===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१...
०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
नुकतेच सौदी अरेबिया मधली नोकरी संपवून परतलो. या काळात अनुभवलेला तो देश माझ्या सवयीप्रमाणे प्रकाशचित्रांत बंदिस्त करून बरोबर आणला आहे. त्या चित्रांव्दारे मी साठवलेल्या आठवणींची तुमच्याबरोबर परत उजळणी करू म्हणतो. त्या देशात एकंदरीत कशी हालहवाल आहे आणि तो कसा दिसतो याबाबत बर्याच जणांना कुतूहल आहे असे जाणवल्याने ही लेखमाला लिहीत आहे. माझ्याबरोबर हा आठवणींचा प्रवास तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे.
ही लेखमालेचा रोख सौदी अरेबियाच्या भौगोलिक, राजकीय अथवा सामाजीक परिस्थितीवरची प्रतिनिधिक टिप्पणी असा नसून मी अनुभवलेला रोजच्या जीवनातला देश बरीचशी चित्रे आणि थोडेसे लिखाण वापरून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. चला तर करूया सुरू सौदी अरेबियाची सफर...
सौदी अरेबिया हा देश दोन कारणांमुळे जगात प्रसिद्ध आहे. पहिले कारण म्हणजे तो इस्लामचे उगमस्थान आहे आणि त्या धर्माची सर्वोच्च दोन स्थाने मक्का आणि मदिना तेथे आहेत. दुसरे म्हणजे तेथे असलेल्या जगातील सर्वात जास्त विक्रीयोग्य खनिज तेल साठ्यामुळे या देशाला जागतिक अर्थकारणात आणि त्यामुळे अर्थातच राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. खनिज तेलामुळे आलेल्या समृद्धीचा वापर करून अरबी आखातातल्या देशांचा विकास ७०च्या दशकापासून वेगात दौडू लागल्याने अर्थातच तेथिल सौदी अरेबियासह सर्व देशांत अनेक प्रकारच्या मनुष्यबळाची चणचण भासू लागली. या समस्येवर परकीय मनुष्यबळ आयात करणे हा उपाय अनेक समृद्ध देशांनी इतिहासात अनेकदा वापरलेला आहे. त्याची पुनरावृत्ती आखाती देशांनी केली नसती तरच नवल.
सौदी अरेबिया अरबी जगतातला आकारमानाने दुसर्या क्रमांकाचा देश आहे (पहिला क्रमांक अल्जेरियाचा आहे). इतर अरब आखाती भागातील देशांच्या मानाने अवाढव्य असणार्या सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे. या देशाची लोकसंख्या २ कोटी ७० लाख आहे. यापैकी ६० लाखावर लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने तेथे कायम वास्तव्य असणारे परदेशी नागरिक आहेत.
भारत आणि सौदी अरेबिया (जालावरून साभार)
अब्दुलअझिझ बिन अब्दुलरहमान अल् सौद (टोपणनाव इब्न सौद) या नावाच्या राजपुत्राने १९०२ साली अरबी व्दिपकल्पातिल राज्ये व टोळ्यांचे एकत्रीकरण सुरू केले आणि २३ सप्टेंबर १९३२ ला आधुनिक सौदी अरेबियाची ("ममलकत सौदीय आरबिय" उर्फ "किंगडम ऑफ सौदी अरेबिया") स्थापना केली आणि स्वतःला राजा असे घोषित केले. तेव्हापासून आजतागायत हा देश एक राजेशाही आहे.
सौदी अरेबिया (जालावरून साभार)
वरच्या नकाश्यात देवनागरीमध्ये तांबड्या रंगात नावे लिहिलेली रियाध (राजधानी), जेद्दा आणि दम्माम-खोबार-दाहरान (हे पुणे-पिंपरी-चिंचवड सारखे एक तिळे शहर आहे) ही तीन लोकवस्तीची मोठी केंद्रे असून देशाच्या इतर भागांत बरीच विरळ लोकवस्ती आहे. या देशाचा फार मोठा भूभाग "रब अल् खाली" उर्फ रिकामा चौकोन किंवा Empty Quarter नावाच्या (वाळवंटांच्या चित्रात दाखवल्या जाणार्या वळ्यावळ्यांच्या सरकत्या वाळूच्या) वाळवंटाने व्यापलेला आहे. सौदी खनिज तेलाच्या साठ्यांपैकी ९०-९५ टक्के साठे एकट्या पूर्व विभागात (अश् शर्किया, इस्टर्न रिजन / प्रॉव्हिन्स) आहेत. दम्माम-खोबार-दाहरान हे या विभागातले मुख्य केंद्र आहे.
सौदी अरेबियाचे इ स २०१३ चे राष्ट्रीय उत्पन्न (GDP-PPP) अंदाजे $९२७ बिलियन आणि दरडोई उत्पन्न $३१,००० होते. तेथील ९५% अर्थव्यवस्था तेल उद्योगाशी संबंधीत असून त्याचा सरकारच्या वार्षिक उत्पन्नात ७०% हिस्सा आहे.
असो. देशाच्या इतक्या तोंडओळखीनंतर आपण क्षणचित्रांकडे वळूया...
किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम (KFSHD)
हे आमचे गेले काही वर्ष कर्मक्षेत्र होते. स्पेशियालिस्ट हॉस्पीटल म्हणजे केवळ पाच-सहा सुपरस्पेशियालिटीज निवडून त्यांच्या उपचार व संशोधनावर लक्ष केंद्रित करणारे रेफरल हॉस्पिटल. येथे देशाच्या नागरिकांनाही बाहेरील मोठ्या हॉस्पीटलच्या कन्सलटंटचे संदर्भपत्र (रेफरल लेटर) असल्याशिवाय उपचार घेता येत नाहीत.
किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : दर्शनी भाग ०१
.
किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : दर्शनी भाग ०२
.
किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : तातडीक सेवेच्या प्रवेशव्दाराचा भाग
.
घराच्या व्हरांड्यातून दिसणारे हॉस्पिटलचे दृश्य
.
प्रशासकीय संकुल ०१
.
प्रशासकीय संकुल ०२
.
हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०१
.
हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०२
.
हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०३
.
हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०४
परदेशातल्या घरासमोरही आपली खाजगी बाग करण्याचा उत्साह काही मंडळी दाखवतात. याबाबतीत अर्थातच पाश्चिमात्य मंडळी पुढे असते. शहरात इतर ठिकाणीही शासकीय खर्चाने राहण्याची उत्तम सोय असली तरी चालत जाण्याच्या अंतरावरच्या असलेल्या हॉस्पिटलच्या आवरातील वसतिस्थानांना जास्त पसंती देणारेही असतातच.
.
हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०५
डिसेंबरच्या थंडीतील एका प्रसन्न सकाळी कोवळ्या उन्हात संकुलाच्या हिरवळीवर या भावंडांनी चक्क पिकनिक साजरा केला !
.
रोज संध्याकाळी आवारात धुडगूस घालणार्या अनेक गुंड टोळ्यांपैकी एक. कामावरून परतताना त्यांना रंगेहाथ कॅमेरात कैद केले :)
.
मोसमाप्रमाणे रंग बदलणार्या फुलांनी भरलेला हा कामाला जाण्याच्या वाटेवरचा गोल रोज सकाळी माझे मन प्रसन्न करत असे
.
हिवाळ्यातली एक सकाळ ०१
.
हिवाळ्यातली एक सकाळ ०२
.
एक संध्याकाळ
.
फुलेच फुले
नामांकित सरकारी इमारतींचे आवार नीटनेटके आणि सुंदर राखणे हे अभिमानाचे समजले जाते. त्यामुळे हॉस्पिटलच्या आवारातून फिरताना कॅमेरा वापरण्याचा मोह टाळणे अशक्य होते...
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०१ : बहरात आलेला कामाच्या वाटेवरचा माझा आवडता गोल
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०२
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०३
.

हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०४
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०५
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०६
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०७
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०८
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०९
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले १०
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले ११
.
हॉस्पिटलच्या आवारातली फुले १२
.

हॉस्पिटलच्या आवारातली फुले १३
आवारात इतकी फुले बघितल्यावर हॉस्पिटलच्या कॅन्टिनमधले खानसामेपण उत्साहाने त्यांचे खाद्यपुष्परचना कौशल्य दाखवल्याशिवाय कसे मागे राहतील?
हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०१
.
हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०२
.

हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०३
असो. पुढच्या भागापासून आपण बाहेर पडून भटकायला सुरुवात करूया.
क्रमशः
===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१...
०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
व्वा ...मस्त
सुंदर... पुढचा भाग वाचण्यास
क्षणचित्रं आवडली.
In reply to क्षणचित्रं आवडली. by आतिवास
हेच म्हणते.
तेलाचा पैसा !
सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१
मस्तं
मस्त
मस्त सुरवात. पु.भा.प्र.
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
सौदी अरेबियाच्या एकूण
In reply to सौदी अरेबियाच्या एकूण by डॉ सुहास म्हात्रे
ऐला!
In reply to ऐला! by पैसा
महत्वाची सूचना: हे वाचण्याआधी
In reply to महत्वाची सूचना: हे वाचण्याआधी by डॉ सुहास म्हात्रे
अल्जिरिया महाग आहे राव मग...
In reply to अल्जिरिया महाग आहे राव मग... by प्यारे१
हे भगवान!
In reply to हे भगवान! by पैसा
ते मला काय विचारते, त्या
In reply to हे भगवान! by पैसा
ही सगळी सौदी राजे अबदुल्ला
In reply to हे भगवान! by पैसा
@मग ते भारतात येईपर्यंत ८ चे
In reply to हे भगवान! by पैसा
मग ते भारतात येईपर्यंत ८ चे
नैसर्गिक व मानवनिर्मित फुले
आहाहा!
सुंदर सुरुवात.
मस्तच.
वेगळाच परिचय
In reply to वेगळाच परिचय by चौकटराजा
+१
In reply to +१ by एस
उत्तम विचार ! आणि हे पहा तो
In reply to उत्तम विचार ! आणि हे पहा तो by डॉ सुहास म्हात्रे
सही
In reply to उत्तम विचार ! आणि हे पहा तो by डॉ सुहास म्हात्रे
मस्त!
In reply to मस्त! by एस
हो. तेच ते त्या दुव्यातले
सुंदर... पुढच्या भागाच्या
छानच!
In reply to छानच! by बिपिन कार्यकर्ते
लिंक द्या
In reply to लिंक द्या by मंदार कात्रे
हि घ्या...
In reply to हि घ्या... by शिद
आभार
सुंदर
In reply to सुंदर by प्रदीप
मर्स (MERS) चा इतका धसका
ज्जे बात. आता अजुन एक देश
मस्तच
मस्तच! आपली लिखाणशैली, माहिती
सुंदर फोटो ! आत्ताच्या
सुरेख
In reply to सुरेख by सुनील
धन्यवाद !
अनेक धन्यवाद !
In reply to अनेक धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
माहिती द्या ...
In reply to माहिती द्या ... by चौकटराजा
इनो सगळ्यात स्वस्तात, मिळेत
उत्तम लेख
मरुद्यानात अशी नानाविध
जी संकुल म्हणुन आहेत ती अगदीच
In reply to जी संकुल म्हणुन आहेत ती अगदीच by प्रसाद१९७१
त्या इमारतीत २-३-४ बी एच के
पुभाप्र !!
मला एक वेगळाच प्रश्न कधी
अरे वा नविन मालिका
एक्का काका, सौदी अरेबिया च्या
In reply to एक्का काका, सौदी अरेबिया च्या by रायनची आई
धन्यवाद !
लैच मस्त फटू. सौदीच्या
In reply to लैच मस्त फटू. सौदीच्या by बॅटमॅन
शोधा शोधा
In reply to शोधा शोधा by पैसा
बुरख्यात असो नैतर साडीत नैतर
In reply to बुरख्यात असो नैतर साडीत नैतर by बॅटमॅन
@(हरितक्रांतीप्रेमी) >>>
कय सुंदर आहेत फुले!
अनेक धन्यवाद !