✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाथरूमचे सौंदर्य सोप ...

म
मार्मिक गोडसे यांनी
Tue, 01/12/2016 - 11:22  ·  लेख
लेख
ज्याच्याशिवाय बाथरूम अपुर्ण आहे अशा आंघोळीच्या साबणाला बाथरूमध्ये मानाचे स्थान असते. बाथरूममध्ये त्याच्या बैठकीची खास व्यवस्था केली जाते. जितक्या प्रकारचे बाजारात साबण आहेत त्याहूनही अधिक प्रमाणात त्याच्या बैठकीचे प्रकार आहेत. टाईल्समधील सोप डिश्,प्लॅस्टिक ते स्टेनलेस स्टीलपर्यंत विवीध आकारच्या आकर्षक सोप डिश मिळतात. शरीर स्वच्छ ठेवणारा हाच साबण आपल्या अस्तित्वाच्या खुणा सोप डिशवर सोडतो. ही डिश वेळच्यावेळी स्वच्छ केली नाही तर साबणाचे ओघळ व डिशला चिकटलेले साबणाचे तुकडे डिशचे व पर्यायाने बाथरूमचे सौदर्यच खराब करुन टाकते. खासकरून पावसाळ्यात काही साबण हवेतील आर्द्रता खेचून लिबलिबीत होतात व घरातील एखादा तरी सदस्य त्या गोळ्याचा 'मुटका' बनवतोच. अस साबण हाताळायला व बाघयलाही किळसवाणे वाटते. १० वर्षापूर्वी लोहार चाळीत एका दुकानात सोप डिश बघायला गेलेल्या माझ्या बाबांना त्या दुकानदाराने 'मॅग्नेटीक सोप होल्डर' दाखवले बाबांना ते पसंद पडले व ते त्यांनी खरेदी केले. ह्या सोप होल्डरला मॅग्नेट असते व साबणाला कोल्ड ड्रींकच्या बाटलीचा 'बिल्ला' दाबून बसवायचा, बिल्ल्याकडील साबणाची बाजू ह्या सोप होल्डरला लावली की साबण त्या सोप होल्डरला चिकटून बसतो. साबणाचा कोणताही भाग थेट सोप होल्डरला चिकटत नसल्यामुळे सोप होल्डर खराबही होत नाही व साबण हवेत लटकल्यामुळे चारही बाजूने हवेशी संपर्कात राहिल्यामुळे साबण लवकर वाळतो, पावसाळ्यातही साबण नरम पडत नाही. ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरमुळे बाथरूमच्या सौदर्यात नक्कीच भर पडते. परवा त्या दुकानात ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरची चौकशी केली तेव्हा कळले की मागणी नसल्यामुळे त्या दुकानदाराने हे मॅग्नेटीक सोप होल्डर ठेवणे बंद केले. संपुर्ण लोहार चाळ पालथी घातली तरी कोणत्याच दुकानात हे मॅग्नेटीक सोप होल्डर मिळाले नाही. एका हार्डवेअरच्या दुकानाच्या बाहेरील शोकेसमध्ये मॅग्नेटीक सोप होल्डर सारखी वस्तू दिसली. चौकशी केली असता कळाले की ते मॅग्नेटीक डोअर स्टॉपर होते. विचार केला ह्यालाच मॅग्नेटीक सोप होल्डर म्हणून वापरले तर? जो स्टॉपर दरवाजा पकडून ठेवू शकतो तो साबण नक्कीच पकडू शकेल. फार विचार न करता ५० रुपयाचा PVC चा एक मॅग्नेटीक डोअर स्टॉपर खरेदी केला. घरच्याघरी बाथरूममध्ये फिट केला सूचना- बाथरूमध्ये नळाची PVC कंसील फिटींग असेल तर ड्रिल मारताना काळजी घ्या, कदाचीत आतील पाईपला छिद्र पडून पाण्याची गळती होउ शकते. ह्यावरही सोपा उपाय आहे, परंतू शक्यतो काळजी घेणे योग्य. १) चित्रातील मॅग्नेटीक डोअर स्टॉपरचा डाविकडील भाग वापरायचा आहे. . २) पेन्सिलने होल पाडायच्या खुणा करुन घ्या. . . ३) दोन स्क्रुने भिंतीवर फिट करा. . ४) साबणात बिल्ला घट्ट दाबून बसवा. . ५) साबणाची बिल्ला लावलेली बाजू मॅग्नेटला लावा. बघा कसा रुबाबात बसतो साबण. . . बराच शोध घेवूनही 'हा' सापडला नाही म्हणून वरील जुगाड करावा लागला. .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14237 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

मस्त जुगाड.

मृत्युन्जय
Tue, 01/12/2016 - 11:37 नवीन
मस्त जुगाड.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

स्वच्छंदी_मनोज
Tue, 01/12/2016 - 17:39 नवीन
मस्त आणी कल्पक जुगाड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१

सुबोध खरे
Tue, 01/12/2016 - 18:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

छानच!

एस
Tue, 01/12/2016 - 15:21 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments

हि बरय पन साबन संपुन दिसेनासा

भीमराव
Tue, 01/12/2016 - 16:52 नवीन
हि बरय पन साबन संपुन दिसेनासा होईपरेंत वापारनारे लोक असले चाळे करतील आसं वाटत नाही
  • Log in or register to post comments

बरोबर!

अन्नू
Wed, 01/13/2016 - 17:33 नवीन
साबन संपुन दिसेनासा होईपरेंत वापारनारे लोक असले चाळे करतील आसं वाटत नाही
अगदी हेच म्हणायचं होतं मला, त्या पन्नास-साठ रुपयात अणखीन सहा साबण येतील की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

झकास आयडिया

पैसा
Tue, 01/12/2016 - 17:09 नवीन
झकास आयडिया! आम्ही लहान असताना हे असे साबणाला बुचे लावायचे वगैरे उद्योग करायचो. साबणाचे उरलेसुरले लहानसहान तुकडे एकत्र करून बेसिनवर हात धुवायला वापरता येतात. तसे फुकट घालवायची गरज नाही.
  • Log in or register to post comments

साबणाचे उरलेसुरले लहानसहान

सुबोध खरे
Tue, 01/12/2016 - 18:52 नवीन
साबणाचे उरलेसुरले लहानसहान तुकडेमी वॉशिंग मशिनच्या धागे गोळा करण्याच्या जाळीत ठेवतो. त्यामुळे त्यातून पाणी जाते आणी धुवून झालेल्या कपड्याला एक मंद सुगंध येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/13/2016 - 07:11 नवीन
आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे जुन्या मोज्यात भरायचो =)).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे

मार्मिक गोडसे
गुरुवार, 01/14/2016 - 18:20 नवीन
आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे जुन्या मोज्यात भरायचो
मागे 'रिन' कपडे धुवायच्या साबणावर दोरी असलेली पिशवी मिळायची, तीची एक बाजू नायलॉनच्या कापडाची व दुसरी बाजू नायलॉनच्या जाळीची असे. त्यात कपडे धुवायचा साबण ठेवून दोरी खेचली की पिशवीचे तोंड बंद व्हायचे. ह्यात साबण शेवटच्या कणापर्यंत वापरता यायचा. ही साबणाची पिशवी नळाच्या गळ्यात लटकवता येत असल्यामुळे त्याला ठेवण्यासाठी खास जागा लागत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आम्ही हात टेकले कोपरापासून

कंजूस
Tue, 01/12/2016 - 18:02 नवीन
आम्ही हात टेकले कोपरापासून.असं सर्टीफिकेट लगेच कुणाला मिळत नाही आमच्याकडून याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

क्या बात है

श्रीरंग_जोशी
Wed, 01/13/2016 - 00:16 नवीन
कल्पकता आवडली. यावरून आठवले - रिकामपणचे उद्योग - खिशाला फ्लॅप शिवणे.
  • Log in or register to post comments

छान जुगाड. बाथरुमच्या

रेवती
Wed, 01/13/2016 - 03:53 नवीन
छान जुगाड. बाथरुमच्या टाईल्सही आवडल्या.
  • Log in or register to post comments

एक सूचना करावीशी वाटते "कोल्ड

कंजूस
Wed, 01/13/2016 - 04:45 नवीन
एक सूचना करावीशी वाटते "कोल्ड ड्रींकच्या बाटलीचा 'बिल्ला' ऐवजी पुर्वीची निकेलची नाणी विपरता येतील.एक उभ्या दातांचा साबण होल्डर मिळतो त्यात साबण उभाठेवला की लगेच वाळतो. ६४ सालानंतर कॅालेजेज मध्ये असलेले सक्तीचे आर्मी ट्रेनिंग बंद केले.त्या अगोदर मुलांना कँपात शिबिर होत असे.तिथे सार्जट येऊन तुमच्या प्रत्येक वस्तू तपासत असे.गळका थपथपलेला साबणाला उणे मार्कस पडायचे.आमच्या शोजारच्या मुलाकडून ही गोष्ट कळली.तो आंघोळ झाली की उभा ठेवलेला साबण झटकून लगेच वेष्टनात ठेवू लागला.शेवटपर्यंत सुगंधही टिकतो.
  • Log in or register to post comments

मस्त जुगाड...

मुक्त विहारि
Wed, 01/13/2016 - 15:16 नवीन
आवडला....
  • Log in or register to post comments

ठीके.

खेडूत
Wed, 01/13/2016 - 16:50 नवीन
ठीके. एक कुशंका: ही साबणवडी चपटी झाल्यावर साबणाचे दोन तुकडे होऊन हातात येतील कारण चुंबकाची शक्ती बुचाला घट्ट धरून ठेवेल...
  • Log in or register to post comments

बुचाला साइडला एक भोक करून दोरा बांधायचा.

बबन ताम्बे
Wed, 01/13/2016 - 17:54 नवीन
साबणाला धरून ओढण्यापेक्षा दोराला धरून ओढायचे. नो तुकडा ऑफ साबण :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

फारसा उपयोग होणार नै

पैसा
Wed, 01/13/2016 - 19:06 नवीन
आमच्याकडे गोल्डफिश सोप ऑन अ रोप मिळतो. माशाच्या आकाराचा मोठा साबण दोरीला लटकवलेला असतो. तो मोठा असतानाच दोरी सोडून हातात येतो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

साबणाला दोरी नाही अडकवायची.

बबन ताम्बे
Wed, 01/13/2016 - 19:21 नवीन
माझी आयडीया अशी आहे की बुचाला साईडला भोक पाडून दोरी बांधायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गोल्डफिश???

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 01/13/2016 - 19:27 नवीन
आंघोळीसाठी??? आम्ही तर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

च्चः

पैसा
Wed, 01/13/2016 - 19:31 नवीन
आंघोळीसाठी नै ओ! वॉशबेसिनवर जास्तीचा म्हणून लटकवलेला असतो. एकुणात दोरीचा फार उपयोग होत नै हे सांगायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

गोव्याला गेलो असताना आणला

मार्मिक गोडसे
Wed, 01/13/2016 - 20:25 नवीन
गोव्याला गेलो असताना आणला होता. हा साधासुधा मासा नाही देवमासा आहे, संपता संपत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा:हा:

सस्नेह
गुरुवार, 01/14/2016 - 13:06 नवीन
अक्षय मासा आहे तो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

ही साबणवडी चपटी झाल्यावर

मार्मिक गोडसे
Wed, 01/13/2016 - 18:01 नवीन
ही साबणवडी चपटी झाल्यावर साबणाचे दोन तुकडे होऊन हातात येतील कारण चुंबकाची शक्ती बुचाला घट्ट धरून ठेवेल...
रास्त शंका. साबण ओढून काढला तर साबणाचे दोन तुकडे होतात, साबण चुंबकापासून सरकावून (slide) काढल्यास ताकदही कमी लागते व साबणाचे तुकडेही होत नाहीत. झिजलेला साबण वाया जाऊ नये ह्या करता काय करावे ह्याची सचित्र माहीती नंतर देतो.
  • Log in or register to post comments

हायला

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 01/13/2016 - 18:25 नवीन
काय एकेक टॅलेन्टेड लोक्स आहेत इथे...पण एव्ह्ढा खटाटोप न करतासुद्धा माझ्याकडचा साबण होल्डर साबण स्वच्छ ठेवतो, साबण लवकर वाळतो वगैरे वगैरे Image removed. बाकी ते शेवटचे तुकडे वापरायच्या विविध पद्धती आवडल्या.
  • Log in or register to post comments

हे चित्र डकवायचे होते

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 01/13/2016 - 18:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

आयडीया मस्त आहे, मुख्य म्हणजे

प्रसाद१९७१
Wed, 01/13/2016 - 18:33 नवीन
आयडीया मस्त आहे, मुख्य म्हणजे दिसते चांगली. साबण थोडा वाया गेला तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments

.पण एव्ह्ढा खटाटोप न

मार्मिक गोडसे
Wed, 01/13/2016 - 18:48 नवीन
.पण एव्ह्ढा खटाटोप न करतासुद्धा माझ्याकडचा साबण होल्डर साबण स्वच्छ ठेवतो,
तुमच्याकडील सोप होल्डरचा फोटो द्या ना इथे. तेवढीच आमच्या संग्रहात भर पडेल व साबणाशी 'untouchability' पाळणार्‍या ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरची छुट्टी करता येइल.
  • Log in or register to post comments

माफ करा

मार्मिक गोडसे
Wed, 01/13/2016 - 19:04 नवीन
@ राजेंद्र मेहेंदळे माफ करा.नेटच्या समस्येमुळे प्रतिसाद जात नव्हता व तुम्ही दिलेला फोटो बघता आला नाही. ही SS ची तळाला होल असलेली सोप डिश वापरली आहे. ही डिश साबण स्वच्छ ठेवते परंतू साबण डिशला स्वच्छ ठेवत नाही.
  • Log in or register to post comments

किडा

माहितगार
Wed, 01/13/2016 - 19:18 नवीन
ऐन साबण वापरताना काही वेळा साबण हातातून सुळ्ळकन सुटून धावतो. असा साबण पुन्हा वापरावयासही नकोसे होते. शिवाय ज्येष्ठ व्यक्ती घसरून पडण्याची भिती वाढते. हि मॅग्नेटीक खाली फरशीतच पट्टीच्या स्वरुआत बसवून किंवा इतर काही उपायाने काही मार्ग काढता येऊ शकतात का? - किडा. बाकी एक उपाय असा की छोटे छोटे साबणच वापरायचे खाली पडले म्हणून बाद करावयाचे झाल्यास सोपे जाऊ शकते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळा साबण वापरण्याचाही आनंद देता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments

लिक्विड सोप

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 01/13/2016 - 19:29 नवीन
लिक्विड सोप आंघोळीसाठी मिळतो का? त्याने हि समस्या आणि ईतरही काही समस्या सुटतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

BodyWash मिळतो ना. तो वापरायचा.

राघवेंद्र
Wed, 01/13/2016 - 19:33 नवीन
BodyWash मिळतो ना. तो वापरायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

हां तेही आताशा वापरात आले आहे

माहितगार
Wed, 01/13/2016 - 19:38 नवीन
हां तेही आताशा वापरात आले आहे पण साबणाची सवय एवढी कि सर्व वापरून झाले की मी साबण वापरतो म्हणजे केसांना आधी शांपू आणि मग कंडीशनर झाले तरी त्यानंतर साबण वापरतोच काही काही सवयी माहित असूनही सुटत नाहीत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

होय..हम तो लिक्विड सोपच

खेडूत
Wed, 01/13/2016 - 19:58 नवीन
होय..हम तो लिक्विड सोपच वापरते हैं...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

खेड्यातली माणसे काय पुढे

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/14/2016 - 12:35 नवीन
खेड्यातली माणसे काय पुढे गेलीयत :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

=))

अजया
गुरुवार, 01/14/2016 - 18:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अशाच

उपयोजक
Wed, 01/13/2016 - 20:11 नवीन
अशाच जुगाड आयडियांचा नवीन धागा चालू केला तर?कशी वाटते आयडिया?
  • Log in or register to post comments

#अशाच जुगाड आयडियांचा नवीन

कंजूस
गुरुवार, 01/14/2016 - 10:43 नवीन
#अशाच जुगाड आयडियांचा नवीन धागा चालू केला तर# -- रिकामपणचे उद्योग--- अमुक****अमुक कसे आहेच. हसू नका आजचा टाइम्सचा लेख आहे.मंडी आइआइटी ची मुले इलेक्ट्रानिक्स भंगार गोळा करताहेत.
  • Log in or register to post comments

these iit engineers work as

कंजूस
गुरुवार, 01/14/2016 - 10:46 नवीन
these iit engineers work as kabadiwal as their mission and part time job - Maharashtra Times http://maharashtratimes.indiatimes.com/nation/these-iit-engineers-work-as-kabadiwal-as-their-mission-and-part-time-job/articleshow/50565183.cms
  • Log in or register to post comments

चांगलंय..

खटपट्या
Fri, 01/15/2016 - 11:24 नवीन
चांगलंय..
  • Log in or register to post comments

आधीचा अनुभव परत घेण्यासाठीची

मदनबाण
Tue, 01/19/2016 - 19:56 नवीन
आधीचा अनुभव परत घेण्यासाठीची धडपड आवडली ! :) असा प्रकार आधी वापरला आहे, कोल्ड ड्रिंक ची बुचे वापरली होती,पण नंतर त्याला गंज चढतो. तसेच काही काळ साबण वापरल्या नंतर लावलेले बुच /झाकण/ बिल्ला इं इंइं... पटकन साबणातुन निघतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हम तेरे बिन कही रह नहीं पाते ... :- Sadak
  • Log in or register to post comments

सौंदर्यानुभव घेण्यास आलो पण ....

गामा पैलवान
Wed, 01/20/2016 - 13:20 नवीन
मागो, बाथरूमचं सौंदर्य हे शीर्षकात वाचून वेगळ्याच अपेक्षेने धागा उघडला. ;-) म्हंटलं कुणी साबणसुंदरी दिसेल. पण इथे आंबटशौकीन नसून चिकटशौकीन आहेत हे पाहून भ्रमनिरास झाला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा