दक्षिण कॅलिफॉर्निया मधला ऒरेंज प्रांत. कर्जाचे हप्ते न भरल्यान एका कुटुंबाला राहत्या घरातून बाहेर पडावं लागंल , तेही ऐन नाताळच्या तोंडावर . शेवटच्या दिवशी
"no trespassing" ची पाटी लावायला आलेल्या महिला पोलीस अधिकारयाला त्या कुटुंबातल्या ४-५ वर्षाच्या मुलाने विचारले.." how will Santa ever find me now ? ".. यावर डोळ्यातून अश्रु वाहण्या पलीकडे कोणाच्याही हातात काही नव्हतं.
अशीच परिस्थीती " subprime mortgage crisis " मधे अडकलेल्या व बेघर झालेल्या हजारो अमेरीकन कुटुंबांची आहे.. सीनबीसीच्या " house of cards " या विशेष वृत्तांता मधे या घोटाळ्याच उत्तरीय परीक्षण केलय.
याची सुरवात झाली २००१/२ मधे.. ९/११ च्या हल्या नंतर हादरलेल्या अमेरीकेला थोडा दिलासा म्हणुन बुश सरकारने व्याज दर कमी केले { ६.५(२००१) पासून ०.९८( डिसे: २००३) } . फ़्रेडी-मे व फ़्रेडी मॆक या सरकारी संस्थानी छोट्या बॆका व पतसंस्थां मार्फत कर्जाच्या रुपाने प्रचंड पैसा गृहनिर्माणासाठी बाजारात ओतला. या कर्जातला मोठा भाग हा कमी उत्पन असणारयांना " स्वताचे घर " हे स्वप्न पुर्ण करता याव म्हणुन वाटला गेला. या दोन्ही संस्थांवर प्रशासकीय नियंत्रक ( regulation body) नेमण्याचा सरकारचा प्रयत्न मात्र डेमोक्रट्सनी प्रचंड विरोध करुन हाणून पाडला. { या विरोधाच कारण ? .. कमी उत्पन गटा मधे मोठं प्रमाण हे अफ्रीकन अमेरीकन तसेच इतर देशातून आलेल्या स्थलांतरीतांचे होते..ही तर डेमोक्रट्सची व्होट्बॆंक. http://www.youtube.com/watch?v=K50TS0UZE7w }
कर्ज उपल्बध झाल्यावर लोकांनी धडाधड घरे खरेदी केली. खप वाढल्यावर मागणी वाढली आणि त्याच बरोबर घराच्या किंमती सुध्दा वाढल्या आणि इथून सगळ्या घोटाळ्याला सुरवात झाली.
किंमती वाढल्यावर सर्वांनी जुनी कर्जे रि-फायनान्स करायला सुरवात केली. म्हणजे वाढीव किंमतीचे नवीन कर्ज काढायचे ( त्याच किंवा दुसरया पतसंस्थेकडून) , त्यातुन जुने कर्जखाते बंद करायचे आणि मधला फरक स्वताच्या खिशात. याच काळात फ़्रेडी-मे व फ़्रेडी मॆकची सद्दी संपत आली होती आणि ती पोकळी भरुन काढली ती वॊलस्त्र्टीटच्या मोठ्या बॆकांनी. मग हा सगळा प्रकार अर्नीबंध वाढत राहीला ते सगळ्यांना घेउन बूडेपर्यंत. या सर्व बॆंका व वित्तसंस्थांनी अत्यंत भडक जाहिराती करुन रि-फायनान्ससाठी कर्जदारांना प्रव्रुत्त केले. लाखो डॊलर्सची रि-फायनान्स नुसत्या फोनवरुन केवळ १५-२० मिनटांत मंजुर होत असे. ( http://www.youtube.com/watch?v=dWaQ8wwD-Ho ) . पिझ्झा डिलीव्हरी करणारे, कार सेल्समेन हे आता Loan specialist या पदावर बसून कर्ज मंजुर करण्याचे सत्कार्य पार पाडू लागले. कागदपत्रांची पुर्तता , परतफेडीची क्षमता या सगळ्या दुय्यम बाबी. काही कर्जेतर उत्पन दाखलेही न मागता , सांगेल तो पगार ग्राह्य धरुन वाटली (stated income) . Security & Exchange , IRS , Department of treasury सारख्या सरकारी विभागांनी या सगळ्या कारभाराकडे व्यवस्थीत दूर्लक्ष केले. २००४ या एका वर्षात तब्बल ९०० billion डॊलर्स रि-फायनान्स मधून वाटले गेले.
आता या संकटास अमेरीकन भोगवादी/चंगळवादी मानसिकतेने मोठा हातभार लावला. कारण कर्जे रि-फायनान्स करुन मिळालेला हा पैसा हा उत्पन वाढवण्याकरता वापरला/गुंतवला गेला असता तर काही प्रमाणात अर्थव्यवस्थेला योग्य चालना मिळाली असती.. पण असे न होता हा पैसा चैनीसाठी उधळला गेला किंवा घरातल्या ( गरज नसलेल्या ) नुतनीकरणासाठी वापराला गेला (उदा. जलतरण तलाव , महागडे फ्लोरींग. ) शॊपींग मॊल मधील खरेदी फर्नीचर/HDTV/L.C.D screen ची खरेदी, BMW / Benz सारख्या गाड्या , सहली आणि पर्यटनामधे उडवलेल्या पैश्यामुळे या सर्व क्षेत्रांमधे तेजीचे वातावरण तयार झाले आणि ते जगभर पसरले.
तोपर्यंत वॊलस्त्र्टीटच्या बॆकांनी या कर्जांचे bonds , investment products करुन जगभरातल्या शेअर बाजारात आणि गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारली.
रि-फायनान्स करुन वाढलेले हप्ते भरणे अशक्य झाल्यावर कर्जदारांनी घरांचा ताबा सरळ बॆकांकडे देउन टाकला , एका मागे एक घरे परत बॆकांकडे आली आणि हा फुगा फूटला. घरांच्या किंमती उतरल्या , बॆकां तोट्यात गेल्या , शेअरबाजार उतरल्यावर गुंतवणूकदारांच नूकसान झाले. पैसे खर्चणे कमी झाल्यामूळे सगळ्याच क्षेत्रांत मंदी आली. नोर्वे सारख्या छोट्या देशाचीतर संपूर्ण अर्थव्यवस्था धोक्यात आली.
काही विषेषज्ञांनी हा धोका आधीच ओळखून बाजाराच्या विरुध्द गुंतवणूक ( against the market trading ) करुन या परिस्थीतही नफा कमावला आणि आधीच घायकुतीला आलेल्या विमा कंपन्यांना पुरते बुडवले.
तेजी आणि मंदीचे चक्र असते हे जरी खरे असले तरी आलेली तेजी ही खोटी धुळफेक / आर्थीक फुगवटा असेल तर नंतर आलेली मंदी जाणार कशी ?
माहिती/संर्दभ:- http://www.cnbc.com/id/28892719/ . गेल्या महीन्यातलाच विशेष व्रुत्तांता असल्यामूळे पूर्ण चित्रफीत संकेतस्थळावर उपलब्ध नाही. पुन:प्रसारणाच्या वेळा दिल्या आहेत.
{ अवांतर.:- ओबामांनी निवडणुक जिंकताना " we as people will get there ; we will do it " असा दिलासा दिला तरी प्रत्येक वेळी " परिस्थीती अवघड आहे, कठोर निर्णय घ्यावे लागतील " अशी ताकीद पण दिली. खुर्चीत बसल्यावर पुन्हा करदात्यांचा पैसा वॊलस्त्र्टीटवर वाटलाच !! आता या कंपन्या नाही सुधारल्या तर ?? ( http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2009/03/15/AR20090… ) }
आलिया भोगासी, असावे सादर !
वाचने
16559
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
+१
In reply to छान by सुनील
+२
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच म्हणते
In reply to +२ by सहज
छानच आढावा
In reply to छान by सुनील
छान
मस्त लेख
तंबु
सरकारी संस्थांची नांवे...
Federal National Mortgage
In reply to सरकारी संस्थांची नांवे... by संजय अभ्यंकर
चांगला
चांगला आढावा
In reply to चांगला by अवलिया
उपयुक्त
+१
In reply to उपयुक्त by मराठी_माणूस
बरोबर
महत्त्वाचे
भारतात
मिश्र अर्थव्यवस्था
In reply to भारतात by चिरोटा
एव्हढे
हेच म्हणतो
In reply to एव्हढे by मराठी_माणूस
माझ्या मते...
दिवाळखोरी
मी वेगळे
In reply to दिवाळखोरी by बामनाचं पोर
खराटा साहेब
In reply to मी वेगळे by नितिन थत्ते
धन्यवाद
In reply to खराटा साहेब by मराठमोळा
सबप्राईम क्रायसिस
छान माहिती
In reply to सबप्राईम क्रायसिस by क्लिंटन
असेच म्हणतो
In reply to छान माहिती by भिडू
अप्रतिम आढावा
In reply to सबप्राईम क्रायसिस by क्लिंटन
क्लिंटन ह्यांनी घेतलेला अतिशय सोप्या भाषेतला
In reply to सबप्राईम क्रायसिस by क्लिंटन
दोन मुद्दे
व्याजाचे दर
In reply to दोन मुद्दे by नितिन थत्ते
व्याजाचे
In reply to व्याजाचे दर by क्लिंटन
चालना
In reply to व्याजाचे by नितिन थत्ते
उत्कृष्ठ
सहमत
सहमत.
In reply to सहमत by मराठमोळा
लेख चांगला
उत्कृष्ट
एक अवांतर :
In reply to उत्कृष्ट by भडकमकर मास्तर
चांगला प्रश्न आहे
In reply to उत्कृष्ट by भडकमकर मास्तर
असेच म्हणतो
In reply to उत्कृष्ट by भडकमकर मास्तर
जॅमी डायमन
In reply to उत्कृष्ट by भडकमकर मास्तर
अर्थतज्ञ
In reply to उत्कृष्ट by भडकमकर मास्तर
हे सगळे
उत्तम लेख !
यावत जीवेत
सुंदर विवेचन
अजून एक बातमी...
माहितीपूर्ण आणि रंजक
माझ्या मार्केट प्लस पालीसीचे काय करु
बरीच
भारताचे काय?