लेपाक्षी - हम्पी व परत भाग 3

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
23 Apr 2020 - 6:16 pm

भाग 1

भाग 2
आता भाग दोन वरून पुढे

सकाळचे सुमारे सात . ट्रेन होस्पेट स्टेशनात शिरली. धोपटी पाठिशी मारून बाहेर आलो .बाहेर येणाऱ्या प्रत्येका भोवती रिक्षावाल्यांचा गराडा व गलका . मी अगोदर ठरवून ठेवलेले वाक्य " मला बेल्लरीला जायचेय ! " सांगून सुटका करून घेतली. एका रिक्षावाल्याने २० रू मध्ये बस स्थानकावर सोडले . १५ वर्षापुर्वी हंपीला जाणार्या बस नव्हत्याच ,कमलापुरला होत्या .आता जे एन आर यू एम योजनेच्या आकर्षक बसमधुन फक्त १६ रू मध्ये हंपीला पोहोचता येते .अशा बसेस दर अर्ध्या तासाने आहेत. लगोलग बस मिळाली .आता होस्पेट ते हंपी रस्ता खूप छान व प्रशस्त झाला आहे . मधुनच शेत , नारळाची झाडे , केळ्यांच्या बागा ,अधून मधून एखादा भग्नावशेष असे करत आपण एका तिठ्यावर येतो . डावीकडे हंपीचा मार्ग कापीत बस हंपीच्या दारात आपाल्याला घेयून जाते .
.

हम्पीचे प्रवेश द्वार
,
हम्प्पी जवळ आली बरे का !

डाव्या बाजूला श्रीकृष्णा मंदिर तर उजव्या बाजूला भाजी बाजाराच्या अवशेषाचे दर्शन घडवीत बस आपलयाला हम्पीच्या बस स्थानकावर सोडते अन पुन्हा हम्पीच्या माहितीपत्रकासह रिक्षावाले आपल्यावर तुटून पडतात.
.
मी उतरलेल्या लॉज चे " रूफ्टॉप रेस्टोरंट "

मी त्या सर्वाना " बुकिंग झाले आहे ! " मी दोन तीन वेळा हम्पीला येऊन गेलो आहे !" असे सांगून कटवले.
.

.
,
एखाद्या चित्रपटाला आदर्श असा सेट -- हम्पीतील माझा एक आवडता कोपरा

.

,
भारत देशाच्या पर्यटनात आंतरराष्ट्रीय स्तरावर हम्प्पी, ओरछा, जयपूर, जोधपूर जेसल्मेर, माउंट अबू खजुराहो , कोणार्क , हळेबिडू व बेलूर याना फार महत्वाचे स्थान आहे. हा मंच दरवर्षी होणाऱ्या हम्पी महोत्सवातील नृत्य नाट्य यांचे साठी

तेरा वर्षापूर्वी हम्पीला आलो होतो . त्यापेक्षा आत सीन थोडा वेगळा दिसला. विरूपाक्ष देवळा समोर जो हम्पी बाजार नावाचा रस्ता आहे, त्याच्या दुतर्फा असलेली घरे कम दुकाने आता तेथून २ किमी वर असलेल्या ' न्यु हम्पी" येथे हलविण्यात आली आहेत. हम्पी या मूळ गावात पन्नसेक घरे असतील ते सोडता बाकीच्या पूर्ण परिसराचा ( नदी अलेकडच्या ) ताबा सरकारने घेतला आहे.हंपीतील स्थानिकांना सरकार अंतर्गत रस्ते सुधारून देत नाही. कारण मुळात या परिसरात त्यांना स्थानिकांना इतक्या जवळ राहायला नको आहे .गावातील रस्ते सोडता बाहेर मात्र सरकारने चांगले रस्ते केलेत.
,

विरूपाक्ष मंदिर कळस

मी माझी धोपटी पाठीवर टाकून बस थाम्बा सोडला व रस्त्यावर आलो. विरूपाक्ष मंदिराच्या भव्य गोपुराचे दर्शन झाले. विरूपाक्ष मन्दिराकडे तोंड केले की उजव्या बाजूस नदीला समान्तर असे हम्पी ग्राम वसलेय. मात्र या गावात नवीन माणसाला फिरताना गोंधळायला होते कारण सर्वच घरे आता दुमजली झालेली. खाली निवास वर खोल्या व उपहार गृह अशी रचना. त्यामुळे खूण ठेवणे अवघड होते. मी माझे निवासस्थान शोधून काढले . रात्रीच पाउंस पडून गेला असल्याने रस्त्यात चिखल होता. त्यातूनही माग काढत एकदाचा पोहोचलो .,मेक माय ट्रीप च्या साईट वरून छापलेले व्हाउचर मालकाला दाखवून , आधार कार्ड पुढे केले. तो सोपस्कार करी तो त्याने टेरेस वर थाटलेल्या उपहार गृहा कडे नजर टाकली . त्याच्या आणखी वर असलेल्या टेरेस वर गेलो व तुंगभद्रा नदीकडे व विरूपाक्ष मंदिराकडे कटाक्ष टाकला.नदीला बर्यापैकी पाणी असल्याने हम्पी सेक्रेड एरिया ते हम्पी हिप्पी आयलंड या नदीच्या भिन्न तीरांवरअसलेल्या दोन भागाना जोडणारी नावेची वहातूक बंद होती.

चेक इन चे सोपस्कार झाल्यावर स्नान करून लगेचच फिरायला बाहेर पडलो त्यावेळी अकरा वाजायला आले होते. हम्पी बाजार नावाच्या रस्त्यावर आपण आलो की विरूपाक्ष मन्दिराच्या एका कडेला लागून असलेली हेमकूट टेकडी दिसते तर रस्त्याच्या अगदी टोकाला मातंग टेकडी दिसते. मन्दिर ते मातंग टेकडी ( मतंग ??) इतक्या अन्तरात रस्त्याच्या दुतर्फा ओळीने त्याकाळी किंमती वस्तूंचा व्यापार करणारी पण आता खालच्या खाम्बांवर कशीबशी उभी राहिलेली दुकाने आहेत. येथील कोणत्याही स्मारकाला काही इजा केलुयाचे सिद्ध झाल्यास जबरी दण्ड भरण्याची तरतूद असलेला कायदा आहे ! १३ वर्शापूवी इथे नारळ विकायला स्थानिक बसायचे पण आता सर्व सरकारी अमलाखाली आले आहे. फक्त अपवादाला या लाईनमधे पोलिस स्टेशनला मात्र जाग दिली आहे. दुतर्फा असलेली ही ओळ एकमजली असली तरी मधून मधून दोन मजली बान्धकाम दिसते.
.
, त्यावर मर्कट्लीलात मग्न असलेल्या माकडांचे फोटो काढीत मातंग टेकडी एन्ड च्य बाजूने सरकत होतो. पोलीस स्टेशनला विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारून घेतला आणि एक पाय वाटेने नदीकाठाने पुढे पुढे जाऊ लागलो
,

.
फोटोच्या मध्यभागी दूरवर हनुमान टेकडी इथे मारूतीचा जन्म झाला असल्याची अख्यायिका आहे .

.
या मार्गावरून तुंगभद्रा नदीचे मनोहारी दर्शन घेत जाणे हा हम्पीच्या सहलीचा एक " मस्ट" आहे !

. नदीला पाणी मध्यम होते. यावर्षी हंपी बाजार रस्ता पाण्याखाली होता इतके पाणी गावात शिरले होते .
,
मला मिळालेली कम्पनी

.
किश्किंधा नगरीचे आजचे नागरिक
.
हम्पीतील मासेमारीची सकाळ

पोलीस स्टेशन ते विठठल मंदिर हा रस्ता एक अविस्मरणीय अनुभव आहे. जे कार घेऊन येतात व सर्व हंपी पहातात त्यांना या अनुभवापासून वंचित व्हावे लागते. मोठंमोठे धोंडे त्यातून सापटीतून वाट काढीत एका बाजूस वहाणार्या तुंगभद्रेच्या पात्राचे तर कधी दुरवर दिसणार्या हनुमानहल्ली टेकडीचे अवलोकन करीत आपण कोदंडधारी राम मंदीरापर्यंत येऊन पोहोचतो. मला वाटेत काही तरुण मुलं व मुली भेटल्या .त्यांच्या बरोबर हास्य विनोद करत आम्ही सर्व राम मंदिराशी पोचतो तो वातावरणाने रंग बदलला .एकदम आभाळ भरून आले. आमच्यात पांगापांग झाली
,

.

.
.
विजय विट्ठ्ल मंदिराच्या वाटेवरील "वराह " मंदिराच्या परिसरातून मातंग टेकडीचे दर्शन

. मी राममंदीराच्या चौथऱ्याचा आसरा घेउन बाहेरचा पाऊस पाहत मंदिराच्या पुजाऱ्याशी वार्तालाप करीत बसलो.

विचारले असता पुजार्याने आता आपण जिथे बसले आहोत तो भाग पाण्याखाली जाउन रामचंद्राला देखील छातीपर्यंत पाण्याने घेरले होते असे सांगितले. रामाचे मंदिराचे बरोबर समोर दूरवर टेकडी हनुमंताचे मंदिर ( व जन्मस्थान ही ) आहे . तो तिथून रामाला नतमस्तक झाला आहे असे मी पुजार्याला सांगताच आमच्या कधी लक्षातच हे कल्पना आली नसल्याचे त्याने कबूल केले. दरम्यान पाउस थांबला. मी त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो.

पुढे गेले की वराह मंदिर लागते . ते तुंगभद्रा नदीच्या काठाला जवळ जवळ लागून आहे. पूर्वेकडे पाहिले तर प्रशस्त असे लाम्बलचक आंगण व त्याच्या अगदी शेवटी अच्युतराय मंदिर आहे. मतंग टेकडीवर जाणारी एक अवघड वाट त्या मंदिराच्या बाजूने जाते.
.

.
भारतातील " मॅकेनाज गोल्ड " चा सेट -- खरोखरच ही नगरी एकेकाळी अतिशय संपन्न सोनेरी च होती .

.
हंपीच्या शिल्पकलेचा मुकुटमणी " विजय विठ्ठला " मंदिर

.
मन्दिराचा अन्तर्भाग

.
मुख्य मन्दिराचा दर्शनी भाग

.
.

वराह मंदिर पाहून ज़ाल्यावर अच्युतराय मंदिर व टेकडी शेवटच्या दिवसासाठी राखून पुढे विठ्ठल मंदिराकडे निघालो. वाटेत " किंग्ज बॅलन्स " पाहायाला मिळतो.तीन किलोमीटरची पायपीट झाल्यावर तिकीट काढून विठ्ठल मंदिरात शिरलो. हम्पीच्या मंदिरांपैकी एक प्रमुख व उत्तम शिल्पकारी असलेले हे मंदीर भव्य पटांगण , संगीता चे सूर काढणारे दगडी खांब व खास करून हम्पीचे चिन्ह असलेले " रथ" हे शिल्प यासाठी हे प्रसिद्ध आहे. या चिन्हाला आता भारताच्या नोटेवर स्थान मिळाले आहे.

.
,
.

.

या वीजेवर चालणार्‍या गाड्या विठ्ठल मंदिर परिसरातच एका किमी साठी चालतात .त्या महिला चालवितात .

.

विठ्ठल मंदिरात येऊन पाचेक मिनिटे झाली असतील तोच उन्हात पाऊस सुरू झाला . हलक्या सरी असल्या तरी बाजूच्या कोरीव मंडपात आसरा घ्यावा लागला . इथे " इथे नजर बचाकर चाले गये वो " या गीतेचे शूटिंग शम्मी कपूर व माला सिन्हा यांच्या वर झाले आहे. थोड्याच वेळात पाऊस पळाला . पुन्हा अंगणात येऊन विठ्ठल मंदिराचे निरीक्षण करू लागलो. आता आत काहीतरी दुरुस्तीचे काम चालू असल्याने प्रवेश नव्हताच व ते "म्युझिकल पिलर " आता वाजवू देत नाहीत असेही कळले ! बाहेर आलो तशा इथे छोट्या इलेक्ट्रिक गाड्या उभ्या होत्या. मला वाटले ज्यांना हंपी बस स्टॅण्ड पासून विठ्ठ्ल मंदिरापर्यंत चालत येणे शक्य नाही त्यांच्यासाठी छान सोय केली आहे. मी तीत बसलो . तिकीट दहा नऊ फक्त. पण त्या गाड्या पाचेक मिनिटांनी १ किमी वर थांबल्या . तिथे चौकशी करता असे कळले की इथून बस स्टॅण्ड लांब आहे. पुन्हा दहा रुपये देऊन विठ्ठल मंदिराजवळ आलो. सूर्य पश्चिम क्षितिजाच्या बाजूवर झुकून झाला होता.पुन्हा नदीकाठच्या मार्गाने ३ कि मी चालत पोलीस स्टेशन पाशी आलो. आता अंगात अजिबात त्राण राहिले नव्हते .उद्याचा दिवस मूळ प्लानप्रमाणे नदीच्या पलीकडे जाण्याचा होता पण........
क्रमशः:

प्रतिक्रिया

कंजूस's picture

23 Apr 2020 - 8:17 pm | कंजूस

फोटो छान घेतले आहेत.
नदीकाठाने प्रत्येक मंदिर आणि वास्तू पाहात गेलो होतो. मला लोनली प्लानिट नकाशाचा फार उपयोग झाला. पहिल्या ट्रिपला असाच एकटा जाऊन विठ्ठल मंदिरावरून परत नदीकाठाने आलो. अच्युतरायच्या मागच्या बाजूने मतंग टेकडीजवळून परत हंपि बाजारात उतरलो.

दोन वर्षांनी सहकुकटुंब गेल्यावर मात्र इलेक्ट्रीक कारने पलीकडे गेलो. एक रिक्षा( सिक्स सीटर) होती. कमलापूर (६ किमी) चे रु दोनशे म्हणाला. (स्पेशल) . मग परत इलेक्ट्रिक रिक्षाच्या रांगेत आलो. पाच मिनिटांत रिक्षा ड्रायवर बोलवायला आला. " चला शेअरिंगचे तिघे आलेत. तुमचे तिघांचे साठ रु." मग निघालो आणि कमलापूरला जाताना मोडक्या कानडीत गप्पांसाठी त्यास चावी मारली. वाटेतले कवठाचे झाड , हत्तींना आवडता वगैरे बोलला.

शेखरमोघे's picture

23 Apr 2020 - 9:43 pm | शेखरमोघे

छान हम्पीदर्शन!!

सौंदाळा's picture

23 Apr 2020 - 9:46 pm | सौंदाळा

मस्त चालू आहे सफर

प्रचेतस's picture

24 Apr 2020 - 11:20 am | प्रचेतस

खूप छान लिहिलंत काका. हंपी अगदी जिव्हाळ्याचा कोपरा आहे.

आम्ही कारने गेलो असल्याने आणि वेळ कमी असल्याने विरुपाक्ष ते विठ्ठल मंदिर ह्या रस्त्याने चालत जाण्याचे राहिले.
हंपी अद्भुत आहे. विठ्ठल मंदिरात सभामंडपात प्रवेश बंदच केलेला आहे. स्तंभ कुणी वाजवू नयेत म्हणूनच हे केलेले दिसते मात्र आजूबाजूच्या मंडपातील स्तंभही एकदम छान वाजतात ते जरुर करुन बघावे. विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍यात मात्र जाता येते. विठ्ठल मंदिराचे उजव्या बाजूच्या मंडपात अनेक मूर्ती आहेत त्यातली घोड्यावर बसलेली एका बुटक्या माणसाची मूर्ती हि सम्राट कृष्णदेवरायाची असल्याचे मानले जाते. वास्तुशास्त्राचा चमत्कार आहे हे मंदिर.

पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

कंजूस's picture

24 Apr 2020 - 7:39 pm | कंजूस

>>>>आजूबाजूच्या मंडपातील स्तंभही एकदम छान वाजतात ते जरुर करुन बघावे. >>>>
गाईड असला तर तो वाथवून दाखवतो. कन्याकुमारीजवळच्या सुचिंद्रम मंदिरातील स्तंभ उत्तम वाजतात. शिवाय सेवेकरीही लगेच वाजवून दाखवतात. परदेशी पर्यटकांना प्रवेश आहे.

किल्लेदार's picture

25 Apr 2020 - 1:33 am | किल्लेदार

प्रचेतस म्हणाले तसे हंपी अगदी जिव्हाळ्याचा कोपरा आहे.

इथे जायच्या आधी या जागेचा इतिहास वाचलेला होता त्यामुळे भग्न अवशेष पाहून डोळे खरोखर पाणावले. पण ज्या वास्तू अजूनही उभ्या आहेत त्या मूळ विजयनगरचे साम्राज्य किती वैभवशाली होते हे दाखवायला पुरेशा आहेत.

हंपीला फिरण्यासाठी माझ्या मते सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. मी ३ दिवस मनसोक्त भटकलो पण नीट बघायचे असेल तर कदाचित आठवडाही पुरणार नाही.

पु.भा.प्र. हनुमंताच्या टेकडीवर तुम्ही गेलाच असाल अशी आशा आहे. तिथून हंपी परिसराचे जे दृष्य दिसते त्याला खरंच तोड नाही.

अनिंद्य's picture

25 Apr 2020 - 1:49 pm | अनिंद्य

वा ! सुंदर वर्णन आणि फोटो.

हम्पीने आजवर हुलकावणीच दिली आहे - त्याकारणे बकेटीत वरचा नंबर आहे हंपी बदामीचा :-)

चौकटराजा's picture

25 Apr 2020 - 4:44 pm | चौकटराजा

काहीही चुकवा पण हम्पी व ओर्छा ही दोन ठिकाणे अजिबात चुकवू नका !

अनिंद्य's picture

25 Apr 2020 - 7:13 pm | अनिंद्य

सहमत ! बघू योग कधी येतो

हंपी बघणं मस्ट आहे, इतर शहरात बघायला ' ठिकाणं 'असतात. पण हंपी हेच एक 'शहर' आहे किमान महिनाभर मुक्काम ठोकावा लागेल.

या हिवाळ्यात हंपी-बदामीची सहल करायचा विचार आहे. बघूया तोपर्यंत सर्व ठीकठाक झाले तर.

आमचा हिवाळी सहलीसाठीचा एक ग्रुप आहे १४-१५ जणांचा . आम्ही जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने जातो. तेथून सहलीच्या संपूर्ण दिवसांसाठी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी किंवा ३ छोट्या गाड्या ठरवतो.परतीचा प्रवास रेल्वेने .

यावेळी बदामी पर्यंत रेल्वेने जायचा विचार आहे. तेथून पुढे ५ दिवसांकरिता गाडी करून ऐहोळे, पट्टडक्कल, बदामी पाहून हंपीला जाणे .
हंपी, अनेगुंदी, पाहून परतीच्या रेल्वे करीता गदग ला जाणे. (मुंबई व भुसावळ कडे जाणाऱ्या गाड्या)
वाटेत लक्कुंडी पाहणे.

हंपीला ३ दिवस स्पेशल गाडी वापरणे खर्चिक होईल का? लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे हंपी स्थानिक भटकंतीसाठी जास्त खर्च येत नाही असे दिसते.

चौथा कोनाडा's picture

31 Jul 2020 - 6:08 pm | चौथा कोनाडा

वा ! सुंदर वर्णन आणि अप्रतिंम फोटो !
खूप सुरेख लिहिलंत. अगदी छान हंपी दर्शन, चौराजी !!
आता आम्हाला हंपी-बदामी दर्शनाचा योग कधी येतो काय माहीत !

फोटोसहित छानच वर्णन आहे.. माझापण हंपी दर्शन योग कधी जुळतोय..बघू.

गणेशा's picture

4 Aug 2020 - 7:40 pm | गणेशा

अप्रतिम