तरुण आहे रात्र अजुनी,
राजसा निजलास का रे?
कचेरीत जाता-येताना गाणी ऐकणे हा माझा एक आवडता छंद. गाण्यांचे दोन संच आहेत. एक संच आहे जलद, उडत्या चालींतील गाण्याचा. अशी गाणी सकाळी कचेरीत जाताना ऐकली की, काम करायला जणू दुप्पट उत्साह येतो! आणि दुसरा संच आहे तो शांत, संथ लयीतील गाण्यांचा, जी रात्री घरी परतताना ऐकायला खूप बरी वाटतात!
असंच परवा येताना हे गाणं लागलं होतं. हृदयनाथांचे संगीत आणि आशाबाईंचा आवाज हे दोन्ही श्रवणीयच परंतु त्याहीपेक्षा जास्त भावते ती भटसाहेबांची समर्थ लेखणी.
यायला उशीर होणार हे माहीत होतेच. म्हणून संध्याकाळी कचेरीतच काहीतरी अरबट-चरबट खाऊन घेतले असल्यामुळे भूक नव्हती. झोपही येत नव्हती. शेल्फमधले एक पुस्तक काढले.
लॉर्ड टेनीसन - एक प्रतिभावान कवी.
Home they brought her warrior dead:
She nor swooned, nor uttered cry:
All her maidens, watching, said,
'She must weep or she will die.'
लढाईवर गेलेल्या एका तरुण वीराचा मृतदेह घरी आणलेला. मागे उरलेत फक्त त्याची तरूण पत्नी आणि तान्हे मूल. कलेवराकडे दिग्मूढ होऊन बसलेली पत्नी आणि तिने आपला थोपवलेला आवेग मुक्त करावा, धाय मोकलून रडावे आणि आपले मन मोकळे करावे, अशा प्रयत्नात असलेले तिचे स्वकीय. हर प्रयनांनेही ती बधत नाही हे पाहिल्यावर, एक म्हातारी उठते आणि त्यांच्या तान्हुल्याला तिच्या मांडीवर ठेवते. तिच्या अश्रूंचा बांध आता फुटतो.
Rose a nurse of ninety years,
Set his child upon her knee--
Like summer tempest came her tears--
'Sweet my child, I live for thee.'
डोळे भरून येतात. पुढचे काही वाचवत नाही. बिछान्यावर पडतो आणि ते मघाशी ऐकलेले गाणे पुन्हा मनात रुंजी घालू लागते. आताच वाचलेली कविता आणि हे गाणे...कधी न उमगलेला, गाण्याचा हा नवा अर्थ हळू हळू उलगडू लागतो.
एकच प्रसंग, दोन समर्थ कवींनी किती सुंदरतेने चितारलाय.
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे?
..
..
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?
आणि मूळ गझलेत असलेले (पण गाण्यातून वगळलेले)
ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?
टेनीसन आणि सुरेश भट - दोघेही तोलामोलाचे आणि प्रतिभासंपन्न कवी. अकाली वैधव्य आलेल्या युवतीचे अंतरंग किती हळूवारपणे शब्दबद्ध केले आहे त्यांनी!
टीप - भटसाहेबांच्या ह्या सदर गझलेचा हा मला (नव्याने) उमगलेला अर्थ. भटसाहेबांना हाच अर्थ अभिप्रेत होता काय, याविषयी मला निश्चित माहिती नाही.
वाचने
30154
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुनीलभौ
मन विद्ध . . . .
सहमत
In reply to मन विद्ध . . . . by केशवराव
सुनील, नको
भट
परंतु झी
In reply to भट by शाल्मली
या गाण्याबद्दल
सहमत..
In reply to या गाण्याबद्दल by प्राजु
भटसाहेबांचे गाणे!
ग्रेट!
इंटरेस्टिंग
गीत
फारच छान
लेख
हा अर्थ सुचलाच नव्हता
असेच म्हणते
In reply to हा अर्थ सुचलाच नव्हता by धनंजय
अर्थ
In reply to हा अर्थ सुचलाच नव्हता by धनंजय
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आणि हे?
In reply to सुरेख by नंदन
अतिशय आवडतं गाणं..
In reply to आणि हे? by चित्रा
अतिशय समर्पक दुवा !
In reply to आणि हे? by चित्रा
भा. रा.
In reply to सुरेख by नंदन
कवितांचे अन्वयार्थ
सुनीलदादा,
लेख
एक शंका
अमृताच्या लाटा जवळ असून कोरडा = मृत
In reply to एक शंका by मिसळपाव
हो, आता सगळा अर्थ बरोबर जमतो
In reply to अमृताच्या लाटा जवळ असून कोरडा = मृत by धनंजय
सुनील, तुमचा लेख आवडला!
अप्रतिम प्रतिभा
सुरेख...
In reply to अप्रतिम प्रतिभा by बामनाचं पोर
ध्वनीफीत
In reply to सुरेख... by प्राजु
ह्या
तरुण आहे
ती गेली तेव्हा रिमझिम..
कलाकृती..
असेच म्हणतो
In reply to कलाकृती.. by स्वाती दिनेश
चिंतनात्मक लेख
नाही
+१ सहमत
In reply to नाही by नितिन थत्ते
आवडल.
कवितेतले
सुनिल
खरच.
मलाहि हा अर्थ अवधूतनें ...
दोन्ही
योगायोग?
निव्वळ
In reply to योगायोग? by _समीर_
खुलासा
In reply to योगायोग? by _समीर_
चित्तरंजन भट म्हणतात तरी
In reply to योगायोग? by _समीर_
किंवा ....
In reply to चित्तरंजन भट म्हणतात तरी by धनंजय
निराशेचा सूर
In reply to चित्तरंजन भट म्हणतात तरी by धनंजय
सुंदर...
पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केलेला खुलासा
खुद्द सुरेश भटांनी सांगितले
कायच्या कै लेख टाकलायं !
निद्रा आणि मृत्यू
In reply to कायच्या कै लेख टाकलायं ! by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : कशाला काहीही जोडतायं काय ?
In reply to निद्रा आणि मृत्यू by गामा पैलवान
हा अर्थ माझा नव्हे ....
In reply to @ गामा पैलवान : कशाला काहीही जोडतायं काय ? by संजय क्षीरसागर
असा अर्थ किंवा दावा
In reply to हा अर्थ माझा नव्हे .... by गामा पैलवान
दावा चुकीचा कसा काय?
In reply to असा अर्थ किंवा दावा by संजय क्षीरसागर
त्यांनी पाडलेला पडदा ना उठाओ..
In reply to दावा चुकीचा कसा काय? by गामा पैलवान
@ त्याचू वैलपान : उगवलात की त्याचूगिरी चालू !
In reply to त्यांनी पाडलेला पडदा ना उठाओ.. by संगणकनंद
@ गामा पैलवान : अर्थ गीताच्या आषयाशी पूर्णपणे विसंगत आहे
In reply to दावा चुकीचा कसा काय? by गामा पैलवान
होय बरोबर आहे तुमचं
In reply to @ गामा पैलवान : अर्थ गीताच्या आषयाशी पूर्णपणे विसंगत आहे by संजय क्षीरसागर
चुकीची बाजू?
In reply to @ गामा पैलवान : अर्थ गीताच्या आषयाशी पूर्णपणे विसंगत आहे by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : कमाले !
In reply to चुकीची बाजू? by गामा पैलवान
समजा कोणी काढलाच तर ....
In reply to @ गामा पैलवान : कमाले ! by संजय क्षीरसागर
तोच तर मुद्दा आहे आणि
In reply to समजा कोणी काढलाच तर .... by गामा पैलवान
मुद्दा मान्य पण ....
In reply to तोच तर मुद्दा आहे आणि by संजय क्षीरसागर
तुम्हाला थांबणंच श्रेयस आहे
In reply to मुद्दा मान्य पण .... by गामा पैलवान
संशयाचा फायदा ....
In reply to तुम्हाला थांबणंच श्रेयस आहे by संजय क्षीरसागर
तब्बल साडे अकरा वर्षे!
सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश
सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश
सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश
हेच म्हणतो...
In reply to सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश by चौथा कोनाडा
काय वाट्टेल ते!
.
In reply to काय वाट्टेल ते! by उन्मेष दिक्षीत
.