"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे...
त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत.
मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ. सांगलीला निघायचे नक्की केले.
नेहमी प्रमाणे, सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का? (https://misalpav.com/node/48375) अशी हाक मारली आणि दोन जणांनी, कट्टा करायला बोलावले...
विनोद बेडगे, हे सांगली पासून जवळच रहात असल्याने आणि सुयश तात्या, त्याच सुमारास भारता बाहेर असल्याने, विनोदला लगेच भेटायचे ठरवले...
---------
विनोद बेडगे, यांच्या बरोबरचा शेतकट्टा, दिनांक 24-02-2021
आमची सौ, आमच्या कट्टे प्रेमाला आधी विरोध करत होती. पण जसे-जसे ती पण कट्ट्याला हजेरी लावायला लागली, तसा-तसा तिचा विरोध मावळायला लागला.
मिपाकर आणि त्यातही शेतकरी असल्याने, मी कट्टा करायला जास्त उत्सुक होतो.
ठरल्या प्रमाणे, विनोदची भेट झाली आणि त्याच्या घरी चहा पिऊन, मी, आमची सौ., सूनबाई आणि सुनबाईंची बहीण आणि भाऊ, शेतावर गेलो..
आमच्या कोकणात, द्राक्षे होत नाहीत. त्यामुळे मला द्राक्ष शेतीतच जास्त रस होता. कट्ट्याचे विषय शेती आधारितच होते.
द्राक्ष लागवड बघतांना एक गोष्ट लक्षांत आली की, मध्येच बरीच जागा मोकळी राहते. तिथे, मिरी रोपे लावता येतील का? ही शंका मनांत निर्माण झाली.
मिरे लागवडचे एक वैशिष्ट्य म्हणजे, मिरे सावलीत किंवा अर्ध प्रकाशात वाढू शकतात. शिवाय, सध्या एक नविन जात विकसीत झाली आहे आणि ती म्हणजे, आजकाल रोपे मिळायला लागली आहेत. मिरवेल ही संकल्पना, घरचा मजूर असतील तरच शक्य होते.
सांगली भागात अजून एक गोष्ट लक्षांत आली आणि ती म्हणजे, ह्या भागांत "नारळ" अतिशय उत्तम होतात.
शेती ही पिढ्यान पिढ्या टिकणारी गोष्ट असली तरी, प्रथम शेतीत पाऊल टाकणारी एक पिढी, खूप उपभोग घेऊ शकत नाही आणि आर्थिक ओढाताण पण जास्त होते... हा मुलभूत नियम, परत एकदा मनांत ठसला...
आमच्या सौ.ला देखील, शेती ह्या विषयांत रस असल्याने, ती पण भरपूर खूष झाली. पण तिला सगळ्यात जास्त आनंद, ताजी द्राक्षे खातांना झाला. आमचे द्राक्ष प्रेम बघून, विनोदने, ताजी वांगी, टोमॅटो आणि द्राक्षे भेट म्हणून दिली.
भारतीय शेतकरी, पाहुण्याला रिक्त हस्ते कधीच पाठवत नाही.
--------------------
मुलाचा साखरपुडा, एक एप्रिलला, सांगलीला सुनेच्या घरातल्या घरात करायचे ठरले आणि त्याच दिवशी, "सुयश तात्या" यांच्या बरोबर, रात्री कट्टा करायचे ठरले.
मिपा ही खरोखरच रत्नांची खाण आहे. इथे तुम्हाला आमच्या सारखे अशिक्षित, गावंढळ आणि अडाणी माणसे पण भेटतील, सुबोध खरे, म्हात्रे, कुमार1, दातरंगे, अजया, बहुगूणी यांच्या सारखे उत्तम वैद्यकीय सेवा देणारे, वेळप्रसंगी, किमान पैशांत उत्तम सल्ला देणारे डाॅक्टर पण मिळतील. सायकल ते कार ह्याची उत्तम माहिती देणारे मिपाकर कमी नाहीत.
"सुयश तात्या" हे पण असेच एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व. सकाळी झालेली जुजबी ओळख, बियर आणि मटणचा आस्वाद घेता घेता, पक्क्या मैत्रीत रुपांतरीत कधी झाली, ते समजलेच नाही.
कट्टूयाचा खरा उपयोग काय? तर, आपण सगळेच जण, इथे कितीही पराकोटीची विरुद्ध मते मांडत असलो तरी, वैयक्तिक पातळीवर "मैत्री" होतेच.
-----------
फोटो चिकटवता येत नसल्याने, वल्लींची मदत घेत आहे..
वाचने
20836
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच,
नविन मुलगी घरात येत असल्याने
वा वा !
देशा बाबतीत, ही मते अजूनही तशीच आहेत ....
In reply to वा वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह...!
In reply to देशा बाबतीत, ही मते अजूनही तशीच आहेत .... by मुक्त विहारि
ताजा कलम
In reply to वाह...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे
In reply to ताजा कलम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्या दृष्टीने काही प्रयत्न.
In reply to वाह...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन मुवि.
मुवि, तुमच्या मुलाचे, तुमचे
अभिनंदन.
अभिनंदन!!
अरारा
मिपाकर, इतक्या दरिद्री विचाराचे नसतात....
In reply to अरारा by सुरिया
पाहिले पाहिले
In reply to मिपाकर, इतक्या दरिद्री विचाराचे नसतात.... by मुक्त विहारि
आपले मिपावर अस्तित्व 1 month
In reply to पाहिले पाहिले by सुरिया
चीप कमेंट
In reply to पाहिले पाहिले by सुरिया
यात चीप काय आहे?
In reply to चीप कमेंट by कपिलमुनी
सर
In reply to यात चीप काय आहे? by सुबोध खरे
डॉक्टर
In reply to यात चीप काय आहे? by सुबोध खरे
आपला प्रतिसाद माझ्या
In reply to डॉक्टर by कपिलमुनी
वाह वाह!
फोटो
फोटो क्र. ३)
फोटो क्र. ४)
फोटो क्र. ५)
फोटो क्र. ६)
वा !
व्वा, झकास कट्टा ! प्रचि वरून
मस्त कट्टा वर्णन आणी फोटो .
कट्टा करुन मज्जा आलि
धन्य झालो ..
एकमेकांच्या बरोबर गप्पा मारल्या की, मैत्री होतेच....
In reply to धन्य झालो .. by चौकटराजा
मुवि ..
In reply to एकमेकांच्या बरोबर गप्पा मारल्या की, मैत्री होतेच.... by मुक्त विहारि
मी घारापुरी कट्याला नव्हतो...
In reply to मुवि .. by चौकटराजा
भारी
काय भारी ... ?
In reply to भारी by टवाळ कार्टा
=))
In reply to काय भारी ... ? by चौकटराजा
हाही हाही हाही हाही
In reply to काय भारी ... ? by चौकटराजा
नवं दांपत्यास अनेक शुभेच्छा !
सांगलीचे कपाले भडंग पुण्यात
हा भडंग मस्तच आहे
In reply to सांगलीचे कपाले भडंग पुण्यात by सिरुसेरि
आम्ही त्या साईडचे गोरे भडंग,
In reply to सांगलीचे कपाले भडंग पुण्यात by सिरुसेरि
मटण तर अप्रतिम ....
In reply to आम्ही त्या साईडचे गोरे भडंग, by चौथा कोनाडा
कधी खाल्लं नाही !
In reply to मटण तर अप्रतिम .... by मुक्त विहारि
मसुराचा पांढरा रस्सा छान होतो
In reply to कधी खाल्लं नाही ! by चौथा कोनाडा
मसुराचा पांढरा रस्सा छान होतो.... करून बघायला हवा ...
In reply to मसुराचा पांढरा रस्सा छान होतो by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
चिकनचे वाटण वापरुनच आम्ही
In reply to मसुराचा पांढरा रस्सा छान होतो.... करून बघायला हवा ... by मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to चिकनचे वाटण वापरुनच आम्ही by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
करू शकता ...
In reply to कधी खाल्लं नाही ! by चौथा कोनाडा
त्या साईडचे गोरे भडंग, भोरे
In reply to आम्ही त्या साईडचे गोरे भडंग, by चौथा कोनाडा
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to त्या साईडचे गोरे भडंग, भोरे by सिरुसेरि
अनुपम भडंग, दुकान: अनुपम
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
धन्यवाद
In reply to अनुपम भडंग, दुकान: अनुपम by गवि
भडंग ब्रँड्सची बरीच माहिती
In reply to त्या साईडचे गोरे भडंग, भोरे by सिरुसेरि
डॉन (dawn) भडंग छानच, त्यांचे
In reply to त्या साईडचे गोरे भडंग, भोरे by सिरुसेरि
छान आठवणी . प्रत्येक
In reply to डॉन (dawn) भडंग छानच, त्यांचे by शा वि कु
डॉन दांडेकर ब्राण्डचे होते
In reply to डॉन (dawn) भडंग छानच, त्यांचे by शा वि कु
आवडलाा कट्टा