(ब्यूटी पार्लर अर्थात काव्यफुफाटा)
सक्काळी सक्काळी मिपावर आलो आणि 'ब्यूटी पार्लर अर्थात यौवन फुफाटा' ही कविता वाचून डोळे भरुन आले! काल भडकमकर मास्तरांनी जालिंदर जलालाबादींची ओळख काय करुन दिली आणि आज ही नवकविता वाचायला काय मिळाली, सगळेच विलक्षण! हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! धन्य आहेस माऊली धन्य आहेस!! अशा साक्षात्काराच्या क्षणी कविता होणार नाही तर काय होणार?
सांग ढापण्या
कसा मी फसतो...
.....
पायजमा पट्ट्यापट्यात
नाड्यांचे गुंतलेले पेड
....
मळमळे जीव नुरे
काचेवर धूम्र पुटे
....
हल्लीच लावलिये शेंडी
अन् कातरलेत आरंभशूर कल्ले
...
फसव्या कवितेची झालीय बाधा
वाचकगणांची विचक्षण त्रेधा
...
काव्यपुटकुळ्यांना मसाज अन् मलम?
का सरळ करावेत कलम?
...
कशाला अनमान अन् कोणते सोपस्कार
रंग्या रंग्या कविता फार...
चतुरंग
वाचने
6256
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
लै भारी
वाचवा
क ह र
In reply to क ह र by ३_१४ विक्षिप्त अदिती
वाईट्ट.. हाईट्ट...
In reply to वाईट्ट.. हाईट्ट... by प्राजु
+१
अहो
जबऱ्या
छे! छे!
बाप रे....
दंगा
णिषेढ...
In reply to णिषेढ... by भडकमकर मास्तर
+१
मस्त रे
आता कुठे
In reply to आता कुठे by मदनबाण
ठ्या: !!!!!!!!!!!!!!
फार
हा हा
टिउ शी
सांग ढापण्या... हा हा हा हा...
साला हा
बापरे;भयंकर!
रगाशेठ..
हल्लीच