Skip to main content

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 24/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==
लेखनविषय:

वाचने 13730
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे हे आवडलं

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.

तू अभय बोल तू, तू हवे तू तसे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद