Skip to main content

गुड्डे बिस्कीट मोदक by Namrata's CookBook : १७

लेखक Namokar यांनी मंगळवार, 27/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १० मिनिटे लागणारे जिन्नस: गुड्डे बिस्किट दुध रंगीत बॉल्स क्रमवार पाककृती: १. बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या २. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या ३. आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या ४. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या ५. आता त्यामध्ये रंगीत बॉल्स घालून एकत्र करुन घ्या ६. आता हे मिश्रण मोदक साचामध्ये घालून मोदक तयार करुन घ्या गुड्डे बिस्किट मोदक तयार आहेत अधिक टिपा: आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही दुसरे बिस्कीट घेऊ शकता रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/PVS_xcoNoPc

वाचने 16025
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

पार्ले किंवा मारीचे मोदक कशे लागतील ?? विचार करतोय ,, मीपण करू शकतो असे वाटतंय ,, पण खाऊ शकतो कि नाही त्याची कल्पना नाही .. किंव आहेत का मिपाकर ,, जे मी बनवलेले ,, मारीचे मोदक खातील ?

In reply to by खिलजि

खिलजी काका आहो तुम्ही मारीच काय न्युट्रीचॉइस बिस्कीटाचे किंवा उपासाच्या बिस्कीटांचे मोदक बनवलेत तरी खाईन मी . फक्त त्या पेडीग्रीच्या बिस्कीटांचे मोदक नका बनवू बुवा, किंवा बनवलेत तरी बिस्कीटाचे नाव वेगळेच सांगा. हाकानाका रच्याकने :- रंगीत गोळ्या म्हणजे बडिशोपेच्या गोळ्या का? कारण रंगीत गोळ्या म्हटले की डोळ्यासमोर काहीतरी वेगळेच उभे रहाते. हा बाप्पाचा नेवैद्य असल्याने ते इकडे त्या गोळ्या वापरुन चालणार नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बडिशोपेच्या गोळ्या चलतील , ईथे मी केक / आईस्क्रीम वर टाकतात ते "रेनबो स्प्रिंकल बॉल्स" वापरले आहेत :)

बाप्पाला बिस्किटे खाऊ घालायची म्हणता? :) असेच खव्याचे मोदक करता येतील, त्यात गुलकंद वगैरे टाकता येईल. भारी, ह्या दोन तारखेला करते. मूळ आयडियेच्या कल्पनेबद्दल धन्यवाद!

वेगळीच कल्पना. पदार्थ चांगला लागेल. करुन पाहायला हवा.

In reply to by खिलजि

मीपण करू शकतो असे वाटतंय ,, पण खाऊ शकतो कि नाही त्याची कल्पना नाही ..
असं म्हटल्यावर कोण बोलावणार, खाऊ शकतो की नाही कन्फर्म बोला ;)

अरे दुसऱ्यानं केलेलं खायला काय रे .. पण मी स्वतः केलेलं खाऊ शकतो कि नाही हे मला माहित नाही , म्हणून असं टंकल होत वरती

In reply to by खिलजि

दुसऱ्यानं केलेलं खाउ शकता का ते कन्फर्म बोला नंतर तक्रार उत्तरदायीत्वांस नकार लागू.

हो नक्कीच ,, जर दुसऱ्यानं कुणी आयतं बनवून दिल तर खायला काय हरकत आहे .. नक्कीच खाईन ..फक्त भूक जर जास्तच आहे याची जाणकारांनी नोंद घ्यावी ..