मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुपार

शैलेन्द्र · · जे न देखे रवी...
काव्यरस
तिच्या पैंजनाची गाज, त्यात रेंगाळे दुपार, विसावल्या सतारीची जणू छेडियली तार, तिच्या कपाळी जी बट त्याला कुंकवाची तीट, लाल रेशमी लडीची, तिच्या गालाशी लगट तिच्या पाठीची पन्हाळ त्यात घामाचा पाझर, तिच्या नाजूक कटीला, शोभे नाजूकसा भार.. तिच्या बाहूंचा मांडव, लावी मदनाला वेड, तिची महकती काया तिचे ओझे अवघड.. सुस्त दुपारच्या वेळी, ती येते का सामोरी, मन हलते हलते, त्याला सांभाळावे कोणी? - शैलेंद्र.

वाचने 16858 वाचनखूण प्रतिक्रिया 23

रातराणी 18/09/2019 - 10:16
सुरेख!! (तीट तो आणि बट ती असते ना? तिच्या कपाळी जी बट "तिला कुंकवाचा तीट" अशी हवीय का ती ओळ?..)

ज्ञानोबाचे पैजार 18/09/2019 - 10:34
फारच आवडली पैजारबुवा,

जालिम लोशन 18/09/2019 - 23:04
सुदंर.

जालिम लोशन 18/09/2019 - 23:04
सुंदर

चांदणे संदीप 19/09/2019 - 04:21
मस्त! बऱ्याच दिवसांनी चांगली कविता वाचायला मिळाली. Sandy

सस्नेह 21/09/2019 - 15:40
लाडिक आणि लडिवाळ :)

गणेशा 26/09/2019 - 15:00
एकदम सुरेख.. खुप दिवसानी इतकी सुंदर कविता वाचली आहे मी. वा