मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांगली कट्टे,

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत. मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ. सांगलीला निघायचे नक्की केले. नेहमी प्रमाणे, सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का? (https://misalpav.com/node/48375) अशी हाक मारली आणि दोन जणांनी, कट्टा करायला बोलावले... विनोद बेडगे, हे सांगली पासून जवळच रहात असल्याने आणि सुयश तात्या, त्याच सुमारास भारता बाहेर असल्याने, विनोदला लगेच भेटायचे ठरवले... --------- विनोद बेडगे, यांच्या बरोबरचा शेतकट्टा, दिनांक 24-02-2021 आमची सौ, आमच्या कट्टे प्रेमाला आधी विरोध करत होती. पण जसे-जसे ती पण कट्ट्याला हजेरी लावायला लागली, तसा-तसा तिचा विरोध मावळायला लागला. मिपाकर आणि त्यातही शेतकरी असल्याने, मी कट्टा करायला जास्त उत्सुक होतो. ठरल्या प्रमाणे, विनोदची भेट झाली आणि त्याच्या घरी चहा पिऊन, मी, आमची सौ., सूनबाई आणि सुनबाईंची बहीण आणि भाऊ, शेतावर गेलो.. आमच्या कोकणात, द्राक्षे होत नाहीत. त्यामुळे मला द्राक्ष शेतीतच जास्त रस होता. कट्ट्याचे विषय शेती आधारितच होते. द्राक्ष लागवड बघतांना एक गोष्ट लक्षांत आली की, मध्येच बरीच जागा मोकळी राहते. तिथे, मिरी रोपे लावता येतील का? ही शंका मनांत निर्माण झाली. मिरे लागवडचे एक वैशिष्ट्य म्हणजे, मिरे सावलीत किंवा अर्ध प्रकाशात वाढू शकतात. शिवाय, सध्या एक नविन जात विकसीत झाली आहे आणि ती म्हणजे, आजकाल रोपे मिळायला लागली आहेत. मिरवेल ही संकल्पना, घरचा मजूर असतील तरच शक्य होते. सांगली भागात अजून एक गोष्ट लक्षांत आली आणि ती म्हणजे, ह्या भागांत "नारळ" अतिशय उत्तम होतात. शेती ही पिढ्यान पिढ्या टिकणारी गोष्ट असली तरी, प्रथम शेतीत पाऊल टाकणारी एक पिढी, खूप उपभोग घेऊ शकत नाही आणि आर्थिक ओढाताण पण जास्त होते... हा मुलभूत नियम, परत एकदा मनांत ठसला... आमच्या सौ.ला देखील, शेती ह्या विषयांत रस असल्याने, ती पण भरपूर खूष झाली. पण तिला सगळ्यात जास्त आनंद, ताजी द्राक्षे खातांना झाला. आमचे द्राक्ष प्रेम बघून, विनोदने, ताजी वांगी, टोमॅटो आणि द्राक्षे भेट म्हणून दिली. भारतीय शेतकरी, पाहुण्याला रिक्त हस्ते कधीच पाठवत नाही. -------------------- मुलाचा साखरपुडा, एक एप्रिलला, सांगलीला सुनेच्या घरातल्या घरात करायचे ठरले आणि त्याच दिवशी, "सुयश तात्या" यांच्या बरोबर, रात्री कट्टा करायचे ठरले. मिपा ही खरोखरच रत्नांची खाण आहे. इथे तुम्हाला आमच्या सारखे अशिक्षित, गावंढळ आणि अडाणी माणसे पण भेटतील, सुबोध खरे, म्हात्रे, कुमार1, दातरंगे, अजया, बहुगूणी यांच्या सारखे उत्तम वैद्यकीय सेवा देणारे, वेळप्रसंगी, किमान पैशांत उत्तम सल्ला देणारे डाॅक्टर पण मिळतील. सायकल ते कार ह्याची उत्तम माहिती देणारे मिपाकर कमी नाहीत. "सुयश तात्या" हे पण असेच एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व. सकाळी झालेली जुजबी ओळख, बियर आणि मटणचा आस्वाद घेता घेता, पक्क्या मैत्रीत रुपांतरीत कधी झाली, ते समजलेच नाही. कट्टूयाचा खरा उपयोग काय? तर, आपण सगळेच जण, इथे कितीही पराकोटीची विरुद्ध मते मांडत असलो तरी, वैयक्तिक पातळीवर "मैत्री" होतेच. ----------- फोटो चिकटवता येत नसल्याने, वल्लींची मदत घेत आहे..

वाचन 20827 प्रतिक्रिया 0