माकडांच्या पुढे नाचली माणसे!
काव्यरस
माकडांच्या पुढे नाचली माणसे!
पाहता पाहता काय झाले असे?
माकडांच्या पुढे नाचली माणसे!
या हवेला कुणाची हवा लागली?
चित्त कामामध्ये ना तिचे फारसे
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे
मेघही वागती की पगारी जसे
नित्य येणे तिचे वादळासारखे
मग लपावे हृदय हे कुठे नी कसे?
व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती
तू अभय बोल तू, तू हवे तू तसे
गंगाधर मुटे 'अभय'
==०==०==०= =०==०==०==
वाचने
13730
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
आशय कळला नाही.
In reply to बाल कविता आहे का? by जालिम लोशन
या वर्षीच्या पावसाळा ऋतू संबंधी आहे.
फनीच्या वादळी वाऱ्यानं मेघांना दूर नेऊन ठेवले असा आशय.
In reply to या वर्षीच्या पावसाळा ऋतू by आंबट चिंच
धन्यवाद
In reply to या वर्षीच्या पावसाळा ऋतू by आंबट चिंच
Taste Non fictionची असल्यामुळे, अशा साध्या छान कविताही कळत नाहीत.
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे
मेघही वागती की पगारी जसे
हे आवडलंआणखी लिहा.
In reply to मस्त कविता by प्रसाद_१९८२
आणखी?
पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..
In reply to अरे मुटे साहेब ! by धर्मराजमुटके
धन्यवाद.
मी नवीन काही लिहिले इथे नक्कीच येत असतो.
या हवेला कुणाची हवा लागली?
चित्त कामामध्ये ना तिचे फारसे >> होय असे होतेय खरे!!
:)
In reply to या हवेला कुणाची हवा लागली? by विनिता००२
धन्यवाद
अनाकलनीय. जमल्यास सोपं करून सांगावं.
In reply to अनाकलनीय. जमल्यास सोपं करून by इरामयी
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे.
कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.
तू अभय बोल तू, तू हवे तू तसे.
बाल कविता आहे का?