पूर्वीचे शिर्षक वाचून बर्याच जणांच्या भुवया वर गेल्या त्यामुळे नाम मे चेंज होना
हा धागा लिहिण्याची प्रेरणा म्हणजे मुविंचा http://www.misalpav.com/node/29773 हा धागा …
मी स्वतासाठी आत्तापर्यंत ४ बाईक्स घेतल्या आहेत …आणि वापरून झाल्यावर परत विकल्या … त्यामुळे इथे दुसर्यांना बाईक्स बघताना थोडी मदत व्हावी या उद्देशाने हा लेख (… म्हणा जिल्बी चायला )
बहुतांशवेळा लोकं बाईक घेताना खालील मुद्दे विचारात घेतात
१. दमड्या
२. मायलेज … "कितना देती है"
३. दिसणे
४. ताकद (power)
५. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा )
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)
वरीलपैकी कोणत्या मुद्याला किती प्राधान्य द्यायचे ते बहुतांशवेळा "वापरणार्याच्या वयावर + विकत घेणार्याच्या खिशावर + पेट्रोलचा खर्च किती परवडतो त्यावर" अवलंबून असतो
माझे वयानुसार ठोकळेबाज निरीक्षण असे (सर्व अंदाज आहेत …. ते सुध्धा फक्त निरीक्षणावरून … त्यामुळे विदा मागणार्यास फाट्यावर मारण्यात येईल :D )
शारीरिक वय १८ पेक्षा कमी
या कार्ट्यान्ना बाइक हातात देऊ नये… चायला बडे बाप के बेटे
मानसिक वय १८ ते २५
यांना मुख्यत्वे शायनिंग मारायची असते त्यामुळे
१. दिसणे
२. ताकद (power)
बाकी मुद्दे गेले तेल लावत …. पाख"रे" इंप्रेस झाली पाहिजेत …. मित्र्रांनी कसली भारी बाइक आहे असे म्हणून दाद दिली पाहिजे …इतकाच उद्देश
मानसिक वय २५ ते ३३
यांच्याकडे नवीन नोकरीचे पैसे आलेले असतात…यांना सुध्धा थोडीफार शायनिंग मारायची असते पण त्याबरोबरच दमड्याम्चे मुल्य (value for money) आणि व्यावहारिक मुल्य सुध्धा बघतात … बर्याचदा स्वताच्या खिशातले पैसे असतात त्यामुळे :)
१. दमड्या
२. मायलेज … "कितना देती है"
३. दिसणे
४. ताकद (power)
काहीवेळा
५. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)
मानसिक वय ३३ ते ४०
आर्थिक दृष्ट्या हे बर्यापैकी स्थिर असतात … पण लग्न झालेले असते … बरोबर १-२ कच्चीबच्ची असतात … संसार खर्च वाढलेले असतात …
बर्याचदा या वयात नवीन बाइक घेणारे कमीच असतात कारण बाइक आधीच घेऊन झालेली असते … बाइक घेण्याचे कारण हे कदाचित कार बरोबर १ बाइक असलेली बरी असे असते
१. दमड्या
२. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च
३. मायलेज … "कितना देती है"
४. आराम
मानसिक वय > ४० - उपप्रकार १
यांची कार घेण्याईतपत आर्थिक परिस्थिती नसते
१. दमड्या
२. मायलेज … "कितना देती है"
३. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा )
४. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च
५. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)
मानसिक वय > ४० - उपप्रकार २
हे खरे बायकर्स …. यांना कार पेक्षा बाइक आवडते
१. ताकद (power)
२. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा )
३. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)
४. दिसणे
तर आता विभागवार ठरलेल्या बायकांचे पर्याय बघू
क्रमश:
वाचने
17418
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म...बाईक कोच्या बाबतीत
पाखरु, कार, बाईक, दारु हे
In reply to हम्म...बाईक कोच्या बाबतीत by जेपी
(No subject)
In reply to धत्तेरी... by चित्रगुप्त
बाक़ी हापिसच्या गाडीने तासभर
In reply to धत्तेरी... by चित्रगुप्त
कर दी ना छोटी बात
In reply to _/\_ by तुषार काळभोर
भौ...जरा थाम्बा...पुढच्या
In reply to निर्मिती by चित्रगुप्त
खुमासदार
stay tuned
In reply to खुमासदार by श्रीरंग_जोशी
चित्रगुप्त सरांशी प्रचंड सहमत
मस्त...
बायका म्हणजे आमच्या आवडीचा
In reply to मस्त... by मुक्त विहारि
अरे टवाळा!!! काय पण धागा
In reply to बायका म्हणजे आमच्या आवडीचा by टवाळ कार्टा
अरे दांडगा रिसर्च केलाय
In reply to अरे टवाळा!!! काय पण धागा by अत्रुप्त आत्मा
बायका आणिक बाइका दोन्ही मध्ये
डायवरच्या स्किल वर अवलंबून
In reply to बायका आणिक बाइका दोन्ही मध्ये by विवेकपटाईत
येक नंम्बर!!
In reply to डायवरच्या स्किल वर अवलंबून by टवाळ कार्टा
योग्य ते बदल केलेले आहेत..
हा हंत हंत ...
मिपा हॅज 'ए' सेन्सॉर्ड बोर्ड
In reply to हा हंत हंत ... by चित्रगुप्त
(No subject)
In reply to हा हंत हंत ... by चित्रगुप्त
जौदे....ते चित्र मनात साठवले
In reply to हा हंत हंत ... by चित्रगुप्त
दुसरा भाग कधी?
In reply to जौदे....ते चित्र मनात साठवले by टवाळ कार्टा
आधी सेंसॉर सर्टिफिकेट घ्यायचा
In reply to दुसरा भाग कधी? by मुक्त विहारि
एक मार्ग आहे...
In reply to आधी सेंसॉर सर्टिफिकेट घ्यायचा by टवाळ कार्टा
आधी केलेल्या व्यनीला तर उत्तर
In reply to एक मार्ग आहे... by मुक्त विहारि
आम्ही
KTM is todays best bang for
In reply to आम्ही by प्रसाद गोडबोले