गाडीच्या गाडीवाना...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S
तुज्या गाडीचा गा बैल
बैलापाठी नक्षाची झुल
तुज्या गाडीचं गा चाक
चाक धावतया एकटाक
गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S
तुज्या बैलाच्या गळ्यात चाळ
चाळ वाजत्यात खुळखुळ
तुज्या कपाळाचा गा घाम
घाम देतोया दाम
गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S
वाचने
1555
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
ह्म्म
In reply to ह्म्म by सुनील
बरोबर
गाडीवान दादा!
In reply to गाडीवान दादा! by क्रान्ति
हेच म्हणते..