96 - प्रेमाचा धवलगिरी
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ.
शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’.
शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो. चित्रपट प्रत्यक्ष पहावा, त्याबद्दल लिहित नाही.
चित्रपटाचा उत्तरार्ध किंचित रेंगाळल्यासारखा वाटू शकतो, पण एकूण या विषयाची प्रकृती पाहता, तसे होणे साहजिक आहे. स्मरणरंजनाचा पारा दिग्दर्शकाने फार मनापासून, कसोशीने हाताळला आहे, म्हणून आपल्या मनातल्या कोणत्याही फ्रेमला हा चित्रपट तडा जाऊ देत नाही.
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
जाता जाता ..... एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’ ❤️ (हे अर्थात, इंग्लिश सबटायटल्सचे मराठीकरण आहे. मूळ भाषेत ते आणखी आर्त, मधुर असणार.)
वास्तव नेहमीच अंगावर येणारे, सेन्सेशनल असते, असे नाही, तर असे निष्कपट, निरागस, जीव ओवाळून टाकणारेही असते, ही जाणिव या चित्रपटाने जागी ठेवली. एकदा तरी पहावा असा चित्रपट.
वाचने
10883
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
जिप शाळा , यत्ता आठवी ढ.
:-) :-)
बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy
In reply to व्हाईट माऊंट ऑफ लव्ह by चांदणे संदीप
टायपो.
Sandy
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे.
शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.
In reply to शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप by महासंग्राम
मॅच्यूअर = परिपक्व
हिंदीमध्ये उपलब्ध आहे का ?
In reply to हिंदीमध्ये उपलब्ध आहे का ? by मराठी कथालेखक
नाही पण इंग्रजी सबटायटल उपलब्ध आहेत
In reply to नाही पण इंग्रजी सबटायटल by महासंग्राम
https://drive.google.com/file/d/15_6frqeryTIoKIlMbS97si5FacybsIRb/view
https://drive.google.com/file/d/15_6frqeryTIoKIlMbS97si5FacybsIRb/view
In reply to https://drive.google.com/file by शिव कन्या
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे!
सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee..
शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.
In reply to मी सिनेमा बघायला सुरुवात केली by यशोधरा
केवळ माहिती इथे दिली. बाकी सगळे श्रेय त्या सिनेमा निर्माण करणार्यांचे.
मंदार भालेराव....
मान्य.
शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय.
शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच.
धन्यवाद.
बघायला हवा!
आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-)
तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!
जिप शाळा , यत्ता आठवी ढ.