मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अन रात झाली शाम्भवी

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अलवार त्याचा अस्त झाला अन रात झाली शाम्भवी चांदवा घेऊन तारे जणू सूर छेडे भैरवी कोण या हृदयात आले ? वाट शोधून ती नवी प्रहर भासे वेगळा जणू अंतःपुरा उगवे रवी गुंजते सुमधुर कर्णी नाद लावे भार्गवी श्वास गेले लोपुनी अन चित्त झाले पाशवी भेट होता लोचनांची आत फुटली पालवी बहरला तो प्रेमवृक्ष दृष्टी सृष्टी हिरवी ======================= सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचने 7310 वाचनखूण प्रतिक्रिया 15

श्वेता२४ Wed, 12/11/2019 - 20:35
कविता छान झालीय. पण तुमच्या नेहमीची मुक्तछंद टाईप नाही. आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/12/2019 - 11:06
खरेच, तुमच्या कडून अशी कविता हा एक सुखद धक्का होता. मस्त मजा आली वाचतना... श्वास गेले लोपुनी अन चित्त झाले पाशवी कवितेमधला भाव लक्षात घेतला तर वरील ओळीतला "पाशवी" हा शब्द खटकला. सहसा ह शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरला जातो लिहित रहा पैजारबुवा,

खिलजि गुरुवार, 12/12/2019 - 14:39
रम्य ते प्रतिसाद आले लागली हळद अंगाला ऐसेच प्रेम राहू दे आम्हावरी प्रतिसाद आपुले, आम्हा अमृताचा प्याला कैसे सुचले देव जाणे लिहीत गेलो मनापासून सांसारिक जीवनात ऐसी कल्पना देई जगण्याचे बहाणे

खिलजि Mon, 12/16/2019 - 14:54
मी महादेवाचा भक्त आहे ... तोच कारक प्रेमाचा , उत्पत्तीचा आणि प्रलयाचा .. त्याच्यापासून उत्पन्न झालेले ते म्हणजेच शाम्भवी.. अर्थात इथे अर्थ , पहिल्याच नजरेत होणाऱ्या प्रेमामुळे जी ब्रम्हानंदी टाळी लागते ती म्हणजे शाम्भवी असा घेण्यात आलेला आहे ... शाम्भवी या शब्दाचा दुसरा अर्थ " शंकराची पत्नी पार्वती " .. म्हंटल तर तो पण इथे लागू होऊ शकतो .. घ्याल तो अर्थ आणि कराल ती कल्पना .. तसाही मी एकदम रुक्ष आहे .. या स्त्रीजमातीपासून कोसो दूर आणि प्रेम तर कधी केलंच नाही त्यामुळे फक्त कल्पना सुचतात .. या अश्या प्रेमळ कल्पना तर फार विरळ आणि जास्त करून भयानकच सुचतात ..