मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिल देऊन आलो..

गवि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सांगावयास गेलो, ऐकून काय आलो? सुनावलेस तू, मी बिल देऊन आलो.. सैराट पावसाने पुरता.. भिजून आलो. त्या गोठल्या दुपारी बिल देऊन आलो.. हात होता तुझा अन कानशील माझे लोकां उमजण्याआधी बिल देऊन आलो. चालते होणे त्वरे सोपे गेले तुला वेटराने हटकले, मी बिल देऊन आलो. डोळे भरून आले.. पावसाच्या भरवशावर ना रोखले तयांना, अन बिल देऊन आलो.

वाचने 24729 वाचनखूण प्रतिक्रिया 32

टर्मीनेटर 01/07/2019 - 11:06
चार दिवसांत चार कवींना विडंबन करण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा जबरदस्तच म्हणायला पाहिजे :) मजा आली वाचायला.

ज्ञानोबाचे पैजार 01/07/2019 - 11:11
भावना सखोल पोचल्या, अर्थात या नंतर निराश न होता तुम्ही नव्या दमाने कामाला लागला असाल याची खात्री आहेच. पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 01/07/2019 - 12:43
आवडले. -दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे 01/07/2019 - 13:21
=)) =)) =))

यशोधरा 01/07/2019 - 15:13
तुम्ही, ज्ञापै, नाखु, गड्डा झब्बू सगळ्यांनी प्राचीतैला रॉयल्टी द्यायला हवीये खरतर! वर्षभराचा तिच्या आवडीच्या कॉफीचा पुरवठा करा तिला! =))

In reply to by यशोधरा

नाखु 01/07/2019 - 22:27
कुठले कुठले आजार उद्भवतात याची यादी शोधायला घेतली आहे. तरीही आपल्या जबाबदारीवर कॉफी घेणे कॉपीराइट बाहेरचा वाचकांची पत्रेवाला नाखु

चंद्र.शेखर 01/07/2019 - 15:52
ओरिजिनल पेक्षा जास्त वास्तववादी वाटलं.

जालिम लोशन 01/07/2019 - 16:14
+1

सस्नेह 01/07/2019 - 22:26
दासता-ए-दिलसे दर्दभरी है ...दासता-ए-बिल =))

विजुभाऊ 03/07/2019 - 13:15
लय भारी गवि षेठ तुम्ही कवितेच्या प्रांतात पण चौकर षटकार हाणता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 03/07/2019 - 17:31
लेखनावर किती प्रतिसाद आले ते बघायला आलो होतो, किती अवांतर. आमच्या वेळी असं नव्हतं. अशा अवांतर प्रतिसादामुळे लेखकाला खुप त्रास होतो. रात्री अपरात्री आपल्या लेखनावर कोणी छान छान म्हटलंय, कौतुक केलंय हे बघायला यावं आणि अवांतरमुळे लेखकाचा लिहिण्याचा मूड जातो. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

डॉ सुहास म्हात्रे 03/07/2019 - 21:01
जन्मल्यापासून मिपा वाचत असल्यास सत्तर वर्षांचे, नाहीतर अधिक काही (?दहा-पंधरा) वर्षे वाढवावी लागतील. यु सी. ;) :)