तुझ्या दु:खाविना
लेखनविषय:
अजुन किती वेळ जाईल?
तुझी आठवण कुठपर्यंत राहिल?
तु गेलायेस पण आठवण छळतेय
तुझ्या सांवल्यात मी अजुन चालतेय
कुठलाच विचार येत नाहि तुझ्या दु:खाविना
अवचित वाजलेला फोन काळजाचे ठोके चुकवतो
गर्दीतला प्रत्येक चेहरा तुझाच भासतो
प्रत्येक रात्री वाट पहात रहाते झोपेची
झोपही येत नाहि तुझ्या दु:खाविना
जाग आल्यावर हात तुझ्या स्पर्शासाठी आसुसतो
तु नसल्याची आठवण झाल्यावर एकदम बावरतो
कधितरी थांबेलच हे सर्व
दु:खांचे हेहि संपेल पर्व
आयुष्याच्या पटलावर पुढे सरकतांना
आठवणीची सारी भुते जळतांना
हसणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि
अवेळी अश्रुही तरळणार नाहि
तुझी आठवण तेव्हांहि येईल
पण तुझ्या दु:खाविना
वाचने
1796
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
छान
In reply to छान by शितल
शिकवणी नाही
In reply to शिकवणी नाही by शिवापा
मग तुमचे
In reply to मग तुमचे by शितल
>>मग तुमचे