गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती. मला स्वतःला नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, मित्रांच्या अशा किमान दहा ग्रुपवर ही पोस्ट फाॅरवर्ड म्हणून आली होती.
व्हाॅट्सअपवरच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात आणि त्यावर विश्वास ठेवायचा असतो अशी एकुणात आपल्या भारतीय लोकांची मानसिकता झालीये गेल्या काही वर्षात. व्हाॅट्सअपवरचे मॅसेजेस, मग ते नासाच्या तुटणाऱ्या ग्रहांचे असोत, युनेस्कोने जाहीर केलेल्या राष्ट्रगीताचे असोत, वा पाच तोंड असलेल्या शेषनागाच्या दर्शनाचे असोत, आपली लोक त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून, डोळे झाकून आणखी शंभर लोकांना पुढे ढकलून देणार. अगदी त्याच मानसिकतेतून आपल्या लोकांनी वाफ घेण्याच्या गोष्टीची शहानिशा न करता, बहुतेकांनी अडगळीत पडलेले स्टीमर शोधून काढले. काहींनी लगोलग मेडिकल गाठून नवे विकत आणले, आणखी काहींनी अॅमेझाॅनवर चांगल्या प्रतीचे स्टीमर आॅर्डर केले आणि औषधांचा डोस घेतो त्याप्रमाणे सकाळ-दुपार-संध्याकाळ वाफ घ्यायला सुरूवात केली.
केवळ उत्सुकतेपोटी, नाकाच्या पाठी हे अशा प्रकारचे पॅरानेझल सायनस असते का? त्याचे लाॅकिंग मेकॅनिझम म्हणजे नेमके काय? आणि त्यातून खरंच विषाणू थेट फुप्पूसात जावू शकतात हे मी गुगलबाबाला विचारून पाह्यले, पण शेवटी गुगलबाबा म्हणजे कुणी डाॅक्टर नव्हे असं स्वतःची समजूत घालून तो नाद सोडला आणि गपगुमान दुसऱ्या दिवशी मेडिकलमधून साधे स्टीमर विकत घरी आणले.
या मॅसेजच्या वायरलनंतर काही दिवसांनी कूपर हाॅस्पीटलच्या दोन डाॅक्टरांमधला संवाद म्हणून एक आॅडीओ क्लिप व्हाॅट्सअप युनिवर्सिटीवर पसरू लागली. इतके दिवस दुर्लक्षित केलेली ती क्लिप आज सकाळी प्रत्यक्ष एेकली आणि आपला बेंबट्या झाला आहे याची शंभर टक्के खात्री पटली. त्या एकंदर संवादात त्यातल्या कथित डाॅक्टर भोसलेंच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा त्या मॅसेजमधलाच होता. अगदी समोर मॅसेज ठेवून वाचत असल्यासारखा, फक्त अविर्भाव मात्र विश्वातले मोठे गुपीत सांगितल्यासारखा होता. खरेच डाॅक्टर होते कि व्हाॅट्सअॅप युनिवर्सिटीतल्या फाॅरवर्ड्समधून शिकलेले स्वयंघोषित डाॅक्टर होते, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आधी वायरल झालेल्या मॅसेजप्रमाणेच, क्लिपमधल्या संभाषणातली ती व्यक्तीही लोकांपर्यंत अर्धवट आणि चुकीची माहिती पोहचवत होती. एकुणातच आधीच्या मॅसेजमुळे आणि या आॅडीओ क्लिपमुळे, लोकांच्या घाबरलेल्या मानसिकतेला अशा सगळ्या खोट्या गोष्टींतून खतपाणी घालून वेगाने गैरसमज पसरवण्याचे काम आपोआप झालेय यात काही शंकाच नाही.
डाॅ. संग्राम पाटील यांचा या संदर्भातला युट्यूबवर व्हिडिओ आहे. त्या क्लिपमधल्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यातला आवर्जून लक्षात घेण्याजोगा असा दुसरा मुद्दा म्हणजे, ४०° ते ६०° तापमानातली वाफ घेण्यामुळे करोनाचे विषाणू मरत नाहीत, तर त्यामुळे आपलाच चेहरा भाजण्याची शक्यता जास्त होते. करोनाचा विषाणू ७०° किंवा त्यावरील तापमानात जिवंत राहू शकत नाही आणि त्याखालील तापमानाची वाफ घेतली तर त्यामुळे आपल्याला भाजण्याचे चान्सेस जास्त या गोष्टीला अधोरेखित करणे महत्वाचे. करोनाचा विषाणू सुरूवातीचे तीन-चार दिवस घशात/पॅरानेझल सायनसमध्ये राहतो आणि तिथून मग फुप्पूसात शिरतो वैगेरे आॅल बुलशीट !!
ट्रेकिंग करताना सर्वात पुढे वाटाड्या चालत असतो आणि त्याच्या मागोमाग इतर लोक चालत असतात. ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी, ज्या दिशेेने वाटाड्या वाटेने चालत राहील, त्याच्या पाठोपाठ जात रहायचे एवढेच लोकांना ठाऊक असते. पुढे मग तो वाटाड्या चुकीच्या वाटेने चालत राहीला, तरी डोक्याने सारासार विचार करणे थांबवून लोक चुकलेल्या वाटेवरून चालतच राहतात, प्रश्न न करता !! वाट चुकल्याचे जेव्हा कळते, तेव्हा शारीरिक त्रास तर होतोच पण त्यापेक्षा जास्त मानसिक त्रास होतो. फेसबूक, व्हाॅट्सअॅपसारखी समाजमाध्यमे ही त्या वाट चुकवलेल्या वाटाड्यासारखी झालीयेत सध्या. जनता सारासार विचार न करता, चुकीच्या गोष्टींमागे डोळे बंद करून पळते आहे निव्वळ !!
सध्याच्या कठीण काळात, शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासोबतच अशा सगळ्या सरसकट येणाऱ्या मॅसेजेसकडे डोळस नजरेने बघणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
- किसन शिंदे
वाचने
54470
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
होत नाही
Moist heat
In reply to होत नाही by Gk
पाण्याच्या वाफेचे तापमान किती असते.
.
In reply to पाण्याच्या वाफेचे तापमान किती असते. by Rajesh188
अहो असे काय म्हणताय
काय नोट ?
In reply to अहो असे काय म्हणताय by अत्रन्गि पाउस
वाफेने मरत नाही मग कसा मरतो
मला वाटतंय वाफेचे तापमान ६०
60 ते 70 c तापमान मध्ये व्हायरस निष्क्रिय होतो
60 ते 70 c तापमान मध्ये व्हायरस निष्क्रिय होतो
पाणी उकळून त्याची वाफ
एक प्रश्न.
In reply to पाणी उकळून त्याची वाफ by सुबोध खरे
नीट रम ?
In reply to एक प्रश्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा
In reply to नीट रम ? by कपिलमुनी
रमचे रेट सिंगल माल्ट पेक्षा
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डिबी, विषाणु नष्ट कसा करायचा हाच तर
In reply to एक प्रश्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा अॅक्च्युअल अनुभव बघा :
In reply to डिबी, विषाणु नष्ट कसा करायचा हाच तर by संजय क्षीरसागर
सर, फायदा होतो न होतो , तो
In reply to हा अॅक्च्युअल अनुभव बघा : by संजय क्षीरसागर
आपल्या भांड्यावर कोरोनाचे
In reply to सर, फायदा होतो न होतो , तो by mrcoolguynice
माझेही हेच मत आहे, विषाणू
In reply to आपल्या भांड्यावर कोरोनाचे by सुबोध खरे
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प
In reply to माझेही हेच मत आहे, विषाणू by mrcoolguynice
सेमपिंच , मलाही हाच सुविचार
In reply to आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प by सुबोध खरे
वाफ घेणे हे आत्ताच सुरू झाले नाही
In reply to माझेही हेच मत आहे, विषाणू by mrcoolguynice
वाफ घेण्या न घेण्याला काही
In reply to वाफ घेणे हे आत्ताच सुरू झाले नाही by Rajesh188
आभार.
In reply to वाफ घेण्या न घेण्याला काही by mrcoolguynice
वाफ घेतल्याने करोना बरा होत
In reply to वाफ घेण्या न घेण्याला काही by mrcoolguynice
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात"
In reply to वाफ घेतल्याने करोना बरा होत by सुबोध खरे
@ सुबोध खरे : आता फुल पल्टी मारली !
In reply to "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" by सुबोध खरे
he always said, he refer WHO, to whom you refer ???
In reply to @ सुबोध खरे : आता फुल पल्टी मारली ! by संजय क्षीरसागर
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला
In reply to @ सुबोध खरे : आता फुल पल्टी मारली ! by संजय क्षीरसागर
आता ही आत-बाहेरची नवी भानगड !
In reply to हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला by सुबोध खरे
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि
In reply to आता ही आत-बाहेरची नवी भानगड ! by संजय क्षीरसागर
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला
In reply to @ सुबोध खरे : आता फुल पल्टी मारली ! by संजय क्षीरसागर
संक्षी यांनी डोंगर पोखरून
In reply to हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला by मराठी कथालेखक
@ सुबोध खरे : तुम्ही दिलेल्या लिंक्स
In reply to संक्षी यांनी डोंगर पोखरून by सुबोध खरे
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही दिलेल्या लिंक्स by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : आणखी किती फेकणार ?
In reply to शिक्षण करत असताना आपण बऱ्याच by सुबोध खरे
दुसरं काही सापडलं नाही म्हणून
In reply to @ सुबोध खरे : आणखी किती फेकणार ? by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : तसं बरंच काही आहे, पण
In reply to दुसरं काही सापडलं नाही म्हणून by सुबोध खरे
तें विधान मुळीच चुकीचे नाही.
In reply to @ सुबोध खरे : तसं बरंच काही आहे, पण by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : काय बोल्ता ?
In reply to तें विधान मुळीच चुकीचे नाही. by सुबोध खरे
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य
In reply to @ सुबोध खरे : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर
हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाहीमग याच लक्षणावरून, (delusion
In reply to हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य by सुबोध खरे
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे
In reply to मग याच लक्षणावरून, (delusion by mrcoolguynice
आधी
In reply to श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे by सुबोध खरे
हो ना
In reply to आधी by mrcoolguynice
बाकी संक्षी म्हणतात,
In reply to हो ना by सुबोध खरे
विषय भरकटवणे,
In reply to बाकी संक्षी म्हणतात, by mrcoolguynice
विषय भरकटवणे,
मूळ विषय काय आहे त्यात श्री मोदी कुणी आणलं? आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकालामाझ्यामते मूळ विषय "आपण"
In reply to विषय भरकटवणे, by सुबोध खरे
मूळ विषय हा सध्या असलेल्या
In reply to माझ्यामते मूळ विषय "आपण" by mrcoolguynice
मूळ मुद्दा जर महामारीचा होता,
In reply to मूळ विषय हा सध्या असलेल्या by सुबोध खरे
मूळ विषय हा सध्या असलेल्या
In reply to मूळ मुद्दा जर महामारीचा होता, by mrcoolguynice
त्याच शहाजोगपणे, संक्षीवर
In reply to मूळ विषय हा सध्या असलेल्या by सुबोध खरे
मूळ विषय हा सध्या असलेल्या
In reply to त्याच शहाजोगपणे, संक्षीवर by mrcoolguynice
जर
In reply to मूळ विषय हा सध्या असलेल्या by सुबोध खरे
आमच्या वादात तुम्हाला नाक
In reply to जर by mrcoolguynice
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन
In reply to आमच्या वादात तुम्हाला नाक by सुबोध खरे
जिकडे तिकडे श्री मोदी याना
In reply to मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन by mrcoolguynice
मोदींचा उल्लेख आल्यावर एवढं
In reply to जिकडे तिकडे श्री मोदी याना by सुबोध खरे
जिकडे तिकडे श्री मोदी याना
In reply to मोदींचा उल्लेख आल्यावर एवढं by mrcoolguynice
खरं खरं आडनाव मोदी
In reply to जिकडे तिकडे श्री मोदी याना by सुबोध खरे
बरं बुवा तुमचीच लाल
In reply to खरं खरं आडनाव मोदी by mrcoolguynice
"तुमचीसुद्धा लाल " हे उदगार
In reply to बरं बुवा तुमचीच लाल by सुबोध खरे
ब्वॉर्र
In reply to "तुमचीसुद्धा लाल " हे उदगार by mrcoolguynice
खिक्क
In reply to ब्वॉर्र by सुबोध खरे
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला
In reply to पाणी उकळून त्याची वाफ by सुबोध खरे
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी
In reply to पण म्हणजे डॉक जर एखाद्याला by राजाभाउ
समजलं धन्यवाद.
In reply to नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी by सुबोध खरे
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना
बंबा ला नळ असतो ना
In reply to फार वर्षांपूर्वी घडलेली घटना by भीमराव
.
In reply to बंबा ला नळ असतो ना by Rajesh188
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक
In reply to बंबा ला नळ असतो ना by Rajesh188
वाफ व नोटांबंदी
शरीराच्या प्रतिकार यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळीबार चाल
करोना वर औषध नाही, प्रतिबंध
माझे वैयक्तिक मत
In reply to करोना वर औषध नाही, प्रतिबंध by मराठी_माणूस
बंद करायची का मेडीकल कॉलेजेस आणि हॉस्पीटल्स सगळी ?
In reply to करोना वर औषध नाही, प्रतिबंध by मराठी_माणूस
जास्त बिल
क्या बाते !
In reply to जास्त बिल by Rajesh188
या विषयावर
उत्तम प्रतिसाद
In reply to या विषयावर by तिमा
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला
जर ही आकरणी योग्य असेल तर मग
In reply to हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला by सुबोध खरे
रेमडेसीव्हिर या औषधाची
In reply to जर ही आकरणी योग्य असेल तर मग by मराठी_माणूस
सहमते आहे.
In reply to रेमडेसीव्हिर या औषधाची by सुबोध खरे
+थाळी
In reply to सहमते आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी आपलं दिवा-पणतीच्या
In reply to सहमते आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जीवो जीवस्य जीवनम....
In reply to मी आपलं दिवा-पणतीच्या by सुबोध खरे
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची
In reply to जीवो जीवस्य जीवनम.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं.....!
In reply to डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची by सुबोध खरे