मळभ..!
लेखनविषय:
कुठेतरि बरच दाटलेलं असतं
आणि खरच हमसुन बरसायचं असतं
उगाच नाहि , तर अगदि मनापासुन
डोळ्यातलं पाणि न लपवता
जमेल तितकं सांडायचं असतं
आत दाटलेलं , मळभ साठलेलं
कुठेतरि हमसुन बरसायचच असतं
किती विचार करुन प्रत्येकवेळी
आलच जरी भरुन भलत्यावेळी
सारखं सारखं बाजुला सारायचं नसतं
परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत
हळुवार डोक खुपसायचं असतं
आत दाटलेलं , मळभ साठलेलं
कुठेतरि हमसुन बरसायचं असतं ..
कुठेतरि हमसुन बरसायचच असतं ...
वाचने
6533
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
भावना पोचल्या,
रच्याकने :-विडंबनारिष्ट बनवण्यासाठी कच्चा माल ठासून भरला आहे
पैजारबुवा,
In reply to कविता आवडली by ज्ञानोबाचे पैजार
थन्क गोद ... विडंबनासाठी का होइना ..
तुम्हि वाचलत ;)
In reply to =)) :D by जॉनविक्क
दात चान विचकायला येतात ओ तुमाला =))
In reply to दात चान विचकायला येतात ओ by जेनी...
आवडली.
मॉन्सून लांबलाय जेनीताई. बरसणार आहे, पण जरा उशीराने.
परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीतपिसं साफ करताना पक्षी करतात, तसं का?
In reply to परक्याजवळ नाहि तर आपल्याच by यशोधरा
येस अॅश .. तसच तसच =))
In reply to येस अॅश .. तसच तसच =)) by जेनी...
थन्क गोद तुला कळलं बै! =))
येणार , येणार आता मान्सूनपण येणार
कशाला हवा तो हवामान खात्याचा अंदाज
जेंनीताई आली , छत्र्या उघडा रे
आता इथे धो धो पाऊस पडणार
=======================
तुम्हारे आनेपे एक क्विता तो बनतीच है
क्यो कि , क्यो कि , तुम अपनी हय जेनी तै
वेगळा विचार. पुलेशु.
जरा छिद्रान्वेशीपणा -
पाऊस बरसतो आणि त्या बरसण्याला एक सकारात्मकता असते.
मळभ म्हणजे खरंतर मनातील एक नकारात्मक भावना झाली.
आता जर मळभ बरसलं तर नकारत्मकता बरसणार असं होणार नाही का?
मळभाचा निचरा व्हायला हवा पावसातील सकारत्मकतेने. मला वाटतं असंच तुम्हाला सुचवायचं असावं. चु.भु.द्या.घ्या.
राघव
In reply to वेगळा विचार. पुलेशु. by राघव
तसं काही नसावे,
त्यांना बरसायचेच आहे.
विषय संपला.
.
In reply to एहे नाय नाय by अभ्या..
=)) योउ गोत म्य पोइन्त अब्या =))
छान कविता.
लै दिसांनी मिपावर बरसलेल्या जेनी... तैच्यावर प्रतिसादांचे वादळ बरसले ! =))
सुरेख
+१
कविता आवडली