(काय करून आलो)
वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)
वाचने
35245
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाळून आलो .आमंत्रणाविना, तरीही पाजळून ज्ञान आलो.. असं चालेल का? पाजळून च्या ऐवजी मिरवून पण म्हणू शकता!
In reply to विडंबन जोरात आहे! by यशोधरा
हेच लिहीलं होतं पण मोबल्या स्वयंसुधारक मोठ्ठा घोटाळा करुन ठेवतोय.
त्याखाली जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित ही ओळसुद्धा गंडली
खुलासेदार वाचकांची पत्रेवाला नाखु
In reply to पाजळून by नाखु
नव्या बाटलीतल्या जुन्या दार्वांचा उल्लेख पण करायचा होता!!
मी पण धाग्यावर
प्रतिसाद द्यायला आलो
तुमचे विडंबन वाचून
खुश होउन गेलो
पैजारबुवा,
अनेक सन्माननीय मिपा सभासदांच्या परिस्थितीचे नेमकं चित्रण।
खिक्क।
हे लई भारी !
ते लई भारी !
नाखूबुवांचं ईडंबन
लईच भारी !!
=)) =)) =))
कविता/गजल/विडंबन जे काही आहे ते झक्कास जमलं आहे.
In reply to प्रथम क्रमांक... by सतिश गावडे
+१
भारीच नाखु काका
सद्यकालीन " हे पिऊन आले, ते करून आले " च्या पार्श्वभूमीवर हे खासच, स्पेशल नाखु टच :)
-)):
प्रकट वाचकांचे आणि मूक वाचकांचे आभार
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
हे खासच :)
जमलंय!!! :-)
विडंबन मस्त!
In reply to विडंबन मस्त! by प्राची अश्विनी
किमानपक्षी आपण तरी वैयक्तिक पातळीवर न घेतल्या बद्दल विशेष आभार
कुठलाही सल्लागार नसलेला सामान्य मिपाकर वाचकांची पत्रेवाला नाखु
चाहत्यांच्या जगात तुमच्या
स्थाण मागत आलो
इतकी रांग पाहून
(गुपचुप)नंबर लावून गेलो.
In reply to मस्त अंकिल by प्रचेतस
=))
In reply to मस्त अंकिल by प्रचेतस
वल्ली चांगला प्रयत्न सुरु ठेवा
In reply to चांगला प्रयत्न by प्रशांत
गल्ली चुकली काय ?
In reply to वल्ली ? :D by जॉनविक्क
मिपाचालकांची ? गल्ली चुकली ?
In reply to मिपाचालकांची ? गल्ली चुकली ? by सस्नेह
बहुतेक मलाच काही त्यांच्या वाक्यांचा संदर्भ लागत नसावा, असो. माझे विधान अथवा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. काही अडचण नाही. :)
In reply to ऑ ? मिपाचालक ? हम्म... by जॉनविक्क
जुने "वल्ली" = आताचे "प्रचेतस", हे समजल्यावर तुमचा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. :)
In reply to जुने "वल्ली" = आताचे "प्रचेतस by डॉ सुहास म्हात्रे
हे डुप्लिकेट आयडीचे प्रकरण आहे होय, आत्ता लक्षात आलं कि मिपाचालकांची गल्ली कधी का चुकत नसते ते. असो.
आपल्या विस्तृत माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. -/\-
In reply to ओह, ओके ओके... by जॉनविक्क
(शिक्षण मोड सुरू)
हे "डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण नाही.
ते स्वतःच्याच आयडिच्या बदललेल्या नावाने (पक्षी : प्रचेतस) सद्या लिहितात. असा नावबदल केल्यास, जुने नाव (पक्षी : वल्ली) बंद होते. त्यानंतरचे नवे व आयडीचे नाव बदलण्यापूर्वी लिहिलेले, लेख व प्रतिसाद, नवीन नावावर (उदा : प्रचेतस) दिसू लागतात. मिपामालकांना विनंती करून हे करवून घेता येते.
एकाच व्यक्तीने, एकाच वेळी दोन आयड्या काढून त्या आलटून-पालटून वापरल्यास (पक्षी : प्रत्येक आयडी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा आभास निर्माण केल्यास), ते डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण बनते.
(शिक्षण मोड बंद) ;) :)
In reply to (शिक्षण मोड सुरू) by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा... माहितीसाठी धन्यवाद. विषय काय होता आणि कसा संपला :), हे मिसळपाव.कॉम म्हणजे ना खरोखर एक मोठं गहन आहे गहन, याचा पार सामान्याला कधी लागूच शकणार नाही असं वाटतं. रत्न आहे हे अंजावरील.
तसेच अफलातुन प्रकरण आहे प्रचेतस उर्फ वल्ली ताईंचे.
In reply to :) :D :)) by जॉनविक्क
वल्ली ताई नाहीत दादा आहेत !
In reply to शिक्षण मोड परत सुरू by धर्मराजमुटके
=))
In reply to शिक्षण मोड परत सुरू by धर्मराजमुटके
भितींवर डोके आपटल्याची स्मायली कल्पावी. मिसळपाव.कॉम एक भुलभुलैय्या आहे हेच खरे.
बाकी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असे म्हणतात ते उगीच न्हवे ;)
In reply to ओह नो, सिरियसली ? by जॉनविक्क
वहिनी पाहिजे ताई नको याची काळजी घ्यावी हीच नम्र विनंती
जबराव जबराव जबराव
खिलजी खुश हुआ
एकदम भारी बोलले तो शोल्लीड भारी है ये
जबराट इडंबन =))
मी थिंक करत होतो की ही कविता मा. श्री. हार्दिक पंड्या" जी को सादर समर्पित है की कसे :)
हाहाहा.. लय भारी..
मालकानु, आणखी थोडी भर घालायची परवानगी असावी..
---
कसल्या पिंका अन् कसलं काय..
प्रतिसादांचे मातीचे[च] पाय..
हळूच काही काड्या सारून आलो..
फकड्यांची संख्या वाढवून आलो..
आता नादच खुळा त्याचे करायचे काय?
आपलेच बूड अन् आपलेच पाय..!
ताटातले खरकटे वाढून आलो..
चवीने हाडूक चघळून आलो..!!
--
राघव
हौर आंदेव
कोण कोण आले प्रतिसादा,
हळूच पाहण्या आलो!!
साक्षात मालकांना पाहून गहिवरलो!!
मिपा सदस्य तपाचे पुण्य कामी आलो!!
सर्व नववाचकांचे आभार
बागडण्यास्तव गेलो,
कसा बिघडून आलो?
अक्षरही न उमगे तरी
डेटा जाळून आलो.....
.
ना गावठी ना शहरी
मनाचा आरसा जहरी
ओळख पटवण्या स्वतःची
स्वतःस माळून आलो....
.
घटकेचे प्रवासी सगळे
अर्ध्यात उमजून गेलो
उरल्या अर्ध्याच्या हिशोबात
सरत्या अर्ध्यास विसरुन आलो...
.
कुणाशी वा, कुणाशी संवाद
कुणाशी खुन्नस हे ठरवूनच गेलो,
म्यान तलवारी असताही
परक्या नथीतून टोचून आलो..
.
आता काही न कळेना..
कशासाठी कुठे गेलो?
कोण होतास तू, काय झालास तू
प्रश्नचिन्ह घेऊन आलो....
.
वाह वाह वाह वाह (हेही माझीच)
In reply to मीपन मीपन by अभ्या..
दिलखुलास दाद दिली आहे.
या निमित्ताने उपस्थित राहिले, वल्लीशेठ आणि अभ्याराजे हे काय कमी आहे.
आणि चालकांना धागा दखलपात्र वाटला हे चेरी अॉन केक
आनंदित वाचकांची पत्रेवाला नाखु
कच्चा माल चांगला असला कि इथे प्रतिभेची स्पर्धा दिसुन येते. :)
अभ्या ने सुद्धा भारी लिवलं हाय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani
विडंबन जोरात आहे!