कविता सुचत नाही
मन ही रितेच काही
लिहू काय? म्हणता म्हणता
सापडले ओले पान.
ही कविता पिंपळपान!
थेंब थेंबा जाग आली
रेष रेषा बोलू लागली
ना लिहिता आले कैसे
मज लेखणिस भान?
ही कविता पिंपळपान!
हे असेच असते सारे
ना सुचता हलते वारे
पाचोळा नसता कोठे
गर्द जागे होते रान
ही कविता पिंपळपान!
घरट्याच्या अवती भवती
पाऊस थेंबांची गर्दी
मी मिटून घेता दारे
पाऊस करी मूकगान
ही कविता पिंपळपान!
म्हटले या पावसाला
मन हळवे नकोच सोडू
भिजवूनि जा चिंब मनाला
मग लाभे पाऊस-दान
ही कविता पिंपळपान!
===×====×====×===×===
अतृप्त...


काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
14972
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
घरट्याच्या अवती भवती
हळवे झालात गुरुजी आज.
गवि यांचेशी सहमत
In reply to हळवे झालात गुरुजी आज. by गवि
आगोबाचा - पांडू प्रतिसाद!
In reply to गवि यांचेशी सहमत by प्रचेतस
छान....!
@केवळ सुरेख. लेखनाचा पोत
In reply to छान....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1
सुंदर कविता ! लिहीत रहा.
प्रापंचिक बुवांच्या
@लेकाने कवीला नैसर्गिक
In reply to प्रापंचिक बुवांच्या by नाखु
पावसाळ्यात काम नसल्याने कवीला
In reply to @लेकाने कवीला नैसर्गिक by अत्रुप्त आत्मा
हे राम...!
In reply to प्रापंचिक बुवांच्या by नाखु
आवडली
ही कविता भोला पान (विडंबन)
अरे, काय हे! =)) पिंपळ पानाचे
In reply to ही कविता भोला पान (विडंबन) by लीलाधर
नाही पान वसूल करेन
In reply to अरे, काय हे! =)) पिंपळ पानाचे by यशोधरा
वरील कवीतेचे प्रायोजक
In reply to अरे, काय हे! =)) पिंपळ पानाचे by यशोधरा
(No subject)
In reply to वरील कवीतेचे प्रायोजक by नाखु
अजून साफसफाई आणि भर अपेक्षित
In reply to ही कविता भोला पान (विडंबन) by लीलाधर
नक्कीच ओ बुवा
In reply to अजून साफसफाई आणि भर अपेक्षित by अत्रुप्त आत्मा
सँत्रुप्त लक दाद देणेत येत
In reply to ही कविता भोला पान (विडंबन) by लीलाधर
आमचेही एक १२० ३०० पान
जमले हो जमले पान
In reply to आमचेही एक १२० ३०० पान by महासंग्राम
फोटोसहीत कवितेचे पान!
हे असेच असते सारे
सुरेख!
सुरेख आहे कविता.
विडंबनांंपेक्षा मूळ कविताच
सर्वेषाम् धन्यवादम्.
भारी !
सुरेख, छान आहे कविता... आवडली
सुरेख