किक... भाग १
किक भाग २...नुन - कुन चे साम्राज्य...
रंगदुम हे काही नकाशातले ठळक ठिकाण नाही, असायचे कारणही नाही. मग एक जुनाट डाक बंगला, एक लहानसे गेस्ट हाऊस आणि पाच-पन्नास घरटी असलेल्या या आडबाजूच्या ठिकाणी सुखासीन जीव आणायचाच कशाला?
पुण्यातल्या एखाद्या प्रथितयश डायनिंग हॉल (किंवा खाणावळ म्हणा हवं तर)मध्ये जाऊन जेवताना जो फील येतो तसाच एखाद्या नावाजलेल्या पर्यंटनस्थळी येतो. पुढ्यात वीस-पंचवीस पदार्थ मोठ्या निगुतिने मांडून ठेवलेले असतात पण एवढ्या गजबजाटात धड एकाचाही पुरेपूर आस्वाद घेता येत नाही. ताटभर जेवूनही पोटभर जेवल्याचं समाधान काही मिळत नाही आणि शिवाय कुण्याच्यातरी लग्नाच्या पंगतीत (पैसे देऊन) जेऊन आलो असा विचारही डोकावून जातो. याउलट कधी साधी पण चविष्ट भाजी भाकरी जठराग्नीत स्वाहा करताना देखील ते “उदरभरण” न वाटता “यज्ञकर्म” वाटू लागते. पावसाळ्यातल्या एखाद्या दुपारी सिंहगडावर हा यज्ञ चालू असेल तर मग विचारायलाच नको.
रंगदुम-पदुम प्रवास हा असाच आहे. इथे काही नावाजलेली भारंभार ठिकाणं नाहीत, दोन-पाच प्राणी आणि काही पक्षी सोडल्यास फारशी जीवसृष्टी नाही, इतकंच काय तर सामान्य पर्यटकांच्या पसंतीस उतरतील असे खारडुंग-ला किंवा पॅंगॉन्ग त्सो सारखे सेलिब्रिटी स्पॉट्स पण नाहीत. आहे तो अतिशय रांगडा हिमालय. साधेच पण पोट भरून जेऊ घालणारा आणि सरतेशेवटी तृप्त करणारा. इथे याच्या पंगतीला मांडीला मांडी लावून बसायचे म्हणजे मधूनच चवीला "ठेचा" खायची तयारी हवी. क्षणभर नाकातोंडातून धूर येतो खरा पण त्यातूनच तर खरी किक मिळते.
रंगदुम
रंगदुम गोम्पा
ठेचा खाऊ घालणाऱ्या वाटा ….
धोकादायक पेन्सी ला ….
शुभ्र पर्वतांच्या पार्श्वभूमीवर बर्फाची हलकीशी साय धरलेला आणि क्षणभर कष्टांचा विसर पाडणारा लँग-त्सो
संपूर्ण परिसरावर प्रभुत्व सांगणारी ड्रान्ग ड्रुन्ग हिमनदी आणि तिच्यापुढे मान तुकवून जाणारा चिंचोळा रस्ता
झंस्कार खोरे…. अर्थात झंस्कार नदी पदुम-मध्ये उगम पावते. इथून जी दिसते ती स्टोड नदी.
अशा आडवाटांवर असताना भरवसा ठेवावा अशी एकमेव .... रॉली !!!
झंस्कारचा बालेकिल्ला .... पदुम
पिबटिंग गोम्पा
कार्षा गोम्पा
कार्षा गोम्पामधून ....
स्टोन्गडे किंवा थोंगडे गोम्पा
स्टोन्गडे गोम्पामधून दिसणारा साराप-स्टोड नद्यांचा संगम. हीच झंस्कार नदी, जी पुढे सिंधू नदीला जाऊन मिळते.
थोड्या आडवाटेवरची झोन्गकुल गोम्पा
झोन्गकुल गोम्पाचा पहारेकरी
……………………………………………………
……………………………………………………
…………………………………………………… इति....
रंगदुम गोम्पा
ठेचा खाऊ घालणाऱ्या वाटा ….
धोकादायक पेन्सी ला ….
शुभ्र पर्वतांच्या पार्श्वभूमीवर बर्फाची हलकीशी साय धरलेला आणि क्षणभर कष्टांचा विसर पाडणारा लँग-त्सो
संपूर्ण परिसरावर प्रभुत्व सांगणारी ड्रान्ग ड्रुन्ग हिमनदी आणि तिच्यापुढे मान तुकवून जाणारा चिंचोळा रस्ता
झंस्कार खोरे…. अर्थात झंस्कार नदी पदुम-मध्ये उगम पावते. इथून जी दिसते ती स्टोड नदी.
अशा आडवाटांवर असताना भरवसा ठेवावा अशी एकमेव .... रॉली !!!
झंस्कारचा बालेकिल्ला .... पदुम
पिबटिंग गोम्पा
कार्षा गोम्पा
कार्षा गोम्पामधून ....
स्टोन्गडे किंवा थोंगडे गोम्पा
स्टोन्गडे गोम्पामधून दिसणारा साराप-स्टोड नद्यांचा संगम. हीच झंस्कार नदी, जी पुढे सिंधू नदीला जाऊन मिळते.
थोड्या आडवाटेवरची झोन्गकुल गोम्पा
झोन्गकुल गोम्पाचा पहारेकरी
……………………………………………………
……………………………………………………
…………………………………………………… इति....
वाचने
11164
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम. हा भाग आहेच माझ्या
वॉव...! बकेट लिष्टात ऍडवले
क ड क!!
स्वीकारली :) :) :)
In reply to क ड क!! by राघव
निव्वळ अप्रतिम
निव्वळ अप्रतिम
अफलातुन फोटो
जबरदस्त फोटो
शब्दही गोठतात इथे....
In reply to जबरदस्त फोटो by दुर्गविहारी
अप्रतिम!
खेळण्या च्या दुकानात हरखुन
:)
In reply to खेळण्या च्या दुकानात हरखुन by सोमनाथ खांदवे
व्यसन लावलं राव तुम्ही ! ..........
घोड्यावरूनरॉलीवरून चाललेला किल्लेदार ......हाहाहा...
In reply to व्यसन लावलं राव तुम्ही ! .......... by दिपस्वराज
नक्कीच...
In reply to हाहाहा... by किल्लेदार
वाह.. अप्रतिम.. _/\_