मराठी ही अभिजात भाषा होण्यात अडचणी कोणत्या?
http://www.misalpav.com/node/47611
या धाग्यावर मधेच मराठी अभिजात भाषा आहे का या विषयावर चर्चा सुरु होती.ती स्वतंत्रपणे व्हावी यासाठी हा धागा.
मराठी भाषा ही अभिजात व्हावी यासाठी काहीजण प्रयत्न करत असतानाच ती अभिजात होऊ नये यासाठी काही मराठी लोकच प्रयत्न करत असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होते.याची दोन प्रमुख कारणे म्हणजे मराठी ही संस्कृतोद्भव नाही हे सिद्ध झाल्यास त्यातला आर्य प्रभाव कमी होईल म्हणून काही ब्राह्मणद्वेष्टे साहित्यिक आणि संघटना यासाठी प्रयत्न करत असल्याचे काही साहित्यिकांना विशेषत: संस्कृतप्रेमी साहित्यिकांना वाटते आहे.हे एक कारण.
अभिजात करण्याला विरोध करणार्यांचे दुसरे कारण म्हणजे एखादी भाषा अभिजात झाल्यास तिच्या विकासासाठी, संवर्धनासाठी, प्रसारासाठी मिळणारा कोट्यावधी रुपयांचा निधी. हा निधी मराठीच्या संवर्धनापेक्षा तो काही लोकांच्या खिशात जाणार असल्याचा संशय.अर्थात ही शक्यता अगदीच फेटाळता येत नाही.भारतातले विविध आर्थिक घोटाळे पाहता हे क्षेत्र त्यापासून लांब राहील याची खात्री कशी द्यावी?
मराठी भाषा ही अभिजात होऊ शकते का याबद्दलची ही एक सविस्तर चर्चा इथे आहे.
https://www.google.com/amp/s/www.inmarathi.com/41423/classical-status-to-marathi-language/amp/
ही मिपावरचीच एक जुनी चर्चा
https://www.misalpav.com/node/23896
दुसरा मुद्दा असा की खरंच मराठी ही अभिजात भाषा आहे का? कारण भाषाशास्त्राच्या बर्याचशा पुस्तकांमधे आजची मराठी ही संस्कृत,माहाराष्ट्री प्राकृत, शौरसेनी, मागधी, पाली, प्राकृत,पैशाची अशा विविध भाषांमधून बनली असल्याचे आणि ती कोणत्याही एका भाषेपासून बनली नाही असे लिहिले आहे.मग असे असताना ती अभिजात असल्याचे म्हणजे किमान दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचे किंवा ती अोडिया भाषेसारखी न बदलल्याचे कोठून सिद्ध करणार? कसे सिद्ध करणार? कारण मराठी किमान १५०० वर्षांपूर्वी असल्याचे सज्जड पुरावेही नाहीत आणि ती तिच्या मूळ स्वरुपापासून आजतागायत बर्यापैकी आहे तशी असल्याचेही सिद्ध होत नाहीये.
इथे नितीन श्री. जोगळेकर यांनी दिलेला प्रतिसाद वाचण्यासारखा आहे.
https://mr.quora.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE?top_ans=146057671
अभिजात म्हणून सिद्ध करताना त्या राज्यातला राजकीय लोकांचा दबाव हा सुद्धा महत्वाचा ठरत असावा का? याचं कारण पहा.मल्याळम् ही सुद्धा एक अभिजात भाषा आहे.पण खाली दिलेला फोटो पहा.
१६ व्या शतकात केरळात छापलेल्या एका पुस्तकाचा हा फोटो आहे.त्यावर मलबार तमिळ असा उल्लेख आहे.आता परदेशी धर्मप्रचारक केरळच्या स्थानिक भाषेला मल्याळम् न म्हणता मलबार तमिळ का म्हणत असतील? जर हे तमिळचंच एक स्वरुप स्वरुप असेल तर ती अभिजात कशी बनली? तर याची एक शक्यता अशी की त्यांनी मल्याळम् आणि तमिळचा सांस्कृतिक वारसा एकच आहे हे दाखवून दिले असण्याची शक्यता आहे.जोडीला मल्याळी राजकारण्यांचा रेटा! कारण १२ व्या शतकापासून मल्याळमने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे.त्याआधी ती तमिळची बहीण याच अर्थाने प्रचलित होती.
अलिकडच्या काळात हा फरक अधिकाधिक दिसावा,मल्याळम् ही तमिळपासून बरीच वेगळी आहे हे दाखवण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आणि जात आहेत.संस्कृतोद्भव शब्दांचा अधिकाधिक वापर,तमिळोद्भव शब्द शक्यतो टाळणे हे प्रकार होत आहेत. ४०च्या किंवा त्या आधीच्या दशकात जन्मलेल्या बर्याचशा मल्याळी लोकांना तमिळ सहज समजते.बोलायलाही बर्यापैकी जमते.पण आजच्या मल्याळी तरुणांना तमिळ सहज जमत नाही.कारण मधल्या काळात शाळा-कॉलेजात वगैरे ठरवून तमिळोद्भव शब्द टाळून शुद्ध मल्याळम् शब्द किंवा संस्कृतोद्भव शब्द वापरण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत.म्हणजे मल्याळीला अभिजात म्हणवून घेण्यासाठी मल्याळी लोकांनी किती खटाटोप केला आहे ते पहा.हा इतका खटाटोप मराठी अभिजात व्हावी यासाठी होतो आहे का? मराठी लोक,मराठी राजकारणी,मराठी इतिहासकार एक होऊन काम करताना दिसत आहेत का? नक्की कोण आणि कुठे कमी पडत आहे?

वर्गीकरण
वाचने
24723
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
हे पोलिटिकल स्टंट आहेत
मी मराठी माणूस नसले तरी विविध
In reply to मी मराठी माणूस नसले तरी विविध by साहना
संपूर्ण सहमत !
In reply to मी मराठी माणूस नसले तरी विविध by साहना
@साहना : वास्तव पहायला हवं
In reply to @साहना : वास्तव पहायला हवं by उपयोजक
मराठी भाषेच्या अभिजाततेच्या
In reply to @साहना : वास्तव पहायला हवं by उपयोजक
एके काळी मी स्वतः प्रकाशन
साहना यांचा उत्कृष्ट प्रतिसाद
अभिजात भाषा म्हणून ठराविक
In reply to अभिजात भाषा म्हणून ठराविक by चौथा कोनाडा
मराठी आणि निधी ...
In reply to मराठी आणि निधी ... by गामा पैलवान
निधीची भरपूर गरज असते.
In reply to निधीची भरपूर गरज असते. by चौथा कोनाडा
चौथा कोनाडा
In reply to चौथा कोनाडा by उपयोजक
निधीची गरज असते ह्यांत शंका
मराठीचं उत्थान
In reply to मराठीचं उत्थान by गामा पैलवान
अचूकपणे व्यक्त करायला
In reply to अचूकपणे व्यक्त करायला by उपयोजक
असं बघा की ....
In reply to असं बघा की .... by गामा पैलवान
अच्छा! असं होय!
दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
अतिशय सुंदर प्रतिसाद!
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
शेंडा ना बुडखा
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
साहना
In reply to साहना by चौकस२१२
> " मराठी भाषेने मैत्री
In reply to > " मराठी भाषेने मैत्री by साहना
.
In reply to . by Gk
भाषा आणि राजकीय सीमा ह्यांचा
In reply to भाषा आणि राजकीय सीमा ह्यांचा by साहना
...
In reply to > " मराठी भाषेने मैत्री by साहना
भाषा शुद्धी महत्वाची आहेमला
In reply to भाषा शुद्धी महत्वाची आहेमला by चौकस२१२
बरोबर ! अगदी योग्य मत !
In reply to बरोबर ! अगदी योग्य मत ! by चौथा कोनाडा
कायच्या काय
In reply to साहना by चौकस२१२
चौकस २१२: कारण नसताना उगाच इतर भाषेतील शब्द
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
वा.
..
In reply to .. by Gk
काँग्रेस पार्टी नेहमीच
छान
In reply to छान by Gk
आहे त्या महाराष्ट्रात भाषा
In reply to आहे त्या महाराष्ट्रात भाषा by चौकस२१२
काड्याच की
खालील दोन चित्रफिती बघा
In reply to खालील दोन चित्रफिती बघा by उपयोजक
तुम्ही जे म्हणताय ते मला
In reply to तुम्ही जे म्हणताय ते मला by साहना
Mumbai
साहना यांची निरीक्षणे
In reply to साहना यांची निरीक्षणे by गामा पैलवान
छान निष्कर्ष काढला आहे गा.पै.
नुसतेच खळ्ळ खट्ट्याक करुन वा
In reply to नुसतेच खळ्ळ खट्ट्याक करुन वा by कानडाऊ योगेशु
जोपर्यंत वाचनीय साहित्य
In reply to जोपर्यंत वाचनीय साहित्य by चौथा कोनाडा
बहुदा मुद्दा मांडण्यात
यातून खरंच कल कळेल का?