मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता पिंपळपान

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. ही कविता पिंपळपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लिहिता आले कैसे मज लेखणिस भान? ही कविता पिंपळपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान! घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान! ===×====×====×===×=== अतृप्त... https://scontent-sjc3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/65891576_2302597183159888_6148540301800636416_o.jpg?_nc_cat=108&efg=eyJpIjoidCJ9&_nc_oc=AQnWXRF_HhOj9XrJIBZf9b5pGvQkV5rnIpTXNvU_5h34rvIyasK7PwLlT3CN7jfuIPs&_nc_ht=scontent-sjc3-1.xx&oh=9c6292a5e8789277a8d3256b22183584&oe=5DB31DB1

वाचने 14970 वाचनखूण प्रतिक्रिया 32

यशोधरा Mon, 07/01/2019 - 15:26
घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान!
वा! वा!

''घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान!'' केवळ सुरेख. लेखनाचा पोत सुधारतोय. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

नाखु Tue, 07/02/2019 - 08:38
भावविभोर कविता,आवडली आहे. लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by अत्रुप्त आत्मा

पाषाणभेद Wed, 07/03/2019 - 03:40
पावसाळ्यात काम नसल्याने कवीला व्यावहारीक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे - दुष्ट दुम्न. :-) बाकी प्रा. डॉ. बोलले ते बरोबरच आहे. साहित्य संमेलनात वाचन करण्याच्या पातळीची कविता आहे. पुरस्कारप्राप्त वगैरे. आणि पिंपळपानामुळे आध्यात्मिक बैठकदेखील मिळालेली आहे.

In reply to by नाखु

>>>लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या. सुचू द्या भो त्यांना दुसरं असंचं काही चांगलं. ही पहिली कविता असावी ज्यात तांब्या पीतळ आणि 'विधी'विषयाचा उल्लेख नाही. ;) -दिलीप बिरुटे

लीलाधर Tue, 07/02/2019 - 10:59
विडंबन ही कविता पिंपळपान याचे विडंबन करण्याचा प्रयत्न कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले भोला पान ही कविता पानच पान ! चुना चुना आग झाली रेष रेषा बोलू लागली न खाता आले कैसे मज लेखणीस भान ही कविता पानच पान! हे असेच असते सारे न खाता हलते सारे पाचोळा नसता कोठे गर्द लालच होते पान ही कविता पानच पान! टपरीच्या अवती भवती खवय्यांची अतूट गर्दी तो मिटून देता पाने करीतो मूकगान ही कविता पानच पान! म्हटले या पानवाल्याला पान हळवे नकोच सोडू भिजवूनी दे खवय्याला मग लाभे दानच दान ही कविता भोला पान! ===×====×====×===×=== संत्रुप्त

महासंग्राम Tue, 07/02/2019 - 12:58
कविता सुचत नाही पान ही रितेच काही लावू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. हे १२०-३०० फुलचंदपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लावता आले कैसे या चुन्यास भान? हे १२०-३०० फुलचंदपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे किवाम नसता का कोठे गर्द जागे होते रान हे १२०-३०० फुलचंदपान! ठेल्याच्या अवती भवती पिचकाऱ्यांच्या थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे गिर्हाईक करी मूकगान हे १२०-३०० फुलचंदपान! म्हटले या काथ्याला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब पानाला मग लाभे तारेचे दान हे १२०-३०० फुलचंदपान! ===×====×====×===×=== अतृप्त..पानवाला

राघव Tue, 07/02/2019 - 20:00
हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान!
आवडले. :-)

सस्नेह गुरुवार, 07/04/2019 - 17:25
पावसाबरोबरच गुर्जींचीसुद्धा दमदार हजेरी ! बंधुद्वयांची जुगलबंदी फारा दिवसांनी पहायला मिळाली. वेल्कम रे लीलाधरा

चामुंडराय Fri, 07/05/2019 - 08:17
सुरेख, छान आहे कविता... आवडली परंतु आत्मु बुवांची कविता आणि विधी नाही, कुंथणे नाही, तांब्या नाही ... छे चुकल्या चुकल्या सारखे वाटतेय. थोडी कसर भरून काढावी म्हंतो पिंपळाच्या पानावर तांब्या अजून ओततो ग ... डब्बा टाकताना मिरची अजून सलते ग !

अभ्या.. Fri, 07/05/2019 - 09:22
गुर्जी नेहमीच छान लिहितात, पिंपळपानापेक्षा नागवेलीत अधिक रंगतात हे सत्य.