दुपार
लेखनविषय:
काव्यरस
तिच्या पैंजनाची गाज,
त्यात रेंगाळे दुपार,
विसावल्या सतारीची
जणू छेडियली तार,
तिच्या कपाळी जी बट
त्याला कुंकवाची तीट,
लाल रेशमी लडीची,
तिच्या गालाशी लगट
तिच्या पाठीची पन्हाळ
त्यात घामाचा पाझर,
तिच्या नाजूक कटीला,
शोभे नाजूकसा भार..
तिच्या बाहूंचा मांडव,
लावी मदनाला वेड,
तिची महकती काया
तिचे ओझे अवघड..
सुस्त दुपारच्या वेळी,
ती येते का सामोरी,
मन हलते हलते,
त्याला सांभाळावे कोणी?
- शैलेंद्र.
वाचने
16858
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
सुरेख!!
(तीट तो आणि बट ती असते ना?
तिच्या कपाळी जी बट
"तिला कुंकवाचा तीट" अशी हवीय का ती ओळ?..)
In reply to सुरेख!! by रातराणी
नाही, कुंकवाची तीट योग्य आहे.
In reply to नाही, कुंकवाची तीट योग्य आहे. by यशोधरा
अर्रर्रर्रर्र, परत शाळेत जायला पाहिजे मी (अजून दिवे लावायला ) :)
In reply to नॉस्टॅल्जिक केले ना राव. by जॉनविक्क
दुपारच्या झोपेची आठवण झाली का?
फारच आवडली
पैजारबुवा,
सुरेख लिहिलंय!
आवडेश
सगळ्यांचे आभार
आहा...सुरेख.
खुपच छान!
सुदंर.
सुंदर
वाहवा!!
मस्त! बऱ्याच दिवसांनी चांगली कविता वाचायला मिळाली.
Sandy
उत्कट आणि उत्कृष्ट
उत्तम वर्णन
लाडिक आणि लडिवाळ :)
वाह मस्तंच. सुंदर टिझर.
भारी!! :-)
एकदम सुरेख..
खुप दिवसानी इतकी सुंदर कविता वाचली आहे मी.
वा
सुरेख.
सुरेख!!