मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्षाव अमृताचा..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी.. - प्राजु

वाचने 5723 वाचनखूण प्रतिक्रिया 33

अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 23:45
वा! क्या बात है !!! आज काय सुंदर सुंदर कवितांचाच दिवस आहे काय?
हकलेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी..
विशेष आवडले !! मस्तच ऽऽऽ अजुन येवु द्या :) --अवलिया

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/12/2009 - 23:48
सुंदर!!! बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रीका दिवाणी सुंदर!!! बिपिन कार्यकर्ते

मानस गुरुवार, 03/12/2009 - 23:49
तुझ्या प्रतिभेचा शृंगार असाच फुलत राहो, हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना.... घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी या ओळी खासच ....

क्रान्ति गुरुवार, 03/12/2009 - 23:51
खूप गोड कविता आहे प्राजु! एकदम नाजूक आणि तरल भाव! खूप खूप आवडली. तूच कविता, नाजूक कविता शरण तुला प्राजक्ता मी ग शरण तुला प्राजक्ता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

In reply to by क्रान्ति

प्राजु Fri, 03/13/2009 - 00:15
तुलाच धन्यवाद. कवितेला नाव सुचवल्याबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल गुरुवार, 03/12/2009 - 23:52
सुंदर कविता केली आहेस प्राजु. :) संपुर्ण कविता आवडली. :)

आपला अभिजित गुरुवार, 03/12/2009 - 23:56
अल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी सुंदर आहेत ओळी!!! खूपच छान कविता! जियो...!! अवांतर : तुम्ही प्रतिभा उसनी देता का?

मराठमोळा Fri, 03/13/2009 - 00:12
अप्रतिम काव्य्..ओळ अन् ओळ अर्थपुर्ण... सुरेख आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

जयवी Fri, 03/13/2009 - 00:43
जियो जानेमन :) संपूर्ण कविताच इतकी अलवार आहे ना.... सौंदर्यस्थळं तर अगदी जागोजागी आहेत. खूप खूप छान !! नव्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा :)

बेसनलाडू Fri, 03/13/2009 - 01:39
आवडली अगदी! मात्र एकंदर काफियासंच पाहता सुरांनी हा काफिया (मला तरी) खटकला. न-ण, ड-ढ, क-ख, ज-झ अशा जोड्यांचे काफिये योजावयाची युक्ती म्हणजे दोन मतले लिहावेत. म्हणजे काही अडचणराहत नाही. अर्थात, अशा कोणत्या बंधनांमध्ये कवी/कवयित्रीने स्वतःला किती अडकवून घ्यायचे हा ज्याचात्याचा/जिचातिचा प्रश्न. असो. (आस्वदक)बेसनलाडू

सहज Fri, 03/13/2009 - 07:42
अचानक विचाराचा एक थेंब येउन त्याचे तरंग मनाचा पूर्ण ताबा घेतात. सुरेख!

मदनबाण Fri, 03/13/2009 - 07:54
बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी सॉलिट्ट्ट... :) चांदण्यांचा वर्षाव असाच सुरु राहावा पुनवेचा चंद्र हा नभी सदा रहावा... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

मिसळभोक्ता Fri, 03/13/2009 - 08:44
"कंपीत गात्र होई", ऐवजी "कंपून गात्र जाई" कसे वाटते ? इतक्या हळूवार कवितेला पास्ट पार्टिसिपल्स टाळावेत. - मिसळभोक्ता

राघव Fri, 03/13/2009 - 14:35
छान गझल..नेहमीप्रमाणेच उत्तम! आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी.. हे खास!! :) राघव

अनामिक Fri, 03/13/2009 - 19:47
सुंदर कविता प्राजु ताई... खुप खुप आवडली! आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी ह्या ओळी तर लाजवाब! काय सुंदर कल्पना आहे, नव्हे हेच वास्तव असावे!! -अनामिक