अलवार त्याचा अस्त झाला
अन रात झाली शाम्भवी
चांदवा घेऊन तारे
जणू सूर छेडे भैरवी
कोण या हृदयात आले ?
वाट शोधून ती नवी
प्रहर भासे वेगळा जणू
अंतःपुरा उगवे रवी
गुंजते सुमधुर कर्णी
नाद लावे भार्गवी
श्वास गेले लोपुनी
अन चित्त झाले पाशवी
भेट होता लोचनांची
आत फुटली पालवी
बहरला तो प्रेमवृक्ष
दृष्टी सृष्टी हिरवी
=======================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7311
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
खिलजी भाऊ
क्लासिक !
फारच सुंदर
सुंदर. आवडली!
आवडली..
धन्यवाद आणि अहोभाग्य आमुचे
मस्त !! आणखी थोडे काम केले तर
एकदम छान
मस्त जमलीय कविता. खिलजी
आवडली कविता.
धन्यवाद सर्वाना ,,
चांगलंय.
"शांभवी" म्हणजे काय असतं रे
धन्यवाद
जबरदस्त!!