मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बांडगूळं

चांदणे संदीप · · जे न देखे रवी...
काव्यरस
बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८)

वाचने 5226 वाचनखूण प्रतिक्रिया 15

नाखु 11/06/2018 - 16:38
एकदम बाराच्या भावात (जबरा) कविता तृणधान्य मूलक नाखु पांढरपेशा

खिलजि 11/06/2018 - 17:39
खरंय मित्रा बांडगुळ जागोजागी दिसाया लागलंय लोकांना रानपण कमी पडाया लागलंय शहरीकरणाच्या नावाखाली कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले इतस्ततः सारे रानातच विखुरले गेले वृक्षाएवढ्या विचारांची(एकत्र कुटुंब पद्धत) हळूहळू रोपे नंतर तण झाले मोकळे रान नष्ट होऊन बांडगुळासारखे मन झाले बांडगुळासारखे मन झाले सिद्धेश्वर विलास पाटणकर

ही बांडगुळे बर्‍याच वेळा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर देखिल उगवतात. ती उगवली आहेत हे समजणे आणि त्यांना वेळेवर छाटून टाकणे फार महत्वाचे आहे. पैजारबुवा,

चौथा कोनाडा 18/06/2018 - 08:08
भारी ! कविता आवडली. कविता बरंच काही सांगुन जातेय, वैयक्तिक, सामाजिक वै. काढता आली नाहीत तर या बांडगुंळांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो, हतबलता येते.