मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आफेलकुकन अर्थात ऍप्पल केक !!!

स्वाती दिनेश · · पाककृती
साहित्य १२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा १.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध २ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर ३ ,४ मध्यम आकाराची सफरचंदे कृती बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे‌. शेवटी दूध घालून फेटणे. सफरचंदाच्या साली काढून फोडी करणे (खाण्यासाठी फोडी करतो तशा) व त्या फोडींमध्ये सुरीने खाचा मारणे. Image removed. Image removed. ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.त्यावर सफरचंदाच्या फोडी उभ्या लावणे.खाचा मारलेला भाग वर आणि निमुळता भाग मिश्रणात थोडा बुडेल अशा सर्व फोडी लावणे. अवन प्री हिट करणे.१८० अंश से. वर साधारण ४५ मिनिटे बेक करणे. बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे. व्हिप्ड क्रिम बरोबर खाणे. Image removed.

वाचन 16922 प्रतिक्रिया 0