आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका. विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे
रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !
एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !
बुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडॆ
.
प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण ( पाणी भरण्याकरिता अनावष्यक पण शृंगाराला आवष्यक असे अलंकार ) बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले,"मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली." मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको ? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !" च्या.
आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या "कृष्णा"ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंत नाही. तो साफ़ सांगतो " माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे. पटत नाही ? पंढरपूरचा विठ्ठल पहा !"
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?
अवांतर १. : विष्णुदास नामा म्हणजे म्हणजे आपले नेहमीचे, विठ्ठलाला खीर पाजणारे, जानेश्वरांचे सांगाती, नामदेव महाराज नव्हेत. हे बरेच नंतरच्रे. पण गाथेत याचे अभंग पहिल्या नामदेवांच्या अभंगातच मिसळून टाकले आहेत. "कॉपी राईट" कायदा नव्हता ना !
अवांतर २. : "अभिसारिका" वरून आठवले, मी तसा मिपावर नवा. पण वरवर चाळून मला मिपावर "अष्टनायिका" यावर काही सापडले नाही. गुणीजनांचे रसग्रहण राहून गेले की काय ?
शरद
वाचने
32959
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचनीय
+१
In reply to वाचनीय by श्रावण मोडक
+२
In reply to +१ by मिसळभोक्ता
+३
In reply to +२ by पैसा
+३ छानच!
In reply to +२ by पैसा
+४
In reply to +३ छानच! by चतुरंग
कै श्रावण मोडक आणि राजेश घासकडवी यांच्या लेखनाची आठवण झाली
In reply to वाचनीय by श्रावण मोडक
खुपच सुन्दर....श्रामोंशी
मस्तं मेजवानी.
या पदाचा
कॉलिंग नंदन, मागे नंदनने या
In reply to या पदाचा by सहज
शरदराव ,
हा घ्या दुवा..
अच्छा
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
श्रामो???
In reply to अच्छा by श्रावण मोडक
नाही
In reply to श्रामो??? by मस्त कलंदर
मस्त कलंदरा...
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
दुव्यावर ऐकायला येणारे गाणे ओरिजनल नाही.
In reply to मस्त कलंदरा... by संजय अभ्यंकर
मी
In reply to दुव्यावर ऐकायला येणारे गाणे ओरिजनल नाही. by चिंतामणी
दुव्याबद्दल आभारी......!
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
सुंदर गाणे!
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
मस्त! मस्त! अजूनही लिहा.
विष्णुदास नामा यांचाबद्दल
+ १
In reply to विष्णुदास नामा यांचाबद्दल by llपुण्याचे पेशवेll
थोडा वेगळा अर्थ
कधीकधी
In reply to थोडा वेगळा अर्थ by राजेश घासकडवी
मिभो
In reply to कधीकधी by मिसळभोक्ता
छानच !!
In reply to थोडा वेगळा अर्थ by राजेश घासकडवी
मिभो आणि घासकडवी दोघांशीही
In reply to छानच !! by सूड
मि . भो. शी सहमत. ही गवळण आहे
छान
रसग्रहण अप्रतिम.
बुंथ म्हणजे
In reply to रसग्रहण अप्रतिम. by अडगळ
धन्यवाद
In reply to बुंथ म्हणजे by चतुरंग
शरदभाऊ सिंप्ली अफलातून!
सुरेख रसग्रहण!
छान पद, गाणे
शरदराव धन्यु
खूप सुंदर ! खूपच सहजपणे
शरदराव धन्यु
हा प्रसंग आणि त्याचे कारण
सुंदर विवेचन. मुशाफिर.
नॉस्टॅल्जिक झालो