आताशा जीवनात

चैत्राली जे न देखे रवी...
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ चालत असलेली ही वाट कधी स॑पणारच नाही वाटतय॑ या सरळ वाटेवर कोणतच॑ वळण येणार नाही वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ ज्याच्याबरोबर या वाटेवर पाऊल टाकल॑ तोच अर्ध्यावर सोडून गेला 'माझच॑ प्रारब्ध' त्याच काही चुकल॑च नाही अस॑ वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ समोर पसरलेल्या उजाड वाळव॑टात सगळ॑ मृगजळच दिसतय॑ क्षणभर विसाव्याची सावली कधी लाभणारच नाही वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ लोक म्हणतात नाराज होऊ नकोस तुझ्याही जीवनात वस॑त फुलेल पण सप्तर॑गी ही दुनिया आपल्यासाठी नाहीच अस॑ वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
वर्गीकरण
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

13 टिप्पण्या 4,169 दृश्ये

Comments

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

आवडली कविता. अशा सरळ, साध्या, लगेच अर्थ समजणार्‍या कविता मला आवडतात. आणि ही त्याची पावती. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

चटपटीत नवीन

कविता खुपच छान अर्थपूर्ण समजणारी आहे. पण एकट॑ एकट॑ वाटणार्‍यांसाठी मि.पा. आहेच. चटपटीत.

प्रभाकर पेठकर नवीन

सुंदर कविता. अभिनंदन. आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ चालत असलेली ही वाट कधी स॑पणारच नाही वाटतय॑ या सरळ वाटेवर कोणतच॑ वळण येणार नाही वाटतय॑ जीवनातले उत्साही क्षण टिकवून ठेवायचे असतात, सगळे जवळ असले तरी आपले किती असतात? वाट कधी संपूच नये, असं वाटत राहावं, वळण कधीही येऊ शकतं, वाट पाहणं का सोडाव?

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, तुमचा प्रतिसाद फारच जास्त आवडला. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अवलिया नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच बोलतो --अवलिया

प्राजु नवीन

In reply to by अवलिया

+३ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर नवीन

का हो इतक्या उदास? मिपावर नेहमी येत जा म्हणजे अस्वस्थ वाटणार नाही.. तात्या.

अनिल हटेला नवीन

In reply to by विसोबा खेचर

ज्याच्याबरोबर या वाटेवर पाऊल टाकल॑ तोच अर्ध्यावर सोडून गेला 'माझच॑ प्रारब्ध' त्याच काही चुकल॑च नाही अस॑ वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ सुंदर !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

क्रान्ति नवीन

कविता खूप खूप आवडली. तशी मी पण उदासीन पंथीच आहे, पण मिपावर आल्यापासून माणसात आल्यासारख वाटतय. कारण इथे आपल्या दु:खालाही हास्यात बदलण्याची विशेष सोय आहे. तेव्हा आता हळूहळू तुझा एकटेपणा पण कमी होईल नक्कीच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लवंगी नवीन

एकतरी जिवलग मित्र-मैत्रीण असावी. कवितापण चांगले माध्यम आहे मन मोकळे करायला, पण हा एकटेपणा मात्र आपल्या माणसांत राहूनच दूर होईल. तुझे एकटेपण दूर करणारी मैत्रीण/मित्र लवकरच तुला लाभो. तोपर्यत मिपावरचे छान -छान लेख वाचा.

मराठमोळा नवीन

खुप छान!!!!! शब्द नाहीत. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!