मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाइक्स घेताना - भाग ५ - बायकांच्या बैका

टवाळ कार्टा · · तंत्रजगत
बाईक्स घेताना - भाग १ - बायकर्सचे प्रकार बाइक्स घेताना - भाग २ - १००-११० cc बाइक्स घेताना - भाग ३ - १२५ cc बाइक्स घेताना - भाग ४ - १३५ cc (पूर्वी...कोणे एके काळी) आधी जाहीर केल्याप्रमाणे हा भाग अनाहिता पेश्शल :) भारतात जश्या १९९० नंतर स्कूटरचा जमाना मागे पडून बाईक्स जास्त लोकप्रिय होऊ लागल्या अगदी तस्सेच्च २००५ नंतर हळूहळू ऑटोमॅटिक स्कूटरची लोकप्रियता वाढत आहे. मला आठवते त्यानुसार भारतात ऑटोमॅटिक स्कूटर बहुतेक पहिल्यांदा "TVS सनी / स्कुटी" (तीच ती काजूतैंकडची) होती (त्या आधीचे म्हैत नै कारण मी फार लहान होतो :D) आणि त्या नंतर पटकन आठवणारे नाव म्हणजे "Kinetic होंडा". शालेय जीवन संपेपर्यंत या दोनच "स्कुटी" माहित होत्या..."स्कुटी" हे नाव सर्रास ऑटोमॅटिक स्कूटरसाठी वापरले जाते (जसे फ़ोटोकोपी साठी xerox) यावरून "TVS सनी / स्कुटी"ची लोकप्रियता समजावी. पण हिरो-होंडाच्या बाईक्सच्या उदयानंतर "बाईक्स = माचो लुक्स" म्हणून पुरुषांसाठी आणि "ऑटोमॅटिक स्कूटर = चालवायला सोप्या...आकाराने आणि पॉवरने कमी" म्हणून बायकांसाठी असा सोपा हिशोब झाला...त्यातच Bajaj ने Pulser साठी "Definitely male" अशी टॅग लाईन वापरून त्यावर शिक्कामोर्तब केले. आणि बायकांमध्ये ऑटोमॅटिक स्कूटर लोकप्रिय असण्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे साडी / ड्रेस घालूनसुध्धा चालवता येते :) आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि भारतात ऑटोमॅटिक स्कूटर इतक्या लोकप्रिय झाल्यात की जवळपास प्रत्येक बाईक बनवणार्या कंपनीने ऑटोमॅटिक स्कूटर मार्केटसाठी कमीतकमी १ स्कूटर बनवली आहे. भारतात आत्ता बाकी कोणत्याही टू-व्हिलर सेगमेंटपेक्षा ऑटोमॅटिक स्कूटर साठी सगळ्यात जास्त पर्याय उपलब्ध आहेत. या स्कूटर लोकप्रिय होण्याची काही महत्वाची कारणे म्हणजे...
  • काही लोकांना क्लच दाबून ठेवा + गिअर बदला + क्लच हळूहळू सोडा ही प्रोसेस किचकट वाटते
  • काही जणांना गीअर बदलणे नीट जमत नै
  • आणि काही आळशी असतात :D
अश्या सगळ्या लोकांसाठी ऑटोमॅटिक स्कूटर ही चालवायला अतिशय सोपी आहे...ना गीअर्सची कटकट ना क्लचची भानगड...फक्त बटण दाबा आणि भुर्रर्र :)
  • सर्वसाधारण भारतीय उंचीच्या लोकांसाठी पर्फ़ेक्ट
  • बाईकच्या तुलनेत डिकीची जागा भरपूर...ऑफिसातून घरी येताना भाजी / सामान / काही वेळेला जड ग्यास सिलिंडर "खरा आणि साहेब म्हणायचे तो सुध्धा" :D आणताना हा मोठा फायदा असतो
या पासून ते अगदी
  • घरातली पहिली दुचाकी अशी असावी की घरातल्या बायकांसकट सगळ्यांना चालवता यावी
  • जवळच्या जवळ जायला म्हणून घरात बाईक / कारबरोबर सेकंड दुचाकी म्हणून
अगदी माझ्या काही मित्रांनी लग्न झाल्या झाल्या जवळपास २-३ महिन्यांच्या आतच "लग्न झाल्यावर घरात ऑटोमॅटिक स्कूटर असलेली बरी असते" असे म्हणत ऑटोमॅटिक स्कूटर बुक केल्यासुध्धा (बिच्चारे लग्नाआधी ते सगळे बुलेट घ्यायचे प्लान बन्वत होते हा भाग अलहिदा :D) परंतू या सर्व फायदयांबरोबरच बाईकच्या तुलनेत काही उणीवा सुध्धा आहेत
  • व्हेस्पाचा अपवाद वगळता बर्याच ऑटोमॅटिक स्कूटर जवळपास १००cc च्या असूनसुध्धा मायलेज फार कमी असते (३०-४० kmpl), १५०-२००cc च्या बाईक सुध्धा इतकेच मायलेज देतात
  • बाईकच्या तुलनेत फार लहान चाके असल्यामुळे स्थिरता (balance) कमी असतो, तोल गेल्यावर पटकन सावरणे कठिण असते
  • low ground clearance असल्यामुळे कच्च्या अथवा दगडधोंड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून / उंच स्पीडब्रेकरवरून जाताना स्कूटरचा खालचा भाग घासला जाण्याची शक्यता जास्त असते
  • ऑटोमॅटिक स्कूटर शक्यतो फक्त छोट्या (१५ कि.मी. अथवा त्यापेक्षा कमी) अंतरासाठी चांगल्या आहेत, त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वरचेवर वापरल्यास स्कूटर (आणि चालवणार्याची पाठसुध्धा) फार लवकर खिळखिळी होऊ शकते, कारण यांचे सस्पेंशन बाईकसारखे जास्त दणके सोसवण्यासाठी नसते
  • ऑटोमॅटिक स्कूटर शक्यतो कमी (४५-५० कि.मी.प्र.ता. अथवा त्यापेक्षा कमी) वेगातच चालवाव्या, त्यापेक्षा जास्त वेगात वरचेवर वापरल्यास इंजीनावर ताण येतो तसेच छोट्या चाकांमुळे स्थिरता (balance) कमी होते...मात्र मी बर्याचदा हायवेला या स्कूटर ७०+ च्या स्पीडने पळवताना बघितल्यात
  • धक्का स्टार्ट नाही करता येत, त्यामुळे किक लिव्हर नसेल तर पावसाळ्यात अथवा थंडीत बॅटरी डाऊन झाल्यावर मेकॅनिकला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही (विना किक लिव्हरची ऑटोमॅटिक स्कूटर आहे की नाही ते म्हैत नै पण जर असलीच आणि कोणी घ्यायचा विचार करत असेल तर हा मुद्दा ध्यानात ठेवा)
या भागात मुद्दामच इलेक्ट्रिक स्कूटर्स विचारात घेतल्या नाहीत कारण भारतात दुर्दैवाने अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी पुरेसे infrastructure नाहीये :( काही स्कूटर सोडल्यास बाकी स्कूटरबद्दल मला फार थोडी माहिती आहे कारण मला स्वत:ला स्कूटर आवडत नाहीत त्यामुळे बर्याचश्या स्कूटरबद्दल माहिती थोडक्यात गुंडाळलेली आहे :D
Honda Activa i / Activa 3G / Activa 125 - (तिच ती गुर्जींची उडनमांडी फेम) honda activa २००१ साली होंडाने हिरो-होंडा सोबत पार्टनरशीपमध्ये असतानाच स्वत:सुध्धा भारतीय मार्केटमध्ये सेपरेट उतरण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांचे आडाखे चुकवून बाईकऐवजी "Activa" ही ऑटोमॅटिक स्कूटर आणली. ज्या वेळेस भारतातून गीअर्ड स्कूटर नामशेष झालेल्या आणि नवीन जास्त मायलेजवाल्या ४-स्ट्रोक बाईकचा जमाना होता त्या वेळेस ऑटोमॅटिक स्कूटर मार्केटमध्ये आणणे आणि ते सुध्धा पहिले प्रोडक्ट म्हणून हा फार धाडसाचा निर्णय होता. But Activa proved it's mettle and initiated a new era in Indian bike market. Activa भारतात कैच्याकै लोकप्रिय झाली...आणि त्याची मुख्य कारणे वर दिलेली आहेत ती आहेतच पण त्याबरोबरच होंडाला first mover's advantage सुध्धा मिळाला. Activa is sole anchor for Honda's success in India and this is true even now. Activa ही भारतात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त विकली गेलेली दुचाकी आहे...हिरो स्प्लेंडर आणि बजाज डिस्कव्हरपेक्षा सुध्धा जास्त सध्ध्या Activa i / Activa 3G / Activa 125 असे ३ पर्याय उपलब्ध आहेत...यातल्या Activa 125 साठी मोठे १२५cc इंजिन, telescopic front suspension, front disk break असे खूप चांगले फायदे आहेत...१२५cc इंजिनमुळे मायलेज थोडे आणखी कमी होते पण बजाज पल्सरला (१५०cc वाली) पिकपमध्ये बरोबरीची टक्कर देते :)
Honda Dio (काजूतैंच्या भाषेत झुरळ...ख.व.उ.पा.मंडळाकडून साभार :D) honda dio होंडाची कॉलेजमध्ये जाणार्यांना डोळ्यासमोर ठेउन डिझाईन केलेली स्कूटर...काहीजणांना हिचे डिझाईन थोडे ढिंच्याक वाटू शकेल...अश्यांनी "आपण आता काका/काकू कॅटेगरीमध्ये गेलो" असे खुशाल समजावे :) टेक्निकली हिच्यात आणि Activa मध्ये तसा काहीच फरक नाहीये...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे
Honda Aviator honda aviator हि होंडाची अजून एक स्कूटर...Activa चे यश बघून होंडाने ही आणलेली पण हि Activa इतकी लोकप्रिय नाही झाली...टेक्निकली हिच्यात आणि Activa मध्ये तसा काहीच फरक नाहीये...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे पण हिच्यात Activa 125 सारखे telescopic front suspension, front disk break असे खूप चांगले फायदे आहेत
Honda Navi (with USD Suspension??) honda navi हि होंडाने नुकतीच आणलेली नवीन स्कूटर...व्यक्तीश: मला याचे लुक्स अज्जीबात आवडलेले नाहीत...ना धड स्कूटर ना धड बाईक...लुक्स किती जणांना आवडेल माहीत नाही...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे पण "नवी"न डिझाईन मध्ये टाकीखाली सामान ठेवायला जागा आहे...पण हि स्कूटर मुळात ज्या बाईकवरून inspired आहे ती बघितली तर नवीचे डिझाईन हे ताजमहाल समोर बीबीका मकबरा वाटेल...जरा होंडाच्याच MSX-१२५ या बाईककडे बघा :) honda mcx 125
Hero Motocorp Pleasure hero pleasure हिरो होंडापासून विभक्त झाल्यानंतरसुध्धा आत्ताआत्तापर्यंत होंडाचीच इंजिने वापरते आहे...Pleasure ही खास कॉलेजमध्ये जाणार्या मुलींना डोळ्यासमोर ठेवून मार्केटिंग केलेली स्कूटर आहे त्यामुळे डुएल टोन कलर्स आहेत
Maestro Edge hero maestro हिरोची ही स्कूटर हिरोने Engines Engineering बरोबर बनवलेले नवीन ११०cc चे इंजिन वापरते... features च्या बाबतीत मात्र ही होंडाच्या Activa ला टक्कर देऊ शकते...यात telescopic front suspension, digital instrumental console, mobile charger, engine immobilizer (anti-theft system) असे काही फायदे आहेत जे बाकी स्कूटर्स मध्ये नाहीत...आकाराने सुध्धा ही स्कूटर बर्यापैकी मोठी आहे
Duet hero duet हिरोची ही स्कूटरसुध्धा हिरोने Engines Engineering बरोबर बनवलेले नवीन ११०cc चे इंजिन वापरते...ही जवळपास हिरो Pleasure सारखीच आहे पण यातसुध्धा mettle body, telescopic front suspension, external fuel filling, digital instrumental console, mobile charger, tubeless tires असे चांगले features आहेत
Yamaha Ray Z yamaha ray z ऑटोमॅटिक स्कूटरची वाढती मागणी पाहून यामाहानेसुध्धा त्यात उडी घेताना रे स्कूटर आणली...दिसायला साधारण होंडाच्या डिओ सारखी आहे पण यात आकर्षक स्टिकर्स असल्याने डिओपेक्षा जास्त उठून दिसते features जवळपास बाकी स्कूटरसारखेच आहेत
Alpha yamaha alpha यामाहाची अजून एक स्कूटर...यापलीकडे मला अजून काही इंट्रेस्ट नाही :D
Fascino yamaha fascino बर्याचश्या स्कूटर एका ठराविक प्रमाणानंतर जवळपास सारख्याच दिसतात त्यामुळे यामाहाच्या फॅसिनोचे कर्वज् उठून दिसतात :) यामाहाने हि स्कूटर मुख्यत्वे बायकांना नजरेसमोर ठेउन डिझाईन केलीये आणि वेगळेपण दिसते सुध्धा. बस्स इतकेच...बाकी जवळपास इतर स्कूटरसारखेच
Suzuki Let's suzuki lets सुझुकीला बाईक्स मध्ये यश मिळत नसताना त्यांना त्यांच्या स्कूटर्सने बर्यापैकी हात दिला...Let's ही सुझुकी कडून आणलेली ११०cc ची स्कूटर
Access १२५ suzuki access सुझुकीला बाईक्स मध्ये मार्केट मिळत नसताना Access १२५ ला मात्र ठिकठाक विकल्या गेल्या...त्याचे मुख्य कारण म्हणजे बर्याच वेळेपर्यंत १२५cc च्या स्कूटर प्रकारात फक्त सुझुकीच होती...बाकी सगळ्या स्कूटर्स ११०cc च्या होत्या
Swish १२५ suzuki swish सुझुकीला बाईक्स मध्ये मार्केट मिळत नसताना Swish १२५ सुध्धा ठिकठाक विकल्या गेल्या...बर्याच वेळेपर्यंत त्याची प्रतिस्पर्धी सुझुकीचीच Access १२५ होती
TVS Jupiter tvs jupiter जेव्हा TVS च्या बाईक्स पॉपुलर होत नव्हत्या (एक अपाचे सोडली तर) त्यावेळेस स्कूटर्सनी मात्र बर्यापैकी लोकप्रियता मिळवली...बहुतेक Activa नंतर TVS च्याच स्कूटर जास्त दिसतात. Jupiter हि सध्ध्यातरी Honda Activa ला मुख्य प्रतिस्पर्धी आहे...कारण एक इंजिन सोडल्यास TVS हि Honda पेक्षा जास्त features देते...ते सुध्धा कमी किंमतीत...सध्ध्या हि स्कूटर TVS ची सगळ्यात बेस्ट स्कूटर आहे...आणि नुकताच यात डिस्क ब्रेकसुध्धा आणला आहे
Vego tvs vego हि Jupiter च्या आधी आलेली...Jupiter हि high end स्कूटर तर हि थोडी स्वस्त...वजनाला थोडी हलकी सुध्धा
Scooty Zest ११० / Streak / Pep+ tvs scooty भारतात ऑटोमेटीक स्कूटर मधल्या सुरवातीच्या काही काळातली Scooty हि एक आहे...काळानुरुप TVS ने थोडे थोडे बदल केलेत पण आजसुध्धा Scooty हि वजनाला हलकी असल्याने नाजूक पाखरांमध्ये लोकप्रिय आहे ;)
Mahindra Gusto mahindra gusto महिंद्रा बाईक / स्कूटर मार्केटमध्ये उशीराच आले...त्यांची सुरुवातच Kinetic च्या बाईक विभागाला विकत घेऊन झालीये. पहिल्यांदी १०० cc इंजिन असणारे मॉडेल होते पण नंतर १२५ cc इंजिन असणारे मॉडेल आणले आहे
Rodeo mahindra rodeo हिच्यात काडीचाही इंट्रेस्ट नाही त्यामुळे मला काहीही माहित नाही पण १२५ cc चे इंजिन आहे आणि महिंद्रा नवीन असूनसुध्धा बर्यापैकी खपली गेली आहे
Duro mahindra duro हिच्यात काडीचाही इंट्रेस्ट नाही त्यामुळे मला काहीही माहित नाही पण १२५ cc चे इंजिन आहे आणि महिंद्रा नवीन असूनसुध्धा बर्यापैकी खपली गेली आहे
Bajaj Nothing बाकी कंपन्या वाढणार्या स्कूटर सेगमेंटकडे वळत असताना बजाज मात्र त्यापासून ४ हात लांबच आहे...अगदी अधिकृतरीत्या सांगितले की आम्हाला स्कूटरमध्ये इंट्रेस्ट नाही...कदाचित एकेकाळी क्रिस्टल नावाने आणलेली स्कूटर फ्लॉप गेली त्यामुळे असेल एकेकाळी "...बुलंद भारत की बुलंद तस्वीर...हमारा बजाज...हमारा बजाज" म्हणत "बजाज चेतक" घराघरात पोचलेली (आमच्याकडे २० वर्षे वापरली)...या जाहिरातीचे गाणे आजही नोस्टेल्जिक करून जाते :(
Vespa - इतालिअन ब्युती Vespa १५० / १२५ / Elegante vespa स्कूटरमधला सध्ध्याचा माझा सगळ्यात आवडता ब्रँड :)
  • भारतीय कंपन्या किंमत कमी ठेवायला थोडे स्वस्तातले मटेरिअल वापरतात त्यामुळे देशी स्कूटर थोड्या गरीब दिसतात
  • जॅपनीज भन्नाट इंजिन क्वालिटी ठेवतात पण डिझाईन मात्र ठोकळे नाहीतर टोकदार काहीतरी बनवतात...काहीच नाही तर नाव कैच्याकै ठेवतात (आठवतेय सुझुकी "हयाते" बाईक??)
  • ईटालिअन...त्यांच्यासारखे तेच...सुंदरता देखणेपण ठसठशीतपणे उठुन दिसले पाहिजे...भले क्वालिटी जॅपनीज प्रॉडक्टसारखी नसेल पण लोकांनी यांच्याकडेच यायला हवे
एकेकाळी बजाज चेतकला तोडीसतोड टक्कर देणारी वेस्पा स्कूटर नंतर मात्र भारतातून निघून गेली...त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय लोकांचा बाईक्सकडे वळणारा कल समजून घेतला नाही आणि फक्त स्कूटरवरच लक्ष दिले...पण सुदैवाने ती परत आली :) सध्ध्या १५०cc च्या स्कूटर्स फक्त वेस्पा बनवते...दिसण्याच्या बाबतीत मात्र there is Vespa and then there are others :) ...गीअरवाले इंजिन जाउन ओटोमॅटिक इंजिन आले तरी बाह्यरुप तसेच "रेट्रो" ठेवले आहे...वळणदार डिझाईन आणि उठावदार रंग यामुळे बाकी स्कूटरसमोर वेस्पा उठुन दिसते...ठिकठाक दिसणारी पाखरेपण वेस्पावर भाव खावून जातात ;) आणि हि फक्त दिसण्यातच नाही तर खालील बाबतीतही बाकी स्कूटरपेक्शा उजवी आहे
  • १५० cc चे ३ व्हॉल्व्ह इंजिन
  • मायलेज बाकी स्कूटरपेक्शा जास्त
  • इंजिन पॉवर बाकी स्कूटरपेक्शा जास्त
  • सगळ्यात मोठी पेट्रोल टाकी
  • सगळ्यात मोठे ट्युबलेस टायर्स
  • सगळ्यात जास्त रंगांत उपलब्ध...पाखरांना मॅचिंग रंग शोधायला सोपे =))
बाकी डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स आहेतच...आणि शेवटचे म्हणजे वेस्पा आणखी एका बाबतीत बाकी सगळ्या स्कूटरच्या पुढे आहे...किंमत :D ...but it's worth it ;) मिरवायचे असेल / हौस असेल / नीट वापरणार असाल / परवडत असेल तर वेस्पा सोडून दुसरीकडे बघूच नका...अशी दुसरी नाहीच सापडणार :) यात telescopic front suspension असते तर हि आखुडशिंगी बहुगुणी भरपूर दूध देणारी गाय याचे उत्तम उदाहरण ठरली असती :)
स्कूटर कशी निवडावी औटोमटिक स्कूटरमध्ये शक्यतो खालील गोष्टी असाव्यात...वेस्पा घेणार असाल तर पुढे वाचू नका ;)
  • telescopic front suspension
  • tubeless tires
  • वजन चालवणार्याला झेपले पाहिजे
  • kick lever
स्कूटर घेताना ध्यानात ठेवावे की स्कूटर्सना re-sell value नसल्यात जमा असते...त्यामुळे घ्यायच्या आधीच पूर्ण विचार करावा क्रमशः Disclaimers - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत सर्व फ़ोटो इंटरनेटवरून साभार

वाचने 45969 वाचनखूण प्रतिक्रिया 134

In reply to by शाम भागवत

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/16/2016 - 11:48
पर्ल यामा विषयी ऐकून आहे. लहानपणी पुण्यात यायचो तेव्हा मी ती पाहिली होती. त्यावरुनच एम ५० सुचली बजाजवाल्यांना. बायकोला व मला दोघांनाही कंफर्टेबल अशी एक कॉमन गाडी नाही. मला उंच लागते तर तिला बुटकी. एम ८० त्यातल्या त्यात दोघांना सोयीची होती. पण संस्पेन्शन आरामदायी नसल्यामुळे विकली नंतर.

In reply to by प्रकाश घाटपांडे

टवाळ कार्टा गुरुवार, 06/16/2016 - 12:06
बायकोला व मला दोघांनाही कंफर्टेबल अशी एक कॉमन गाडी नाही. मला उंच लागते तर तिला बुटकी. एम ८० त्यातल्या त्यात दोघांना सोयीची होती. पण संस्पेन्शन आरामदायी नसल्यामुळे विकली नंतर.
बजाज अ‍ॅव्हेंजर :)

In reply to by टवाळ कार्टा

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/16/2016 - 12:24
स्वतःला अ‍ॅडजेस्ट करुन मोठ्या चाकावरुन छोट्या चाकांवर यावे व कुटुंबवत्सल अशी स्कूटर घ्यावी असे खूप डोक्यात आहे पण स्प्लेंडर काढून टाकायचे डेअरिंग होत नाही. स्कूटर मोसा पेक्षा जास्त उपयुक्त आहे. सामान ठेवता येत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

टवाळ कार्टा गुरुवार, 06/16/2016 - 11:19
हि बघा...टिव्हिएस लवकरच आणणार आहे...चाके मोठी आहेत...साउथ-इस्ट एशियामध्ये या डिझाईनच्या बर्याच बाईक्स वेगवेगळ्या कंपन्यांनी आणल्यात tvs rockz

मी स्कूटर कडे वळालो नाही कारण छोटी चाके मला बॅलन्स च्या दृष्टीने असुरक्षित वाटतात. स्किड होण्याचा धोका वाटतो. असा प्रॉब्लेम कोणाला वाटतो का?

टवाळ कार्टा Tue, 07/19/2016 - 16:46
Aprilia SR 150 aprilla sr 150 Aprilia SR 150 येतेय...फक्त ६५००० मध्ये...सुरुवातीची इंट्रोडक्टरी किंमत आहे...पण किंमतीच्या मानाने फीचर्स मस्त आहेत १५०cc इंजिन...पिआजीओचीच असल्याने यातसुध्द्धा ३ व्हॉल्व असण्याची शक्यता आहे टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन डिस्क ब्रेक मोठे १४" चाके अलॉय व्हील्स

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. Tue, 07/19/2016 - 17:00
3 व्हॉल्व्हमुळे परफॉर्मन्सला नक्की काय फरक पडतो. भारतात आजवरचा इतिहास असा आहे कि 3 व्हॉल्व्हची इंजिने असलेली सगळी मॉडेल्स (बाईक असो कि सकूटर) मार्केटला फेल गेली आहेत. बहुतांशी मेकॅनिक लोकांचेही मत या इंजिनबद्दल प्रतिकूल आहे.

In reply to by अभ्या..

टवाळ कार्टा Tue, 07/19/2016 - 17:06
टेक्निकली कसे ते मला नाही माहित...चिमण्याला विचारायला हवे (तो मिपावर असला तर)...मला इतकेच माहिती आहे की व्हॉल्व जास्त असतील तर इंजीनाच्या आतली शुध्ध हवा + पेट्रोलचे मिश्रण आत घेणे आणि ज्वलनानंतरचे उत्सर्जीत वायु बाहेर टाकणे ही कामे जास्त चांगल्या प्रकारे होतात...आणि मायलेज वाढते

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. Tue, 07/19/2016 - 17:10
तसे असले तर व्हेस्पाचे मायलेज सर्वात जास्त हवे. ती मान टिव्हीएसचा आहे. व्हेस्पा ऑनरोड मायलेजला जवळपास सगळ्यात खालच्या नंबराला आहे.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. Tue, 07/19/2016 - 18:48
फक्त ५ किमीच्या टॉप स्पीडसाठी १५ हजार जास्त मोजायचे? आणी मायलेज ५० कंबाईन आहे ते. अ‍ॅक्चुअली ४५. स्कूटरेटला फक्त सिटी मायलेज इम्पोर्टन्ट असते. बाईकसारखे हायवे मायलेज पाहात नाही. शिवाय आफ्टर सेल सर्व्हिस नाही. स्पेअर्स प्रचंड महाग. फक्त फंकी कलर्स हाच युएसपी. उगीच नाही अ‍ॅक्टीव्हा हाय्येस्ट सेलिंग स्कूटरेट.

In reply to by अभ्या..

टवाळ कार्टा Tue, 07/19/2016 - 17:08
बाकी भारतात एखादे मॉडेल फेल जाणे/पॉपुलर होणे याला बरीच कारणे असू शकतात...उत्तम उदाहरणे म्हणजे RE Continental GT आणि Hero Impulse

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. Tue, 07/19/2016 - 17:18
3 व्हॉल्व्ह असलेली आतापर्यंत निदान 15 तरी मॉडेल्स येऊन गेली. एक तरी सक्सेसफुल मॉडेल सांग.

In reply to by अभ्या..

टवाळ कार्टा Tue, 07/19/2016 - 18:30
नाही माहीत...३ व्हॉल्ववाली मला माहित असणारी मॉडेल्स म्हणजे वेस्पा स्कूटर्स आणि टिव्हिएस फ्लेम

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. Tue, 07/19/2016 - 18:44
फ्लेम तर डिसकंटीन्यु झाली डिमांड नसल्याने. व्हिक्टर आहे. अजुन ह्या बघ. http://www.bikesindia.org/lml ह्यातल्या निम्या बंद झाल्या. थोड्याशा भारताच्या काही भागात चालु आहेत. ऑलओव्हर फ्लॉप शो.

माझे प्रश्न १) अतुत्तम सस्पेन्शन असलेली स्कूटर कोणती? जी पुण्यातील खड्यातून देखील तुमच शरीर व्यवस्थित अखंड ठेवेल. २) मोटरसायकलवरुन कुटुंबवत्सल होण्यासाठी स्कूटरवर शिफ्ट झालेले कोण कोण आहेत? ३) स्कुटर बॅलन्सिंग च्या दृष्टीने असुरक्षित वाटते का? ४) एम ८० गाडी आता मिळते का? त्याच डिझाईन मधे उत्तम सस्पेन्शन असलेली मोटोस्कूटर कुणी काढली आहे का? त्या वेस्पाच सस्पेन्शन कसे आहे हो?

In reply to by प्रकाश घाटपांडे

टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 21:15
>>१) अतुत्तम सस्पेन्शन असलेली स्कूटर कोणती? जी पुण्यातील खड्यातून देखील तुमच शरीर व्यवस्थित अखंड ठेवेल. एकही स्कुटर खड्डेवाल्या रस्त्यांसाठी चांगली नाही कारण स्कूटरचे सस्पेन्शन बाईकइतके चांगले नसते, त्यातल्यात्यात पुढच्या चाकाला टेलिस्कोपीक सस्पेन्शन असलेले चांगले आणि मोठे चाक...सद्ध्या अश्या 2 स्कूटर आहेत, अप्रिला SR-150 आणि होंडा ऍक्टिवा 125 >>२) मोटरसायकलवरुन कुटुंबवत्सल होण्यासाठी स्कूटरवर शिफ्ट झालेले कोण कोण आहेत? उलट कुटुंब झाल्यावर स्कूटरवर शिफ्ट होऊ नये, त्याने रिस्क वाढते >>३) स्कुटर बॅलन्सिंग च्या दृष्टीने असुरक्षित वाटते का? हो, दुचाकीसाठी जितकी चाके छोटी तितका बॅलन्स कमी >>४) एम ८० गाडी आता मिळते का? त्याच डिझाईन मधे उत्तम सस्पेन्शन असलेली मोटोस्कूटर कुणी काढली आहे का? सध्या टिव्हीएसचे एक मॉडेल आहे बहुतेक >>त्या वेस्पाच सस्पेन्शन कसे आहे हो? याबद्दल माहीत नाही

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. Mon, 10/31/2016 - 21:37
सध्या टिव्हीएसचे एक मॉडेल आहे बहुतेक
टीव्हीएस किंग म्हणून होते. बंद झाले आता. हिरोची स्ट्रीट स्मार्ट पण बंद झाली. कायनेटीकची केफोर पण नाही मिळत. मोपेड आणी एम८० आकारात सध्या काही नाही. टीव्हीएसची एक्सेल प्युर मोपेड आहे. त्याला एम ८० सारके फायबर काउल नाही. काही इलेक्ट्रीक बाईक आहेत त्या आकारात. हिरो सायकल्सच्या. त्या चालत असतील तर ट्राय करा. ताकद कमी असते.

जय२७८१ Wed, 02/22/2017 - 16:26
तुम्ही होंडा एव्हिएटर संबंधी काही लिहिले नाहीत. मी टीव्हीएस ज्युपिटर व एव्हिएटर या दोन गाड्यांन मध्ये कन्फयुज झालो आहे. जाणकारांनी मार्गदर्शन करा.

दिपस्तंभ Sun, 08/13/2017 - 01:09
मी ही घरातील सर्वाना चालवता येईल आणि बहुउपयोगी अशी स्कूटर घ्यायचा विचार करतोय पण honda activa-aviator-tvs Jupiter यामध्ये कोणती चांगली ते ठरत नाही. कोण ऍक्टिवा म्हणतो तर कोण ज्युपिटर... या बद्दल माहिती घेतली सर्व अन वरील अभ्यासपूर्ण लेख ही वाचला. व्हेस्पा सोडून यामध्ये कोणती चांगली?

शब्दबम्बाळ गुरुवार, 01/18/2018 - 16:13
हल्ली जवळपास सगळ्या कंपन्या स्कूटर सेक्शन मध्ये नवनवीन गाड्या आणत आहेत! त्यामुळे धाग्यातली माहिती हळूहळू जुनी होत चालली आहे. मी पण सध्या गाडी घेण्याच्या विचारात आहे, ११०CC. कोणालाही सहज वापरता यावी अशी असावी. TVS ज्युपिटर किंवा TVS विगो घ्यावी या विचारापर्यंत आलोय पण थोडं कन्फ्युजन झालंय... गरज: १. रोजचा प्रवास किमान १२-१३ कि.मी. २. रंगरूप ३. कमी देखभाल ४. चालवण्यातला सहजपणा(खासकरून बंगलोर ट्राफिक साठी!) या दोन्ही गाड्यांचं इंजिन सेमच आहे आणि चाकं देखील १२ इंच आहेत(होंडाच्या गाड्या अजूनही १० इंच आहेत) बाकी सोयी पण चांगल्या आहेत, सस्पेन्शन पण चांगलं वाटतंय. पेट्रोल टाकीच झाकण बाहेर आहे, वजन(108kg ) आणि मायलेज (६२* kmpl )सुद्धा बरं वाटतंय. विगो पूर्ण मेटल बॉडी आहे तर ज्युपिटर फायबर... त्यामुळे विगो जास्त चांगली टिकेल वाटतंय. विगो ड्रम जवळपास ६२हजारापर्यंत मिळेल तर ज्युपिटर बेसिक मॉडेल ६३ पासून आहे आणि नवीन "क्लासिक"च टॉप मॉडेल ७२ हजारापर्यंत जाईल. या सेक्शन मधल्या होंडाच्या गाड्यांमध्ये खूप कमी फिचर आहेत, सस्पेन्शन चांगले नाही आणि चाकं पण छोटी (१० इंच)आहेत. यामाहा फॅसिनो तितकीशी आवडली नाही. कोणी या गाड्या वापरल्या आहेत का? असल्यास अनुभव कसा आहे हे कृपया सांगावे...

In reply to by शब्दबम्बाळ

कपिलमुनी गुरुवार, 01/18/2018 - 17:28
ज्युपिटर चे सीट हे कमी उन्च आहे आणि जास्त रुन्द आहे त्यामुळे ते जास्त आरामदायक ( विशेषतः महिलांसाठी ) आहे. वेगो तुलनेने उन्च आहे. मी वेगो साडेसात वर्षे वापरली . ३०,००० किमी आणि ६ वर्षे झाल्यावर टायर , ट्यूब बदलून ट्यूबलेस टायर टाकले आहेत. ज्युपिटर डिकीची स्पेस बद्दल माहिती नाही, वेगो मधे हेल्मेट बसते.

In reply to by कपिलमुनी

शब्दबम्बाळ Mon, 01/22/2018 - 11:49
विगो घेतली! :) वजन समान असलं तरी ज्युपिटर पेक्षा कमी बोजड वाटते... शिवाय ज्युपिटरसाठी बऱ्याच ऍक्सेसरी खरेदी कराव्या लागतात त्या विगो मध्ये आधीपासून आहेत (यूएसबी चार्जेर सारखे). ड्युअल टोन कलर सुद्धा छान आहेत आता...

In reply to by कपिलमुनी

शब्दबम्बाळ Tue, 01/23/2018 - 09:39
zigwheels गंडलेलं दिसतंय जरा तुलनेच्या बाबतीत! विगोला ट्युब्लेस टायर आहेत, तिथे नाहीत असे दाखवलंय. शिवाय नेहमी प्रमाणे बऱ्याच ठिकाणी होणारा युनिट्स चा घोळ झालाय. ज्युपिटर च इंजिन 7.99 PS पावर तयार करते आणि विगोच 5.88 kW (म्हणजेच ७.९९ PS ) पण तिथे चक्क ५.८८ PS इतकीच पावर निर्माण करते असे लिहिलंय! एखाद्याने तुलना करताना निव्वळ हे पाहिलं आणि विश्वास ठेवला तर त्याला विगोच इंजिन बरंच कमी ताकदीचं वाटू शकत...आणि गाडी घ्यायचं मन बदलू शकत! :)

नवीन आरटीओ चा नियम आलेला आहे. एप्रिल २०१९ पर्यंत जुन्या दुचाकींना नवीन ब्रेक सिस्टिम बसवून घ्यायची आहे. त्यानुसार किती गाड्यांना ते करावे लागेल? तसेच ती सिस्टिम बसवून घेण्याची सोय काय? माझ्या हिरोहोंडा स्प्लेंडरला आता १३ वर्षे होत आहेत परत दोन वर्षांनी पासिंग करुन घ्यावे लागेल तेव्हा ती सिस्टिम पाहिजेच. मध्यंतरी मी स्कूटरची सवय करण्यासाठी अ‍ॅक्सेस १२५ वापरत होतो. थोडी सवय झाली आहे पण ती छोट्या चाकांची भीती वाटतेच. एप्रिला १५० गाडी कशी आहे. त्याचा अनुभव कोणाला आहे का?