✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाईक्स घेताना - भाग १

ट
टवाळ कार्टा यांनी
Sat, 12/20/2014 - 20:47  ·  लेख
लेख
पूर्वीचे शिर्षक वाचून बर्याच जणांच्या भुवया वर गेल्या त्यामुळे नाम मे चेंज होना हा धागा लिहिण्याची प्रेरणा म्हणजे मुविंचा http://www.misalpav.com/node/29773 हा धागा … मी स्वतासाठी आत्तापर्यंत ४ बाईक्स घेतल्या आहेत …आणि वापरून झाल्यावर परत विकल्या … त्यामुळे इथे दुसर्यांना बाईक्स बघताना थोडी मदत व्हावी या उद्देशाने हा लेख (… म्हणा जिल्बी चायला ) बहुतांशवेळा लोकं बाईक घेताना खालील मुद्दे विचारात घेतात १. दमड्या २. मायलेज … "कितना देती है" ३. दिसणे ४. ताकद (power) ५. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा ) ६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च ७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) वरीलपैकी कोणत्या मुद्याला किती प्राधान्य द्यायचे ते बहुतांशवेळा "वापरणार्याच्या वयावर + विकत घेणार्याच्या खिशावर + पेट्रोलचा खर्च किती परवडतो त्यावर" अवलंबून असतो माझे वयानुसार ठोकळेबाज निरीक्षण असे (सर्व अंदाज आहेत …. ते सुध्धा फक्त निरीक्षणावरून … त्यामुळे विदा मागणार्यास फाट्यावर मारण्यात येईल :D ) शारीरिक वय १८ पेक्षा कमी या कार्ट्यान्ना बाइक हातात देऊ नये… चायला बडे बाप के बेटे मानसिक वय १८ ते २५ यांना मुख्यत्वे शायनिंग मारायची असते त्यामुळे १. दिसणे २. ताकद (power) बाकी मुद्दे गेले तेल लावत …. पाख"रे" इंप्रेस झाली पाहिजेत …. मित्र्रांनी कसली भारी बाइक आहे असे म्हणून दाद दिली पाहिजे …इतकाच उद्देश मानसिक वय २५ ते ३३ यांच्याकडे नवीन नोकरीचे पैसे आलेले असतात…यांना सुध्धा थोडीफार शायनिंग मारायची असते पण त्याबरोबरच दमड्याम्चे मुल्य (value for money) आणि व्यावहारिक मुल्य सुध्धा बघतात … बर्याचदा स्वताच्या खिशातले पैसे असतात त्यामुळे :) १. दमड्या २. मायलेज … "कितना देती है" ३. दिसणे ४. ताकद (power) काहीवेळा ५. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) मानसिक वय ३३ ते ४० आर्थिक दृष्ट्या हे बर्यापैकी स्थिर असतात … पण लग्न झालेले असते … बरोबर १-२ कच्चीबच्ची असतात … संसार खर्च वाढलेले असतात … बर्याचदा या वयात नवीन बाइक घेणारे कमीच असतात कारण बाइक आधीच घेऊन झालेली असते … बाइक घेण्याचे कारण हे कदाचित कार बरोबर १ बाइक असलेली बरी असे असते १. दमड्या २. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च ३. मायलेज … "कितना देती है" ४. आराम मानसिक वय > ४० - उपप्रकार १ यांची कार घेण्याईतपत आर्थिक परिस्थिती नसते १. दमड्या २. मायलेज … "कितना देती है" ३. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा ) ४. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च ५. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) मानसिक वय > ४० - उपप्रकार २ हे खरे बायकर्स …. यांना कार पेक्षा बाइक आवडते १. ताकद (power) २. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा ) ३. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) ४. दिसणे तर आता विभागवार ठरलेल्या बायकांचे पर्याय बघू क्रमश:
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17404 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

हम्म...बाईक कोच्या बाबतीत

जेपी
Sat, 12/20/2014 - 21:00 नवीन
हम्म...बाईक कोच्या बाबतीत ताकद पावर आपली आपली बघायची, मी माझी शिडी डॉन गरज पडल्यास 80 च्या स्पिडने पळवेन. गरज नसल्यास 75 चा मायलेज काढेन.
  • Log in or register to post comments

पाखरु, कार, बाईक, दारु हे

टवाळ कार्टा
Sat, 12/20/2014 - 21:06 नवीन
पाखरु, कार, बाईक, दारु हे सगळे पसंद अपनी अपनी या टाईपचे आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

(No subject)

टवाळ कार्टा
Sat, 12/20/2014 - 21:42 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बाक़ी हापिसच्या गाडीने तासभर

सतिश गावडे
Sat, 12/20/2014 - 21:55 नवीन
बाक़ी हापिसच्या गाडीने तासभर झोपून जायचे आणि झोपून घरी यायचे या प्रकाराची सवय झाल्याने दुसर्याने चालवलेली कुठलीही गाडी चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कर दी ना छोटी बात

टवाळ कार्टा
Sun, 12/21/2014 - 17:55 नवीन
कर दी ना छोटी बात :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

भौ...जरा थाम्बा...पुढच्या

टवाळ कार्टा
Sat, 12/20/2014 - 22:12 नवीन
भौ...जरा थाम्बा...पुढच्या भागात तडका टाकतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खुमासदार

श्रीरंग_जोशी
Sat, 12/20/2014 - 22:21 नवीन
खुमासदार अन माहितीपूर्ण लेखन. काही प्रतिकात्मक फोटो टाकले असते तर अधिक परिपूर्ण वाटले असते.
  • Log in or register to post comments

stay tuned

टवाळ कार्टा
Sat, 12/20/2014 - 22:27 नवीन
stay tuned \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चित्रगुप्त सरांशी प्रचंड सहमत

खटपट्या
Sat, 12/20/2014 - 22:25 नवीन
चित्रगुप्त सरांशी प्रचंड सहमत !!
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 23:08 नवीन
निरीक्षण जोरदार आहे.... अर्थात ह्या नियमांना पण अपवाद असणारच...
  • Log in or register to post comments

बायका म्हणजे आमच्या आवडीचा

टवाळ कार्टा
Sat, 12/20/2014 - 23:16 नवीन
बायका म्हणजे आमच्या आवडीचा विषय (इथे शाब्दीक कोट्या करू नयेत) ;) अणि अपवाद सगळ्याच नियमांना असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरे टवाळा!!! काय पण धागा

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/21/2014 - 00:30 नवीन
अरे टवाळा!!! :-D काय पण धागा काढलास! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे दांडगा रिसर्च केलाय

टवाळ कार्टा
Sun, 12/21/2014 - 11:54 नवीन
अरे दांडगा रिसर्च केलाय माझ्या बायका घेताना...आत्ता ते "जनहितार्थ मे जारी" करतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बायका आणिक बाइका दोन्ही मध्ये

विवेकपटाईत
Sun, 12/21/2014 - 08:36 नवीन
बायका आणिक बाइका दोन्ही मध्ये एक समानता आहे, बायको संसार चालविताना नखरे करते, बाइका रस्त्यावर चालताना नखरे करते. दोघींचा स्वभाव एकच.
  • Log in or register to post comments

डायवरच्या स्किल वर अवलंबून

टवाळ कार्टा
Sun, 12/21/2014 - 11:55 नवीन
डायवरच्या स्किल वर अवलंबून असते नखरे कसे सांभाळायचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

येक नंम्बर!!

तुषार काळभोर
Sun, 12/21/2014 - 17:50 नवीन
प्रचंड अणुमोदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

योग्य ते बदल केलेले आहेत..

टवाळ कार्टा
Sun, 12/21/2014 - 19:24 नवीन
योग्य ते बदल केलेले आहेत...अजून पण बदल हवे असतील तर व्यनी करा...पण धागा नका ऊडवू अजून पुढचे भाग टाकायचे आहेत
  • Log in or register to post comments

हा हंत हंत ...

चित्रगुप्त
Sun, 12/21/2014 - 19:50 नवीन
हा हंत हंत ... आधीचे शीर्षक, त्याला साजेसे प्रतिसाद अन चित्रे, हे सर्व कुठे गेले ?
  • Log in or register to post comments

मिपा हॅज 'ए' सेन्सॉर्ड बोर्ड

प्यारे१
Sun, 12/21/2014 - 20:03 नवीन
मिपा हॅज 'ए' सेन्सॉर्ड बोर्ड . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/21/2014 - 20:14 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

जौदे....ते चित्र मनात साठवले

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 08:25 नवीन
जौदे....ते चित्र मनात साठवले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

दुसरा भाग कधी?

मुक्त विहारि
Mon, 12/22/2014 - 08:29 नवीन
आम्ही वाट बघत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आधी सेंसॉर सर्टिफिकेट घ्यायचा

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 08:38 नवीन
आधी सेंसॉर सर्टिफिकेट घ्यायचा विचार करतोय :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एक मार्ग आहे...

मुक्त विहारि
Mon, 12/22/2014 - 08:41 नवीन
व्य.नि. कर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आधी केलेल्या व्यनीला तर उत्तर

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 08:44 नवीन
आधी केलेल्या व्यनीला तर उत्तर द्या...तुमचे काम पहीले...लेख नंतर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आम्ही

प्रसाद गोडबोले
Mon, 12/22/2014 - 13:56 नवीन
मानसिक वय > ४० - उपप्रकार २ हे खरे बायकर्स …. यांना कार पेक्षा बाइक आवडते
आम्ही सध्या ह्या गटात मोडतो ... केटीएम ३९० प्र.....चं.....ड आवडली ... पण शारिरिक/सामाजिक वय २५-३० असल्याने कार घेणे गरजेचे होते :( असो . ( आता बाईक घेतली तर हार्लि च घेणार अशा हट्टाला पेटलेला ) प्रगो
  • Log in or register to post comments

KTM is todays best bang for

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 14:03 नवीन
KTM is todays best bang for buck (and possibly since indian biking history)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा