(दाराआडचा मुलगा)

ज्ञानोबाचे पैजार जे न देखे रवी...
पेरणा एक मुलगा दाराआडून चोरून चोरून बघतो आहे बाहेर किती बाहेर? बाथरुमच्या बाहेर, खोलीमधे जिथे त्याची मैत्रीण बसली आहे मोबाईल वर गेम खेळत त्याचीच वाट बघत, करत असेल का ती ही तिकडून जाण्याचा विचार? समजले असेल का तिलाही तो चोरून तिच्या कडे बघतो आहे, तिच्या जाण्याची वाट बघत ? मुलगा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... कारण तो टॉवेल आणि कपडे खोलीत विसरला आहे, ते नेमके त्या मुलीच्याच शेजारी पडलेले आहेत, मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते.... टॉवेल विसरलेला मुलगा बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहतो.... पैजारबुवा,

21 टिप्पण्या 13,547 दृश्ये

Comments

संजय पाटिल नवीन

सॉरी सॉरी... तारीख बघीतली नाही.... १ दिवस ७ मिनीटे...

पाषाणभेद नवीन

In reply to by दुर्गविहारी

प्रत्येक गोष्टीचे वर्तूळ असते. चढणे आले अन बुडणे आलेच. पुल म्हणतात त्याप्रमाणे तो विश्वेश्वर घट्ट आहे. त्याला कसलेतरी सोयर नाही अन कसलेतरी सूतक नाही.

राजेंद्र मेहेंदळे नवीन

या मुलाच्या दाराआडुन बघण्याला आणि बाहेर न येण्याला काहीतरी लॉजिक आहे.

चामुंडराय नवीन

हा हा...... इडंबनाचं पेव फुटलंय राव मिपा वर चांगलंय .. चांगलंय ..

अभ्या.. नवीन

दाराआड लै जण झाले म्हणून धागा न काढता अ‍ॅक्चुअल दाराचा मुलगा इथेच.. . . . एक मुलगा दाराआडून बघतो आहे बॉलीवूड किती ते प्रचंड? फसलेल्या हिरोगिरीचे, नसलेल्या कुवतीचे बिगबॉसच्या बक्षीसाचे, फिक्सिंगच्या अटकेचे... दारा करत असेल का त्याचा विचार? शिकवलं असेल का त्याला कधीतरी. अचाट ताकतीसोबत राखलेला संयम. पौराणिक पात्रे साकारतानाचे संस्कार. मुलगा ते नाही घेऊ शकत. दारा आपले काम करतच राहतो. जब वी मेट चा पूर्ण पिकलेला सरदार मुलाला कामावरची निष्ठा शिकवत राहतो वय हरवलेला मुलगा आता हनुमानाच्या रोलमध्ये दिल्लीत रामलीला करत राहतो....

गोंधळी नवीन

मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते.... टॉवेल विसरलेला मुलगा बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो... हताशपणे वाट बघतच राहतो.... मोबाईलमुळे होणारा दुष्परीणाम सांगीतला आहे.असे वाटते.

सोन्या बागलाणकर नवीन

तुफान! मैत्रिणीलाच का नाही सांगत टुवाल द्यायला?

नाखु नवीन

In reply to by जव्हेरगंज

आंघोळ करत असल्याने हा घोळ झाला आहे. त्याने मैत्रीण अंमळ बिनांघोळीची असेल आणि याच्याच आमंत्रण इच्छुक असेल तर नो घोळ नो टोळ. अखिल मिपा पायघोळ ते पांजरपोळ संघाच्या "गुलाबी खुसपुस" या अनियतकालिकाच्या धोत्र्याची फुले या सदरातून साभार