साहित्य
१२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा
१.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध
२ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर
३ ,४ मध्यम आकाराची सफरचंदे
कृती
बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे. शेवटी दूध घालून फेटणे.
सफरचंदाच्या साली काढून फोडी करणे (खाण्यासाठी फोडी करतो तशा) व त्या फोडींमध्ये सुरीने खाचा मारणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.त्यावर सफरचंदाच्या फोडी उभ्या लावणे.खाचा मारलेला भाग वर आणि निमुळता भाग मिश्रणात थोडा बुडेल अशा सर्व फोडी लावणे.
अवन प्री हिट करणे.१८० अंश से. वर साधारण ४५ मिनिटे बेक करणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे.
व्हिप्ड क्रिम बरोबर खाणे.



वाचने
16938
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव.. छान
झ ब र द स्त!!!
+१
In reply to झ ब र द स्त!!! by चतुरंग
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+२
In reply to +१ by नंदन
स्वाती, इतक
काय सुरेख
इथे सफरचंद खूप छान मिळतात
मस्तं आहे
वॉव..
+१
In reply to वॉव.. by शाल्मली
सह्ही
In reply to वॉव.. by शाल्मली
हेच म्हणते.
In reply to सह्ही by लिखाळ
अप्रतिम!!
फार वाईट
व्वा!
वाचतोय ...
स्वातीताई एकदम गोड गोड पुनरागमन...
मस्त!!
स्वातिजी! क्या बात है!
वा वा...झक्कास...
मद्त
स्वाती,
काय सुंदर
मस्त
धन्यवाद!