मूळ बातमी
Britain now has the most 'desi' Cabinet in its history
ऑक्टोबर २०१९ मध्ये स्थापित होणार्या बोरीस जॉन्सन या ब्रिटनच्या आगामी पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात अनेक भारतीय वंशाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. त्यात महत्त्वाची पदे अशी...
१. प्रीती पटेल : गृहमंत्री (home secretary): ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच, एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या पदावर, भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेमणूक होत आहे. पंतप्रधानांनंतर, गृहमंत्री आणि विदेशमंत्री ही दुसर्या क्रमांकाची व समान महत्त्वाची पदे समजली जातात.
२. अलोक शर्मा : secretary of state for international development.
३. रीशी सूनक : chief secretary to the treasury : हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
***************
अवांतर :
तुर्कस्थानचा बदला
एक शतकापूर्वी अली केमाल बे (Ali Kemal Bey) नावाचा एक पत्रकार आणि राजकारणी तुर्कस्थानचा गृहमंत्री होता. त्याने तुर्कस्थानामध्ये Anglophile Society ची स्थापना केली. तुर्कस्थान "ब्रिटनचे संरक्षित राष्ट्र (British protectorate)" व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. त्याऐवजी, अतातुर्कने तुर्कस्थानाला ब्रिटन, फ्रान्स, इटली, ग्रीस आणि आर्मेनियाच्या जोखडातून स्वतंत्र केला आणि अली केमालचे स्वप्न पुरे झाले नाही. जनरल नुरेद्दीनने अली केमालला बंदी केले व त्याचा वध करून त्याचे प्रेत झाडाला टांगले.
या अली केमालचा मुलगा ओस्मान विल्फ्रेड केमाल याने ओळख लपविण्यासाठी विल्फ्रेड जॉन्सन असे नाव बदलले. जॉन्सन हे त्याच्या आईच्या आईचे आडनाव होते. विल्फ्रेड जॉन्सनचा मुलगा स्टॅन्ली जॉन्सन आणि त्याचा मुलगा आहे बोरीस जॉन्सन... हाच बोरीस जॉन्सन आता ब्रिटनचा नवनिर्वाचित पंतप्रधान आहे.
तुर्कस्थानच्या ऑटोमन घराण्याच्या (Ottoman Turks) काळात तुर्कांनी युरोप जिंकण्याचे खूप प्रयत्न केले होते. त्यांनी हंगेरी व ट्रन्सिल्व्हानिया हे प्रदेश जिंकलेही होते. मात्र, सन १६९९ च्या कार्लोविट्झ शस्त्रसंधीनंतर तुर्कांचे युरोप जिंकण्याचे स्वप्न भंगले.
मात्र, आता एका तुर्कीवंशियाची (बोरीस जॉन्सन) ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे... त्याच्या पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर, "शेक्स्पियरच्या ऑथेल्लोमधील 'तुर्कांचा बदला' पुरा होईल", असे गमतीने म्हटले जात आहे. :)
***************
अतीआवांतर
भारताचा बदला
बोरीस जॉन्सन यांच्यानंतर प्रीती पटेल पंतप्रधान होतील म्हटले जाते (सद्य पंतप्रधान थेरेसा मे ह्यासुद्धा पंतप्रधान होण्याअगोदर गृहमंत्री होत्या.)... हे व्यवहारात खरे झाले तर, एक भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनवर राज्य करेल आणि "भारताने 'ब्रिटिश राज'चा बदला घेतला" असे म्हटले जाईल ! ;) :)
वाचने
23880
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवांतर चा इतिहास भारीच आहे कि
हा हा हा
बदला घेतल्यास
हा विचार अयोग्य किंवा त्या मागची मानसिकता अयोग्य आहे
त्याच्या पंतप्रधानपदाच्या
In reply to हा विचार अयोग्य किंवा त्या मागची मानसिकता अयोग्य आहे by Rajesh188
त्याच्या पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर, "शेक्स्पियरच्या ऑथेल्लोमधील 'तुर्कांचा बदला' पुरा होईल", असे गमतीने म्हटले जात आहे. :)तुम्ही प्रतिसाद लिहिण्यापूर्वी, लेखातल्या वर उधृत केलेल्या वाक्यातील (इथे ठळक केलेले) काही शब्द आणि त्यापुढील स्मायलीदर्शक चिन्हे पाहिलेली नाही असे दिसत आहे ! ;) :)बोरीस जॉन्सन
आता अमेरीकेच्या सावलीने
In reply to बोरीस जॉन्सन by धर्मराजमुटके
Five eyes
In reply to आता अमेरीकेच्या सावलीने by सुबोध खरे
अमेरिका नाही त्यात ..
In reply to Five eyes by जालिम लोशन
USA आणी common wealth countries
In reply to अमेरिका नाही त्यात .. by हेमंतकुमार
म्हंजे आता केबाबच्या(कबाब)
इन्टरेस्टिंग माहिती
जसे सोनिया गांधी पंत प्रधान
ब्रिटनमध्ये कॉमनवेल्थ
In reply to जसे सोनिया गांधी पंत प्रधान by हस्तर
खालील दुव्यावर संपूर्ण माहिती
In reply to ब्रिटनमध्ये कॉमनवेल्थ by मराठी कथालेखक
भारतीय वंशाचे लोक जगभर आहेत.
भारत हा २१ व्या शतकाच्या
In reply to भारतीय वंशाचे लोक जगभर आहेत. by विजुभाऊ
आणि मिसळपाव वर कंपूबाजी
कुठेत कंपूबाज?
भारताचा बदला!
ब्रिटनमध्ये भारतिय वंशाचे लोक
In reply to भारताचा बदला! by श्रीनिवास टिळक
यादी चांगली आहे
In reply to ब्रिटनमध्ये भारतिय वंशाचे लोक by डॉ सुहास म्हात्रे
मॉरिशसच्या लोकसंखेत २/३ लोक
In reply to यादी चांगली आहे by गामा पैलवान
खोलात जायची गरज नाही
म्हणूनच काहीतरी बोलावेसे वाटते
In reply to खोलात जायची गरज नाही by Rajesh188
=)) बरोबर आहे.
In reply to म्हणूनच काहीतरी बोलावेसे वाटते by जॉनविक्क
एक्का काका
बाकी सगळं जाऊ द्या
In reply to एक्का काका by नाखु
जिथे मोदींच्या मंत्रीमंडळात
In reply to एक्का काका by नाखु
जिथे मोदींच्या मंत्रीमंडळात कोण असेल त्याचा मला फायदा काय? अशे उच्च विचार मिळाले आहेत तिथे सातासमुद्रापार असलेल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी आमच्या पिंपरी-चिंचवड भागातील पाणि दिवसाआड येते ते सुरळीत होईल का??+१००या घटना भारतीयांच्या दृष्टीने
In reply to एक्का काका by नाखु
एक भारतीय वंशाची व्यक्ती
लेखात म्हटल्याप्रमाणे "बदला
In reply to एक भारतीय वंशाची व्यक्ती by मराठी_माणूस
ते लक्षात आले होते. पण गमतीत
In reply to लेखात म्हटल्याप्रमाणे "बदला by डॉ सुहास म्हात्रे
छान, माहितीपूर्ण लेख.
सिंगापूरच्या सद्य
In reply to छान, माहितीपूर्ण लेख. by इरामयी