जावे फेरोंच्या देशा - भाग ३ : कैरो
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४
१८ सप्टेंबर २०१८
बरोब्बर १ वर्ष १ महिना वाट पाहून झाल्यावर अखेरीस आम्ही फेरोंच्या देशात येऊन पोहोचलो. कैरो एअरपोर्ट वर बघण्यासारखं असं फार काही नाही, त्यामुळे एअरपोर्ट बाहेर पडायला जास्त वेळ लागत नाही. एअरपोर्ट वरून हॉटेलला जाण्यासाठी टॅक्सी घेतली. कारण कैरो एअरपोर्ट वरून शहरात जाण्याचा दुसरा सोयीचा पर्याय सध्यातरी नाहीये. संबंध कैरो शहरात मेट्रोच जाळं पसरलं असूनही एरपोर्टच्या भागात मात्र अजून तिचे रूळ पोहोचले नाहीयेत. पर्यटन हा मुख्य व्यवसाय असलेल्या या देशाच्या राजधानीत टॅक्सी व्यतिरिक्त कुठला सोपा पर्याय उपलब्ध नाही हि गोष्ट मनाला थोडी खटकली. कैरो एअरपोर्टवर टॅक्सीसाठी अव्वाच्यासव्वा भाव सांगितले जातात. तुम्हाला current rate ची थोडी कल्पना असेल आणि घासाघीस करू शकत असाल तर योग्य दर मिळवता येतो, नाहीतर खिशाला भगदाड पडलं म्हणून समजा. कैरोमध्ये प्रायव्हेट टॅक्सी ला पर्याय आहे उबर. पण कैरो एअरपोर्टवर मोफत वायफाय ची सुविधा नाही, आणि तोवर आपल्याकडे लोकल सिम कार्ड वगैरे पण नसतं, त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीला पर्याय नाहीच.
आमचं हॉटेल शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, तहरीर चौकात होतं. तोच तहरीर चौक जिथे असंख्य मोर्चे, प्रदर्शने झालेली, आणि आजही होत असतात. सकाळी ट्रॅफिक अजिबात लागलं नाही आणि २० मिनिटात टॅक्सीवाल्याने हॉटेलच्या दारात सोडलं. आम्ही ठरवल्या प्रमाणे जे पैसे दिले ते त्याने घेतले आणि म्हणाला, "हे तर गाडी चे पैसे झाले. मला टीप?" आम्ही परत नम्र नकार चिकटवला.
इजिप्तमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा टीपसाठी विचारलं जातं. पण तुम्हाला त्यांची सर्विस असामान्य नसेल वाटली तर तुम्ही नकार देऊ शकता. फार काही फरक नाही पडत. पण जिथे काम आवडलं असेल तिथे टीप नक्की द्यावी.
"My Hotel Cairo" हे आमचं हॉटेल एका जुन्या इंग्रजांच्या काळातील इमारतीमध्ये आहे, इजिप्शिअन म्युझिअमच्या बरोब्बर समोर. हॉटेल वजा हॉस्टेल असं त्याचं स्वरूप. सकाळचे ६:३० वाजले होते. थोडा वेळ स्वागतकक्षात वाट पाहिली. ७ वाजता त्यांची रिसेप्शनिस्ट आली. तिला इंग्लिशचा गंध नाही. तिने मॅनेजर महमूदसोबत बोलून दुसऱ्या मजल्यावरची एक बरीशी रूम उघडून दिली. फ्रेश होऊन थोडा आराम केला तोवर महमूद पोहोचला होताच. योगायोगाने संजयसुद्धा याच हॉटेलला थांबला असल्याने महमूदची आणि त्याची ओळख होतीच. थोडी विचारपूस झाल्यावर त्याने कोरा चहा आणून दिला. आणि मला कधी नव्हे तो कोरा चहा प्रचंड आवडला.
महमूद: किती दिवस आहात तुम्ही मग इजिप्त मध्ये?
नवरा: १४ दिवस
महमूद: आणि काय काय बघायचं ठरवलं आहे?
मी: आज तर समोरचं म्युझियम बघू आणि वेळ मिळाला तर कैरोची कॉप्टिक बाजू बघू. बाकी गिझा, अॅलेक्झांड्रिया आणि बहारिया मरुद्यानाला पण जायचं आहे.
महमूद: मी करून देतो सगळी सोय. गिझा आणि अॅलेक्स साठी प्रायव्हेट टूर असेल बहारियाला मात्र तुम्हाला तिथे पोहोचेपर्यंत गाडी कोणासोबत तरी शेअर करावी लागेल.
नवरा: हो चालेल ना. काहीच हरकत नाही. किती अंदाजे खर्च येईल?
महमूद: टीप टीप.. टॅप टॅप (कॅल्क्युलेटर वर कसला हिशोब करायला लागला)
मी: आणि हो नुसतं गिझा नाही सक्कारा आणि दाहशुर पण करायचं आहे.
महमूद: अरे हो का.. बरं ### एवढे होतील सगळ्याचे.
मी: नाही जास्त होत आहेत. थोडे कमी कर.
हो नाही करत थोडी घासाघीस करत एका रकमेला आम्ही तयार झालो. कैरो मधील दिवसांचा प्लॅन परत बनवला गेला.
महमूद: तुम्ही आज कैरो बघा जेवढं शक्य असेल तेवढं. उद्या सकाळी ८.३० वाजता गाडी येईल गिझा-सक्कारा-दाहशुर साठी. तयार राहा. आज मला थोडं लवकर जायचं आहे उद्याच भेट होईल बहुदा आपली. आम्ही: ठीक आहे. भेटू उद्या मग.
गूगल मॅप वर जवळचं वोडाफोन स्टोअर शोधलं. ते तलात हार्ब चौकात होत. जवळ असल्याने चालतच निघालो.
तलात हार्ब चौक हा तहरीर चौकाच्या जवळचा दुसरा मोठा चौक. ६ रस्ते एकत्र येणाऱ्या ह्या चौकात जुन्या मोठ्या इमारती बघायला मिळतात. काही इमारतींवरचे नक्षीकाम इजिप्तवर इंग्रजांचे राज्य होते याची आठवण करून देते तर काही त्याही मागे जाऊन रोमन सत्तेची जाणीव करून देते. या सगळ्या इमारतींमधून विविध बँकांची कार्यालये आहेत. या चौकाला तलात हार्ब नाव देण्यामागचं कारण पण हेच. तलात हार्ब हे इजिप्ती अर्थशात्रज्ञ होते ज्यांनी नंतर "बंक मिस्र" अर्थात 'बँक ऑफ इजिप्त' या पहिल्या इजिप्ती बँकेची स्थापना केली. तलात हार्ब चौकात मध्यभागी त्यांचा पुतळा उभा आहे.
वोडाफोन मध्ये नवीन सिमकार्ड घेतलं आणि पोटोबा करायला "कझाझ" नावाच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो. महमूदच्या मते तिथले सँडविच फार चवदार असतात. एक फलाफल सॅन्डविच, एक फ़ुल (म्हणजे उकडलेल्या राजम्याला वाटून त्यात मीठ मिरची भुरभुरलेलं) सॅन्डविच आणि दोन श्वारमा घेतले. पहिल्या घासातच कझाझ वरचा विश्वास उडाला. मी श्वारमा बऱ्याच ठिकाणी खाल्ला आहे पण पुण्यातल्या 'मारकेश'पेक्षा सुद्धा वाईट कझाझ मध्ये होता. (नंतर एके दिवशी जवळच्याच फेलफेला नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो तिथली चव फारचं छान होती) कझाझमध्ये कसंबसं जेवण उरकून आम्ही इजिप्शिअन म्युझिअम पाहायला निघालो.
संबंध इजिप्तमधील उत्खननात मिळालेल्या गोष्टी इथे हारीने रचून ठेवल्या आहेत. जुनी राजवट, मध्य राजवट आणि नवी राजवट अश्या भागांत साहित्य विभागून ठेवलेलं दिसतं. पण त्याच बरोबर असंख्य मस्तबा, शवपेट्या, दागिने, भांडी, मुखवटे यांची स्वतंत्र दालनेच इथे आहेत. इजिप्तच्या अवाढव्य बांधकामांची झलक इथे बघायला मिळते. मुख्य चौकात ठेवलेले उंचच उंच पुतळे आपलं स्वागत करतात.
पण इथले २ प्रमुख आकर्षण म्हणजे, रॉयल ममी रूम आणि तुत-अंखं-अमूनच्या थडग्यात सापडलेल्या सोन्याच्या गोष्टी.
रॅमसिस-२ च्या ममीसोबत अजून अंदाजे २५-३० ममी २ दालनात विभागून ठेवल्या आहेत. काचेच्या पेटीत बंद असलेले हेच ते फेरो होते ज्यांनी मिस्रचा सुवर्णकाल गाजवला. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा तो "सुवर्ण"काळ होता. सुदान, लिबिया मधून सोन आणून बनवलेल्या चीजवस्तू थडग्यात ठेवायला वापरणारे फेरो वेडेच म्हणायचे. याची खात्री पटते तूतच्या थडग्यातील वस्तू पाहताना. सोन्याचे दागिने, मुकूट, चपला, खंजीर, पलंग, खुर्ची, भांडी, शवपेटी, मुखवटा वगैरे तर झालंच पण हे सगळं त्याच्या ममी सोबत ज्या खोलीत ठेवलं होत ती सोन्याची, ती खोली ज्या मोठयाल्या बॉक्स मध्ये ठेवली होती तो बॉक्स सोन्याचा, त्याच्या बाहेरील दालनाची तावदानेपण सोन्याची.
लुटारुंच्या नजरेतून निसटलेलं हे सोन्याचं भांडार कार्टर ने १९२२ साली उघडलं आणि सगळ्या जगाचे डोळे दिपले. याबद्दल विस्ताराने नंतर कधीतरी, पण कार्टरच्या मेहनतीमुळे हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची ओळख पुन्हा एकदा नवीन नजरेने जगापुढे आली.
फोटो काढायचे तिकिट घेतले नसल्याने 'चोरी-छिपे' मारलेले हे काही क्लिक्स.
मनोमन तृप्त होऊन आम्ही दोघे अंदाजे ३ तासांनी बाहेर पडलो. सकाळी येतांना रिकामा दिसलेला तहरीर चौकातील रस्ता आता दुथडी भरून वाहत होता. प्रचंड ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न, असंख्य पादचारी. भारतापेक्षा काही वेगळ दृश्य नव्हतं हे. पुढे वेळोवेळी मला भारत आणि इजिप्त मध्ये बऱ्याच ठिकाणी साम्य आढळलं त्यातील हा पण एक समान धागा.
म्युसिअम मधून बाहेर पडल्यावर एक स्थानिक माणूस येऊन आमच्याशी गप्पा मारू लागला. कुठून आलात, किती दिवसाची ट्रिप वगैरे. सुरवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तो मुख्य मुद्दयावर आला. इजिप्ती गिफ्ट्स आणि सुवेनिअरच्या दुकानासाठी तो काम करत होता. मलाही अशा दुकानाला एकदा भेट द्यायची होतीच. 'घ्यायचं काहीही नाही नुसतं बघ' अशी नवऱ्याने अट मला घातली आणि त्या बाबाच्या मागे आम्ही दुकानात गेलो. असंख्य अत्तरे, छोटे मोठे पिरॅमिड, दगडी मूर्ती, किचेन, फ्रिज मॅग्नेट वगैरे तर होतेच पण सोबत तुतच्या सोन्याच्या मुखवट्याच्या प्रतिमा, छोट्या शवपेट्या असं काहीही सापडत होतं. थोडक्यात समोरच्या म्युसिअम मधील सगळ्या गोष्टींच्या छोट्या कॉपीज. यामध्ये आम्हाला रुची नाही हे लक्षात आल्यावर आमची वरात वरच्या मजल्यावर वळवण्यात आली.
थंड AC आणि बसायला छान सोफा, मासा गळाला लावायचा पूर्ण बंदोबस्त केला होता तिथे. इजिप्तचे प्रसिद्ध पेय थंडगार करकाडे आमच्या समोर आणून ठेवलं गेलं आणि पपायरस च्या गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पपायरस हा एका पाणवनस्पती पासून बनवला जाणारा कागद पूर्वी राजेशाही पत्र वगैरे पाठवायला वापरला जात असे. आता त्यावर चित्रे काढून सुवेनिअर म्हणून विकतात. खरंच अप्रतिम कलाकारी केली होती त्यावर. वेगवेगळे रंग वापरून फेरोंचे प्रसंग दर्शवले होते. कधी फक्त फेरो देवाला पूजताना तर कधी फेरो आणि राणी. विविध आकारात सुद्धा बनवलेले. अगदी लहान पोस्टकार्ड च्या आकारापासून ते भल्या मोठ्या गालिचाच्या आकारात पण. काही सकाळी वेगळं चित्र दाखवणारे आणि रात्री वेगळं, रेडियम वापरून बनवलेलं. काहींवर फार बारीक काम केलेलं तर काही उगीच रेखाटलेलं. या पपायरसनी मात्र मला भुरळ पाडली. प्रचंड घासाघीस करून, सांगितलेल्या किमतीच्या निम्म्याहून कमी किमतीत डील करून, नवऱ्याला मनवून एकदाची मी ते पपायरस घेती झाले. आम्ही दुकानातून बाहेर पडेस्तोवर आधी भेटलेल्या माणसाने अजून एक परदेशी मासा गळाला लावून दुकानात सोडला.
घेतलेल्या पैकी एक पपायरस
आता पुढे जायचं होत कॉप्टिक कैरो ला. पण नवऱ्याची तब्बेत भारतातून निघतांनाच थोडी नरम गरम होती, आता मात्र त्याला ताप चढू लागला होता. त्यामुळे पुढला प्लॅन रद्द करून सरळ हॉटेलवर परत आलो. ३-४ तास आराम केल्यावर काहीतरी खाऊ म्हणून परत तहरीर चौकात आलो. एका हाटेलात (हो हाटेलच हॉटेल नाही) कोशरी आणि पास्ता मागवला. दोन्ही मध्ये एकच टोमॅटो रस्सा टाकून दिला होता त्यामुळे चव सारखीच लागत होती. आंबट आणि थोडी खारट अगदी साधारण. रूमवर परत आल्यावर नवऱ्याने औषध खाऊन ताणून दिली आणि मी दुसऱ्या दिवशीच्या प्लॅनबद्दल थोडं वाचू लागले. रात्री ११ च्या सुमारास नवरा तापाने पार फणफणला होता. ओल्या पट्ट्या कपाळावर ठेवून २-२ ब्लॅंकेट पांघरून त्याला कसाबसा झोपवत होते. पहाटे ३ च्या सुमारास ताप उतरला आणि मग कुठे माझा डोळा लागला.
क्रमशः
आता पुढे जायचं होत कॉप्टिक कैरो ला. पण नवऱ्याची तब्बेत भारतातून निघतांनाच थोडी नरम गरम होती, आता मात्र त्याला ताप चढू लागला होता. त्यामुळे पुढला प्लॅन रद्द करून सरळ हॉटेलवर परत आलो. ३-४ तास आराम केल्यावर काहीतरी खाऊ म्हणून परत तहरीर चौकात आलो. एका हाटेलात (हो हाटेलच हॉटेल नाही) कोशरी आणि पास्ता मागवला. दोन्ही मध्ये एकच टोमॅटो रस्सा टाकून दिला होता त्यामुळे चव सारखीच लागत होती. आंबट आणि थोडी खारट अगदी साधारण. रूमवर परत आल्यावर नवऱ्याने औषध खाऊन ताणून दिली आणि मी दुसऱ्या दिवशीच्या प्लॅनबद्दल थोडं वाचू लागले. रात्री ११ च्या सुमारास नवरा तापाने पार फणफणला होता. ओल्या पट्ट्या कपाळावर ठेवून २-२ ब्लॅंकेट पांघरून त्याला कसाबसा झोपवत होते. पहाटे ३ च्या सुमारास ताप उतरला आणि मग कुठे माझा डोळा लागला.
क्रमशः
वाचने
18419
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वा!
In reply to वा! by श्वेता२४
धन्यवाद श्वेता२४!
पपायरसचा फोटो दिसत नाही. एकूण
In reply to पपायरसचा फोटो दिसत नाही. एकूण by यशोधरा
फोटो सुधारला आता यशो.
In reply to फोटो सुधारला आता यशो. by कोमल
पपायरसवरील चित्र काय सुरेख
In reply to पपायरसवरील चित्र काय सुरेख by यशोधरा
घरासाठी हे अजुन एक घेतलेलं,
मस्तं सुरू झाली आहे सफर.
In reply to मस्तं सुरू झाली आहे सफर. by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद एक्काकाका!
In reply to धन्यवाद एक्काकाका! by कोमल
आता दिसत आहेत सर्व चित्रे.
कोशरी हा खाद्यपदार्थ मलाही अजिबात आवडला नव्हता...
In reply to कोशरी हा खाद्यपदार्थ मलाही अजिबात आवडला नव्हता... by टर्मीनेटर
हो ना!
सचित्र वर्णन आवडले, आता
मस्त
हा भाग पण आवडला. छान लिहिते
वर्णन, प्रचि सारे छान जमले ...
फलाफेल सॅन्डविच
In reply to फलाफेल सॅन्डविच by महासंग्राम
@ महासंग्राम - समजू शकतो....
टबुली
धन्यवाद अनिंद्य, जालिम लोशन,
Expense
In reply to Expense by adya82
खरं तर खर्च किती आणि कुठे
थोडे स्पष्ट बोलतो ताई राग
In reply to थोडे स्पष्ट बोलतो ताई राग by उपेक्षित
थोडा गैरसमज झालेला दिसतोय.
ज्ये बात...
मी वाचतोय. परदेशी राहाणे खाणे
In reply to मी वाचतोय. परदेशी राहाणे खाणे by कंजूस
धन्यवाद
केदारनाथ आणि बद्रीनाथ