या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ.
शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’.
शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो. चित्रपट प्रत्यक्ष पहावा, त्याबद्दल लिहित नाही.
चित्रपटाचा उत्तरार्ध किंचित रेंगाळल्यासारखा वाटू शकतो, पण एकूण या विषयाची प्रकृती पाहता, तसे होणे साहजिक आहे. स्मरणरंजनाचा पारा दिग्दर्शकाने फार मनापासून, कसोशीने हाताळला आहे, म्हणून आपल्या मनातल्या कोणत्याही फ्रेमला हा चित्रपट तडा जाऊ देत नाही.
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
जाता जाता ..... एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’ ❤️ (हे अर्थात, इंग्लिश सबटायटल्सचे मराठीकरण आहे. मूळ भाषेत ते आणखी आर्त, मधुर असणार.)
वास्तव नेहमीच अंगावर येणारे, सेन्सेशनल असते, असे नाही, तर असे निष्कपट, निरागस, जीव ओवाळून टाकणारेही असते, ही जाणिव या चित्रपटाने जागी ठेवली. एकदा तरी पहावा असा चित्रपट.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10884
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिप शाळा , यत्ता आठवी ढ.
व्हाईट माऊंट ऑफ लव्ह
व्हाईट माऊंटन ऑफ लव्ह
In reply to व्हाईट माऊंट ऑफ लव्ह by चांदणे संदीप
96 बघण्यात येईल!
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप
मॅच्यूअर = परिपक्व
In reply to शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप by महासंग्राम
हिंदीमध्ये उपलब्ध आहे का ?
नाही पण इंग्रजी सबटायटल
In reply to हिंदीमध्ये उपलब्ध आहे का ? by मराठी कथालेखक
ही लिंक...
In reply to नाही पण इंग्रजी सबटायटल by महासंग्राम
https://drive.google.com/file
मी सिनेमा बघायला सुरुवात केली
In reply to https://drive.google.com/file by शिव कन्या
केवळ माहिती इथे दिली. बाकी
In reply to मी सिनेमा बघायला सुरुवात केली by यशोधरा
मंदार भालेराव....
मस्त!