लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !
लेखनप्रकार
गेली ३० वर्ष मी घरुन काम करतोयं त्यामुळे जे लिहीलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहातो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते.
' जीवन म्हणजे इतकी वर्ष ' अशी अत्यंत चुकीची धारणा आयुष्यात कोणताही बदल घडू देत नाही, कारण जीवन म्हणजे ' एक दिवस गुणीले काही हजार वेळा ' असा हिशेब आहे. थोडक्यात ज्याला आयुष्यात रंग भरायचेत त्याला आजच्या चोवीस तासांच काँपोझिशन बदलायला लागतं. जर आजच्या चोवीस तासात तुम्ही गाण्यासाठी एक तास दिलात, तरच तुमच्या जीवनात गाणं प्रवेश करेल आणि मग ते रोजच्या आजमधे भिनत तुमचं आयुष्य बदलेल. आज तुम्ही जितका जमेल तितका योगा मन लावून केलात तर त्या स्ट्रेचमुळे मोकळं झालेलं शरीर तुम्हाला उद्या योगा करायला उद्युक्त करेल. अशाप्रकारे तुम्ही आजच्या चोवीस तासांच्या काँपोझिशनमधे जितका बदल घडवाल तितकं तुमचं आयुष्य बदलेल.
शिवाय आयुष्यात मजा यायला ते कायम इंटर-अॅक्टीव हवं, म्हणजे मला क्रिकेटची आवड आहे असं म्हणणाऱ्याला जगात सामने सुरू व्हायची वाट बघावी लागते. हेच तुम्ही स्वतः टेबल -टेनीस खेळत असाल तर तुमचा फोरहँडचा बसलेला फटका, जगातल्या कोणत्याही प्लेअरचा कुठल्याही फटका बघण्यापेक्षा, तुम्हाला खाचितच जास्त आनंद देतो. शिवाय तुम्हाला खेळात कौशल्य प्राप्त करायची संधी देतो. तव्दत, नुसतं वाचन जितका आनंद देईल त्यापेक्षा तुमचं स्वतःच लेखन तुम्हाला कैक पटीनी जास्त आनंद देतं; पण त्यासाठी लेखनकला अवगत करायला लागते आणि काही तरी सांगण्यासारखं अनुभव समृध्द जीवन असावं लागतं. कवितेचा व्यासंग आणि स्वतःचा अनुभव कवितेतून मांडणं हा एक वेगळाच कैफ आहे. त्यासाठी शब्दसमृद्धी, लयीचं भान, अनुभवाची उत्कटता अंगी भिनवावी लागते.
पाककला हा जीवनातला एक नितांत रम्य विषय आहे. पत्नीकडून पोळ्या करायला मी आता शिकणार आहे. पोळी जमली की निम्मं आयुष्य सार्थकी लागल्याचा फिल येईल. आपल्या आवडीच्या पाककृती पत्नीसमवेत करण्याची मजा काही औरच आहे.
इथले लॉक्ड इनवरचे दिवस मोजणारे लेख पाहिले, अशाप्रकारे वेळ घालवणं म्हणजे केवळ कालापव्यय आहे. ते सगळे पर्याय काहीच करायला नसतांना ठीक आहेत, पण हा कालावधी वाढला (आणि तीच शक्यता जास्त आहे) तर त्यातून यथावकाश डिप्रेशन येईल आणि हाती आलेली अपूर्व संधी निसटून जाईल.
व्यक्तीचं जीवन हे वृक्षाप्रमाणे बहरत जायला हवं, रोज नवं काही तरी शिकावं, नव्या विषयाचा मागोवा घ्यावा, आपला असलेला स्कील सेट आणखी कारगर करत न्यावा असं मला वाटतं आणि निदान मी तरी तसा जगत आलोयं. या निमित्तानं हा लेख कदाचित तुमचंही जीवन बदलू शकेल.
वाचने
19178
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
चांगला लेख
In reply to चांगला लेख by सौन्दर्य
गेलेल्या दिवसात मी काय मिळवलं यापेक्षा आज मी काय करणार आहे
In reply to गेलेल्या दिवसात मी काय मिळवलं यापेक्षा आज मी काय करणार आहे by संजय क्षीरसागर
समर्पक उत्तर....
चांगला लेख आहे कोरोनाशी क्रिएटीव्ह मुकाबला
In reply to चांगला लेख आहे कोरोनाशी क्रिएटीव्ह मुकाबला by मारवा
कोरोनाशी मुकाबला करण्याचा एकमेव उपाय म्हणजे
मुलांचा अभ्यास घ्या !
छान लेख! या लेखाची प्रेरणा
In reply to छान लेख! या लेखाची प्रेरणा by जव्हेरगंज
बेस्ट !
छान पॉझिटिव्ह लेख. वेलकम बॅक
In reply to छान पॉझिटिव्ह लेख. वेलकम बॅक by गवि
थँक्स !
स्वागत आहे सेठ.
In reply to स्वागत आहे सेठ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा !
क्लास.
In reply to क्लास. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही नेमक्या ओळी निवडल्या !
विचार आवडले
In reply to विचार आवडले by श्रीरंग_जोशी
आयुष्य निष्प्रश्र करून टाकलं आहे !
पयशे मिळवण्याकरता करण्याचे
सरकारी पाहुणचार ...
In reply to सरकारी पाहुणचार ... by चौकस२१२
या धाग्यावर
अजून एक महत्वाचा शब्द
लेख आवडला... माकडे कुठे गेली ???
In reply to लेख आवडला... माकडे कुठे गेली ??? by चित्रगुप्त
लगे रहो !
लॉक्ड डाउन = अंतर्मुख
In reply to लॉक्ड डाउन = अंतर्मुख by सोत्रि
अर्थात !
माझे धोरण
In reply to माझे धोरण by चौकटराजा
व्वा !
In reply to व्वा ! by संजय क्षीरसागर
मी मधे यामाहा एम -५० घेतला
In reply to मी मधे यामाहा एम -५० घेतला by संजय क्षीरसागर
अद्धा त्रिताल ... ?
In reply to अद्धा त्रिताल ... ? by चौकटराजा
नाही !
In reply to मी मधे यामाहा एम -५० घेतला by संजय क्षीरसागर
एकदा
In reply to माझे धोरण by चौकटराजा
"फुरसतीपणाचे धंदे" हेच खरे जगणे.
स्वागत
लॉक डाऊन मध्ये वेळ कसा घालवावा?
सुरेख
In reply to सुरेख by Jayant Naik
बहुतांश लोकांना शांतता आणि
दर्जेदार सुंदर पॉर्न चा आनंद घेणे हा ही एक पर्याय आहे.
In reply to दर्जेदार सुंदर पॉर्न चा आनंद घेणे हा ही एक पर्याय आहे. by मारवा
दुसर्याने जेवताना पाहून त्यात आनंद मानण्याऐवजी
वर आलेले काही प्रतिसाद लेखातल्या दृष्टीकोनाशी संगत नाहीत
.
उज्जयी, भस्त्रिका, कपालभाती
पत्नीकडून पोळ्या करायला मी
In reply to पत्नीकडून पोळ्या करायला मी by आयर्नमॅन
कणिक मळणं हे कौशल्य आहे
In reply to कणिक मळणं हे कौशल्य आहे by संजय क्षीरसागर
अरे खरेच की, बरोबर...
एका प्रथितयश चित्रकाराने आपले
In reply to एका प्रथितयश चित्रकाराने आपले by सुबोध खरे
अगदी पुणेरी शालजोडीतला बरका डॉ. साहेब
In reply to एका प्रथितयश चित्रकाराने आपले by सुबोध खरे
सार्वत्रिक आणि सर्वकालीन होणार्या फंडामेंटल अध्यात्मिक चुकीचं
मी जन्माने पुण्याचा नसलो तरी
In reply to मी जन्माने पुण्याचा नसलो तरी by सुबोध खरे
अरे हो, तुमचे वैद्यकीय शिक्षण
अष्टावक्र संहिता हा सांख्ययोगातला मानदंड ग्रंथ लिहिणार्या
In reply to अष्टावक्र संहिता हा सांख्ययोगातला मानदंड ग्रंथ लिहिणार्या by संजय क्षीरसागर
या प्रतिसादाचा इथे चालू असलेल्या
एक दिवस सकाळ पासून ते रात्री पर्यंत मौन पाळता येईल काय?