************************
भाग १ - तयारी
भाग २ - पुणे ते रोहतक
भाग ३ - पानिपत
भाग ४ - चंदिगड आणि मनाली
************************
मनालीमध्ये सकाळी उठलो, आवरले. आजचे मुख्य काम होते ते म्हणजे रोहतांग आणि लेहचे परमिट मिळवणे.
परमिट मिळवण्यासाठी -
मनालीमध्ये माल रोडजवळ परमिटचे ऑफिस आहे. गाडीचे रजिस्ट्रेशन, चालकाचे लायसन्स आणि PUC या सर्वांच्या झेरॉक्स लागतात. ग्रीन टॅक्स आणि परमिट फी वगैरे मिळून प्रत्येकी साधारणपणे २५० रू भरावे लागतात.
आंम्ही सकाळी ८ वाजता गेलो तर आमचा रांगेत १२ / १५ वा नंबर होता. स्त्रीयांसाठी वेगळी रांग होती.
११ वाजण्याच्या दरम्यान परमिट मिळाले. आंम्ही लगेच हॉटेलवर परत आलो, भरपेट नाश्ता केला आणि लगेचच रोहतांगला निघायचे ठरवले.
रात्री गर्दीने फुललेला माल रोड सकाळी असा दिसत होता.
मनालीची पुणेरी पाटी. ;)
"मनालीमधून रोहतांगला जाताना मुख्य अडथळा म्हणजे ट्रॅफिक जाम" असे सगळ्यांनी सांगितल्यामुळे आंम्ही शक्य तितक्या लवकर आवरले आणि बाहेर पडलो.
मनालीमध्ये बाहेर पडल्यानंतर निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसू लागला..
रोहतांग ५० किमी..
आणि थोड्याच वेळात एक ट्रॅफिक जाम लागला. अत्यंत अरूंद रस्ता आणि त्यावर समोरासमोर आलेले दोन ट्रक यांमुळे येथे रस्ता जाम झाला होता.
येथे आमच्यात काहीतरी घोळ झाला आणि मी ट्रॅफिक मध्ये जागा मिळाल्या मिळाल्या सुसाट सुटलो आणि रोहित व विजय मागे राहिले. थोडेसे अंतर कापतो न कापतो तोच आणखी एका ठिकाणी थांबलेल्या गाड्या सामोर्या आल्या.
येथेही थोडा वेळ गेला. एव्हाना मी रस्ते अडवणार्या भल्यामोठ्या ट्रकच्या मागे पोहोचलो होतो मात्र त्याला मागे टाकण्याची संधी मिळत नव्हती.
एका ठिकाणी संधी मिळाली आणि त्या ट्रकला मागे टाकून सुसाट पुढे सटकलो..
थोडे अंतर झाडांमधून आणि डोंगराडोंगरातून एकट्याने पार पाडले आणि मागे वळून पाहिले तर...
येथे एका पुलाचे काम सुरू होते..
रस्त्यावर गाड्यांची गर्दी दिसू लागली की मी पुढे पुढे पळत होतो आणि थोडे अंतर कापून पुन्हा रोहित आणि विजयची वाट बघत होतो.
एका ठिकाणी नदी लागली आणि तेथे लोक्स पाण्यात खेळत होते.. गाड्या धुवत होते. इतक्या गारठ्यात त्या लोकांना गाडी धुण्याचाही उत्साह होता.
९ टनांपेक्षा मोठी गाडी असेल तर काय करावे ब्वा..?
असे अंतर हळूहळू कापत असताना अचानक रोहतांग पासचा चेकपॉईंट लागला.
मी परमिट दाखवून पुढे गेलो मात्र थोडे अंतर गेल्यावर लक्षात आले की रोहित आणि विजयचे परमिट माझ्याकडेच आहे. आता कितीही वेळ होवूदे पण त्यांच्यासाठी थांबूया म्हणून मी परत चेकपॉईंटपाशी आलो आणि निवांत क्लिकक्लिकाट करत थांबलो.
पुढच्या रस्त्यावर गाड्यांची रांग दिसत होतीच.
यथावकाश तो ट्रॅफिकमध्ये अडथळा करणारा ट्रक आला. ठरल्यासारखे पोलीसांनी त्या ट्रकला बाजुला घेतले आणि मागचे ट्रॅफिक वाहते केले.
आता पुढचा प्रवास फोटोंमधून बघा..
बर्फाचे पहिले दर्शन.
हिमशिखरे..
या डोंगरात एखादी देवाची मूर्ती एखादे शिल्प असे काहीसे दिसत आहे का..?
खराब रस्ते सुरू झाले होते.. (या रस्त्याच्या उजव्या बाजुला खाली एक बर्फाचे ग्लेशीयर दिसत आहे त्याच्या शेजारील रस्त्यावरून आंम्हाला पुढे जावे लागले.)
या फोटोच्या वेळी मी एक मजा केली.. मी थांबलो तेंव्हा हे तिघे हळूहळू पुढे चालले होते. मी पहिल्यांदा रिकाम्या रस्त्याचा (वरचा) फोटो काढला आणि हे तिघे फ्रेममध्ये आल्यानंतर त्यांना आवाज दिला आणि पटकन हा फोटो काढला. :D
एखादा चांगल्या रस्त्याचाही तुकडा लागत होता..
गाडीचाही फोटो हवाच की...
झक्कास रस्ता...
हिमालयाच्या कुशीतली टुमदार गावे...
अभेद्य..
घर दिसते आहे का..?
विजय आणि रोहित..
असाच एक खराब रस्ता..
इथे "सोन्याबापू हायेत का..?" अशी हाक मारणार होतो.. :D
हिमशिखरे अचानक अशी डोकावत होती..
यथावकाश टंडी आले.. या रस्त्यावरचा शेवटचा पेट्रोल पंप.
रोहित..
...!!!
केलाँग नामक गावाजवळ..
विश्रांती... विजय आणि रोहित.
आंम्ही जिस्पाला राहणार होतो.. मात्र संध्याकाळची वेळ बघून केलाँगला राहण्याचे ठरवले. वाटेत एकाला राहण्याची माहिती विचारली तर तोच एका हॉटेलाचा मालक होता. "यिद्रिक" नावाच्या हॉटेलात रूम बघितली आणि सामान टाकण्यास सुरूवात केली. नंतर आंम्ही त्या टुमदार गावात चक्कर मारली, किरकोळ खरेदी केली. कुलवी टोप्या घेतल्या. आणि त्या हॉटेलच्या कूकने केलेले अप्रतिम जेवण जेवलो.
चिली चिकन
चिकन स्टफ केलेले मोमो
अप्रतीम चवीचा "लेमन हनी पॅन केक" (हे लिहितानाही तोंडात पूर आला आहे)
अरे हो.. एक एपिसोड सांगायचा राहिला..
गाडीवरून सामान उतरवताना मला पेट्रोलचा वास आला होता. मातीत गाडी लावली असल्याने सहज निरखून पाहिले तर इंजिनखाली पेट्रोलचे थेंब पडले होते. गाडीखाली वाकून बघितले तर टँकमधून पेट्रोल आलेले दिसत होते. केलाँगमध्ये प्रवेश करताना एक बुलेटचे गॅरेज दिसले होते. त्याच्याकडे गडबडीने गाडी पळवली.
गॅरेजवाल्याने नीट निरीक्षण केले आणि बोलता झाला...
"आपकी तो टंकी फट गई है..!!"
मी : ऑ..???????
(क्रमशः)

वाचने
15810
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही फोटो नाही दिसत नाहीये
ऑ!!! ;-)
नक्की काय झाले आहे? मी एकाच
In reply to ऑ!!! ;-) by एस
ऑ!!! ;-)
इथे "सोन्याबापू हायेत का..?"
वॉव!
आमची यशवंती अन तिचे अर्धवट सिलहौट!
ऑं!!!!
काय झाला भावसाहेब?
In reply to ऑं!!!! by संदीप डांगे
जबडा जमिनीला टेकला आणि भुवया
In reply to काय झाला भावसाहेब? by कैलासवासी सोन्याबापु
..पेट्रोल नसलेल्या
In reply to जबडा जमिनीला टेकला आणि भुवया by संदीप डांगे
तोच केला म्हणून... ;)
In reply to ..पेट्रोल नसलेल्या by मोदक
आँ!!
वा मस्त चालू आहे प्रवास
ज्जे ब्बात.......
मोदकराव, खूप फोटो आणि थोडं
हौ लकी!
मस्त.. फिरलोय हा सर्व भाग
लै भारी दादा
आँ
वाह.. भारी रे मोदक. मानलं राव
वा! मोदकराव मस्त.
मस्त !!
देवा डोळे निवले... हे पाहून
अ फा ट!!!!
फोटो दिसत आहेत का..?
2g वर दिसत नव्हते. 4g चालू
In reply to फोटो दिसत आहेत का..? by मोदक

अहाहा!