यक ठरते यासाठी दुर्दैवाने कोणताही ठोकताळा किंवा यशस्वी फॉर्मुला मला तरी माहिती नाही. कोणाकडे समभाग केंव्हा विकायचा याचे काही गणित असेल तर ते मी घेण्यास उत्सुक आहे. सध्या तरी एखादा भरपूर चढलेला समभाग मी विकायचा असेल तर बाजारातील पंडितांनी सांगितलेली किंमत असेल तर त्याच्या ८५ ते ९० टक्के भाव आला कि विकून टाकतो आणि हा एक फॉर्म्युला मला बऱ्यापैकी किमत देतो आहे असे जाणवले. कारण शेअर खान प्रभुदास लीलाधर सारखे ब्रोकर आपल्या ग्राहकाला रुपयाला १५०० चा समभाग घ्यायला सांगतात आणि १९०० ला विकायला सांगतात. पण बाहेर मुलाखत देतात तेंव्हा हा समभाग आता २१०० -२२०० पर्यंत जाणार आहे अशी मुलाखत देतात( आवई उठवतात). हा समभाग २००० कधीच पार करत नाही आणि १८०० ला हा समभाग चढतो आहे हे पाहून बाजारात शिरलेले अनेक हवशे नवशे आत येतात आणि आतच अडकतात. तेंव्हा मी माझ्या विकत घेतलेल्या समभागापैकी काही टक्के समभाग १८०० पासून विकायला काढतो आणि १९५० पर्यंत त्याचा मोठा भाग विकून मोकळा होतो. उदा फायझर या कंपनीचा समभाग मी ८०० रुपयाला घेतला होता तो चढत चढत ३५०० च्या वर गेला तेंव्हा पंडित लोकांनी हा ६००० पर्यंत जाईल अशी २०१९ मध्ये बातमी दिली होती. तेंव्हा हा समभाग मी तुकड्यातुकड्यात ३८०० ते ४४०० मध्ये विकून टाकले आणि यानंतर हा समभाग साधारण दोन वर्षात ५००० च्या आसपास फिरत आहे. यात एक दुसरा आडाखा असा आहे कि प्रत्येक अर्थवस्तू (asset) उदा फ्लॅट किंवा समभाग हि सिग्मोईड कर्व्हने वर चढते. आपण या चढत्या आलेखाच्या सुरुवातीस (toe) ती घेतली आणि वरच्या टोकावर( shoulder) वर विकली पाहीजे म्हणजेच या दोन बिंदूंमध्ये सर्वात जास्त नफा मिळवता येतो. उदा फायझरचे समभाग विकून मी ग्रॅन्युल्स इंडिया चे समभाग घेतले जे २०१९-२० मध्ये ८०-९०-च्या आसपास होते ते आता ३०० च्या वर आहेत म्हणजेच ते समभाग तिप्पट झाले आहेत पण फायझर मात्र २५ % च वाढला आहे. फायझर ४००० चा १२,००० (तिप्पट) होण्याची शक्यता पुढच्या ५ वर्षात तरी नगण्य आहे. माझ्या कडे कोणताही यशस्वी फॉर्मुला नाही कि माझा तसा दावा हि नाही. गेल्या १४-१५ वर्षात मी अनेक समभागात नुकसान केले आहे आणि अनेक समभागात भरपूर नफा सुद्धा केलेला आहे. गेल्या वर्षी विकत घेतलेल्या समभागामुळे सध्या मला बाजारात गेल्या १३ वर्षात सरासरीने १३-१४ टक्के नक्त नफा आणि त्यावर मिळणारा लाभांश धरल्यास १५-१६ % दरवर्षी मिळतो आहे. जेंव्हा जेंव्हा बाजार चढतो तेंव्हा मी त्यातून पैसे काढून घेतो आणि घेतलेलं कर्ज फेडून टाकतो. यात दोन वेळेस घेतलेलं सोनोग्राफी यंत्राचे कर्ज येते, दोन गृहकर्जे येतात आणि एक कारचे कर्ज येते. हि कर्जे नेहमी स्थिर टक्केवारीनेच असतात. याउलट बाजार बराच चढउतार करतो. त्यामुळे आपल्याला हवे तेंव्हा भरपूर परतावा मिळेल याची खरी नसते. म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन सुद्धा असतो असे मी ऐकले आहे. त्याचा कितपत फायदा मिळतो याची मला कल्पना नाही. सध्या माझ्या कडे १ रुपयाचे सुद्धा म्युच्युअल फंड नाहीत. मी डे ट्रेडिंग मुळीच करत नाही किंवा फ्युचर & ऑप्शन मध्ये सुद्धा अजिबात नाही. डे ट्रेडिंग साठी तुम्ही नऊ ते साडे तीन पूर्ण वेळ आपल्य संगणकासमोर असणे आवश्यक आहे. हे मला शक्य नाही. माझा सब ब्रोकर माझ्याच इमारतीत आहे तेंव्हा बरेच निवृत्त लोक तेथे रमणा करायला येत असत. एकदा माझ्या दवाखान्यात रुग्ण नसताना मी तेथे थांबलो होतो. तेथे चढणाऱ्या बाजाराचा जल्लोष चालला होता. तेवढ्या मला रुग्ण आल्याची वर्दी फोनवर मिळाली म्हणून मी उठलो तर तेथील एक निवृत्त सद्गृहस्थ म्हणाले "डॉक्टर कुठे चाललात? आता तर बाजार चढतो आहे". मी त्यांना एक इसापनीतीतील गोष्ट सांगितली. एकदा एका लांडग्याने एक गाढव धरले. त्याला तो खाणार एवढ्यात गाढव म्हणाले, हे बघ, माझ्या मागच्या पायात काटा घुसलेला आहे तो काढ म्हणजे मला खाताना तुला काटा टोचणार नाही. लांडगा काटा कुठे आहे बघत होता तोच गाढवाने त्याला जोरदार लाथ मारली आणि त्याचे सगळे दात पडले. लांडगा म्हणाला "बरं झालं, मला अद्दल घडली." माझ्या बापाने मला खाटकाचा व्यवसाय शिकवला होता हा वैद्यकाचा व्यवसाय करायची मला काय गरज होती?. मी त्या सद्गृहस्थाना सांगितले कि माझ्याकडे येणारा रुग्ण मला १०० % पैसे देऊन जाणार आहे. बाजार चढेल तसा पडेलसुद्धा. मी १२ वी नंतर साडे आठ वर्षे अभ्यास करून वैद्यकशास्त्र शिकलो आहे त्यानंतर ३० वर्षे अनुभव गाठीस आहे तेंव्हा त्यातून मिळणाऱ्या पैशाकडे मला पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. त्यावर माझा चरितार्थ चालतो. तेथे दुर्लक्ष करणे मला परवडणारे नाही. तेंव्हा बाजाराकडे लक्ष देण्यासाठी स्वतःच्या मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष करणे कुणालाच परवडणारे नाही हा लेख विस्कळीत आणि तुकड्या तुकड्यात आहे. याला मिपावरील वित्त तज्ज्ञ सुधारून देतील तर बरे होईल.In reply to लेख आवडला. सल्लेही पटले. by खेडूत
In reply to व्यवस्थापन चांगले असू दे की by मनो
In reply to तेंव्हा बाजाराकडे लक्ष by अमर विश्वास
मी स्वतः जेवढे समभाग लोकांच्या टिप्स वर विकत घेतले आहेत किंवा विकले आहेत त्यात ९० % पेक्षा जास्त वेळेस नुकसानच झाले आहे.सौ टके की बात! मी दुसऱ्यांचे ऐकून शेअर घेणे काही वर्षांपूर्वीच सोडून दिले. आता कुणी एखाद्या शेअर बद्दल सांगितले तर मी त्याचे फंडामेंटल्स बघून त्याला वॉचलिस्ट मध्ये टाकतो आणि काही दिवस/महिन्याच्या निरीक्षणानंतरच बाय लिस्ट मध्ये आणतो.
In reply to समभाग != गुंतवणूक by भृशुंडी
In reply to पण "समभाग (शेअर्स) म्हणजेच by सुबोध खरे
म्हणजेच
हा शब्द ठळक का केला आहे हे आणि यातच
चा अर्थ काय आहे हे सोप्या मराठीत समजावून घ्या मग बोलूIn reply to लेख बराचसा पटला. पण MF बद्दल by उगा काहितरीच
(प्लीझ नोट : ही इमेज ऐर्यागैर्या साईट वरची नसुन हार्वर्ड बिजनेस रिव्हु वरील आहे .
https://digital.hbs.edu/platform-digit/submission/renaissance-technologies-generating-alpha-without-wall-street-veterans-or-mbas/
)
फायन्नस हे तुमच्या डॉक्टरी क्षेत्रासारखेच आहे . प्रचंड अभ्यास करावा लागतो आणि त्यांनंतरही ग्यॅरंटीड यश मिळेलच ह्याची खात्री नसते . " अब इन्हे दवा कि नही , दुवा की जरुरत है. " हे ह्या क्षेत्रातही व्हॅलीड आहे !
फक्त फरक इतकाच आहे कि डॉक्टरकी जितक्या कडक पणे रेग्य्लेटेड आहे तितक्या कडकपणे फायनान्शियल अॅडव्हायझरी रेग्युलेटेड नाही म्हणुन उठ्सुट कोणीही अॅडव्हायझर होऊ शकतो आणि म्हणुनच ह्या क्षेत्रात "देवमाणुस" लोकांचे प्रमाण जास्त आहे !
मी स्वतः ह्या क्षेत्रात काम करत आहे , पण स्टॅइस्टिकली सिग्निफिकंट ठरण्याकरता मला एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ वर्षे प्रॉफिटेबल रिटर्न दाखवता आले पाहिजेत . हे जमले तरच स्वतःची अॅडव्हायझरी सुरु करेन म्हणतो !
अभ्यासोनी प्रकटावे | ना तरी झाकोनी असावे | प्रकटोनी नासावे | हे बरे नव्हे ||
इत्यलम .In reply to लेख उत्तम परंतु by प्रसाद गोडबोले
In reply to लेख उत्तम परंतु by प्रसाद गोडबोले
In reply to फायनान्स हे माझे क्षेत्र by सुबोध खरे
In reply to लेख उत्तम परंतु by प्रसाद गोडबोले
In reply to "...ह्या लेखावरुन फायन्नास हे by युयुत्सु
In reply to मी ही अनुभवातून शिकलो. by बबन ताम्बे
200 रूपयापर्यंत शेअर गेल्यावर हर्षवायू झाला आणि सगळे विकून टाकले:). मला असे हर्षवायूचे बरेच झटके येऊन गेले. नंतर शहाणा झालो बर्यापैकी.
In reply to कोणती ही गुंतवणूक by Rajesh188
In reply to त्या मुळे किती ही अभ्यास करा by गणेशा
In reply to हा धंदा फारसा रेग्युलेटेड नाही by चौकस२१२
In reply to हा धंदा फारसा रेग्युलेटेड नाही by चौकस२१२
In reply to मानसिक अस्थिरता by प्रकाश घाटपांडे
In reply to एकंदरीत शेअर्स / म्युच्युअल by अमर विश्वास
In reply to अनास्था नाही ... by मुक्त विहारि
In reply to रिस्क घेण्याची नशा by प्रकाश घाटपांडे
लेख आवडला. सल्लेही पटले.